दहिसरमधील विमानचलन 'कंट्रोल टॉवर' च्या
स्थलांतर संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १८ :- दहिसरमधील विमानचलन 'कंट्रोल टॉवर' च्या स्थलांतरसंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.
या संदर्भात सदस्य मनिषा चौधरी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.
दहिसर येथील रडारच्या प्रश्नाबाबत महानगरपालिका आणि राज्य शासनाने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मात्र, हा विषय केंद्र शासनाच्या अधिकारात असून महानगरपालिकेने रडारच्या स्थलांतराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारही आवश्यक निधी उपलब्ध देण्याबाबत सकारात्मक आहे. या कामास केंद्र शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असल्याने यासाठी बैठकीचे आयोजन करण्यासाठी केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. बैठक लवकर घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्याकडून पत्रव्यवहार केला जाईल, असे
No comments:
Post a Comment