Friday, 14 March 2025

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार

 भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार

गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. 12 : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांमार्फत गर्दीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. अशा ठिकाणी पोलीस बळ वाढवून देण्यात येईलअसे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात 10 जानेवारी रोजी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.भोयर म्हणालेयाप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दि. 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अचानकपणे ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्याप्रमाणावर एमपीडीएहद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील घटनेच्या अनुषंगाने गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईलअसेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार,अवैद्यरित्या गर्भलिंग तपासणीसाठी

 स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १२ :- स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर  कारवाई करण्यासाठी  कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईलअसे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

राज्यात अवैध गर्भपात रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सदस्य श्वेता महाले यांनी उपस्थ‍ित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रोहित पवार व रणधीर सावरकर यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणालेराज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत.  स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांवर पिसिपीएनडीटी कायद्याद्वारे कठोर कारवाई केली जात आहे. पोलिस महानिरीक्षकजिल्हाधिकारीजिल्हा पोलीस प्रमुखआणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या  अध्यक्षतेखाली  समित्या स्थापन  करण्यात आल्या आहेत. या समित्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय असून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्या कार्य करीत आहेत.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बनावट (डिकॉय) प्रकरणा मधील महिलेला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचेही सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले. अवैधरित्या होत असल्या स्त्रीभ्रूणहत्या याची माहिती देण्यासाठी 104 हा क्रमांक  कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल.

अवैद्यरित्या  गर्भलिंग तपासणीसाठी

            पर राज्यातील टोळ्यांवर छापा मारणेचौकशी करणे व त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी  आदेश देण्यात आले असून  जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारीस्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येईलअसेही त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

जलसंधारण विभागाकडील बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन

 जलसंधारण विभागाकडील बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन


- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड


 


मुंबई, दि. १२ :- जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.


परभणी जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या बाबतीत सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत परभणी जिल्ह्यात 62 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले. 45 बंधारे सुस्थितीत असून त्यांना गेट बसवण्यात आले आहेत त्याद्वारे अपेक्षित सिंचन होत आहे. 17 नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याबद्दल तक्रारी प्राप्त होतील त्याची चौकशी केली जाईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.


जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आणि जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.


००००

Cibercity handbook महिला सुरक्षा

 


Minister Nitesh Rane Performs Bhoomi Pujan for New Jetty at Radio Club

 Minister Nitesh Rane Performs Bhoomi Pujan for New Jetty at Radio Club

 

Mumbai, March 13: Maharashtra’s Minister for Ports, Nitesh Rane, performed the Bhoomi Pujan (groundbreaking ceremony) for the construction of a new passenger jetty and terminal building at the Radio Club. Present on this occasion were Maharashtra Maritime Board’s Chief Executive Officer P. Pradeep, Chief Engineer Surendra Topale, Senior Administrative Officer Pradeep Badiye, Superintendent Engineer Sudhir Devre, and other officials.

           

The existing jetty at the Gateway of India is proving insufficient to handle passenger traffic, creating difficulties for elderly individuals, women, and children. The proposed jetty will help reduce congestion at the existing Gateway of India jetty and improve convenience for passengers.

 

 

Mumbai, March 13: Maharashtra’s Minister for Ports, Nitesh Rane, performed the Bhoomi Pujan (groundbreaking ceremony) for the construction of a new passenger jetty and terminal building at the Radio Club. Present on this occasion were Maharashtra Maritime Board’s Chief Executive Officer P. Pradeep, Chief Engineer Surendra Topale, Senior Administrative Officer Pradeep Badiye, Superintendent Engineer Sudhir Devre, and other officials.

           

The existing jetty at the Gateway of India is proving insufficient to handle passenger traffic, creating difficulties for elderly individuals, women, and children. The proposed jetty will help reduce congestion at the existing Gateway of India jetty and improve convenience for passengers.

 


रेडियो क्लब में नई जेट्टी का भूमि पूजन,

 रेडियो क्लब में नई जेट्टी का भूमि पूजन,

मंत्री नितेश राणे ने किया भूमीपूजन

 

मुंबई, 13 मार्च : महाराष्ट्र के बंदरगाह मंत्री नितेश राणे ने रेडियो क्लब में नई यात्री जेट्टी और टर्मिनल इमारत के निर्माण हेतु भूमि पूजन किया। इस अवसर पर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड के मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेवरिष्ठ प्रशासनिक अधिकारी प्रदीप बढीयेअधीक्षक अभियंता सुधीर देवरे और अन्य अधिकारी उपस्थित थे।

गेटवे ऑफ इंडिया पर स्थित वर्तमान जेट्टी यात्रियों की बढ़ती संख्या के लिए अपर्याप्त साबित हो रही हैजिससे बुजुर्गोंमहिलाओं और छोटे बच्चों को कठिनाइयों का सामना करना पड़ता है। प्रस्तावित जेट्टी के निर्माण से गेटवे ऑफ इंडिया की मौजूदा जेट्टी पर दबाव कम होगा और यात्रियों को बेहतर सुविधाएं मिलेंगी।

जेट्टी टर्मिनल इमारत की विशेषताएँ

आकार: 80 मीटर × 80 मीटर

एम्फीथिएटर: 350 लोगों की बैठने की क्षमता

बर्थिंग जेट्टी एवं अप्रोच जेट्टी

अग्नि सुरक्षा प्रणाली

सीसीटीवी निगरानी प्रणाली

उद्यान और सौंदर्यीकरण

इसके अलावापरियोजना स्थल पर भूगर्भीय परीक्षण किया गया है ताकि निर्माण की व्यवहार्यता सुनिश्चित की जा सके।

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

 रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे

मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

मुंबईदि. 13: रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टीटर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेअधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

            गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्तीस्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

अशी असणार जेट्टी टर्मिनल इमारत

80 मीटर बाय 80 मीटर350 लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटरबर्थिग जेट्टीअप्रोज जेट्टीअग्नीसुरक्षा प्रणालीसीसीटीव्ही यंत्रणागार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी  भूगर्भ चाचणी करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi