भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार
- गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. 12 : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांमार्फत गर्दीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. अशा ठिकाणी पोलीस बळ वाढवून देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात 10 जानेवारी रोजी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.भोयर म्हणाले, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दि. 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अचानकपणे ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्याप्रमाणावर एमपीडीए, हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील घटनेच्या अनुषंगाने गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले
No comments:
Post a Comment