Tuesday, 11 March 2025

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी 'एआय' वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली

 पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी

'एआय' वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली

- गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबईदि. ११ :-  पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला  कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे  सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणालेया गुन्ह्यातील अपराधीवर  कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची  लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमनस्पीड ब्रेकरअपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकरसिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.

            राज्यमंत्री कदम म्हणालेलक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.

विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार

 विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार

 

मुंबईदि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६  या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे.  विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणा बाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगीनियमांच्या पालनाबाबत  तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील. याबाबत तक्रारी आल्यास व कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल.

राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये कार्यवाही करताना प्रमाणित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार सर्व प्रार्थनास्थळांवर तसेच इतर ठिकाणी भोंगे वाजविण्याबाबत ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.

आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे.  तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापर करण्यावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार

 खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील

भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार

- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. ११ :- खाण क्षेत्रातील नियंत्रित स्फोट (कंट्रोल ब्लास्टिंग) आणि त्याचा जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबत खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण केले जाईलअशी माहिती खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी दिली.

खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले कीचंद्रपूर जिल्ह्यात सध्या २७ खाणींना परवानगी आहेत्यापैकी १७ खाणी कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या १२ विहिरींच्या निरीक्षणानुसार भद्रावती आणि बल्लारशाह या भागांमध्ये पाणीपातळी वाढलेली आहेतर काही भागांत अंशतः घट झाली आहे.

खाणीमधील ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अशी निवेदने प्राप्त झाली असल्यास यासंदर्भात महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे केला जाईल. तसेच खाणपट्ट्यातील समस्यांबाबत लवकरच बैठक घेतली जाईलअसेही श्री. देसाई यांनी  उत्तरात सांगितले.

खाणपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात खाण मंजुरीच्यावेळी अटी आणि शर्तींमध्ये पुनर्वसनाचा समावेश असल्याससंबंधित खाण कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या जातील. खाणीमुळे बाधित झालेल्या गावातील रस्ते खराब झाल्यास अशा रस्त्यांना पर्यायी मार्ग देण्यात येऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल व याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईलअसे श्री. देसाई यांनी सांगितले.

सदस्य किशोर जोरगेवार यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवारसंजय देशमुखआशिष देशमुखसुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

रस्ते अपघात रोखण्यासाठी 'अल्कोहोल' सोबतच आता 'ड्रग्स' सेवन तपासणीही करणार

 रस्ते अपघात रोखण्यासाठी 'अल्कोहोलसोबतच

आता 'ड्रग्ससेवन तपासणीही करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ११ : राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता 'अल्कोहोलसोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतीलअसे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राज्यात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाबाबत सदस्य काशिनाथ दाते यांनी प्रश्न उपस्थित केला होता

या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेदेशभरात रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मात्र राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण .०२ टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते. शासनाने जिल्हा नियोजन समितीचा एक टक्का निधी रस्ता सुरक्षेसाठी राखीव ठेवला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक विविध उपाययोजनाउपक्रम राबविण्यात येत आहेत.

वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी विभागाने 263 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अमलात आणण्यात येत आहे. राज्यात 38 ठिकाणी ऑटोमॅटिक ड्राइविंग टेस्ट सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 70 टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत. यापुढे चालक परवान्यांमध्ये अचूकता येण्यासाठी ऑटोमॅटिक टेस्ट ट्रॅकचा उपयोग करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही उपयोग करण्यात येईल.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेरस्ते सुरक्षिततेसाठी राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्गांवर आणि २१,४०० किमी महत्त्वाच्या रस्त्यांवर अपघातप्रवण क्षेत्रावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचे प्रस्तावित आहे. ही आयटीएमएस प्रणाली पीपीपी पद्धती राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी व रस्ता सुरक्षा विषय जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. मुंबई शहरातील रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला किंवा बसशी संबंधित झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. वन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघातप्रवण स्थळे दुरुस्त करण्यात येतील. वाहतूक नियमांविषयी शालेय अभ्यासक्रमात यांसदर्भातील घटक समाविष्ट करण्याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्यात येईलअसेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य अतुल भातखळकरयोगेश सागरज्योती गायकवाडसुधीर मुनगंटीवारगोपीचंद पडळकरडॉ नितीन राऊतअभिमन्यू पवारआदित्य ठाकरे, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.


एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत

 एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. ११ : चर्चगेट येथील एच. आर महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असून कार्यान्वित असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी  विधानपरिषदेत दिली.

            सदस्य सुनिल शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला. 

            महाविद्यालयाने नवीन आर्किटेक्टची नेमणूक केली असल्याचे सांगून नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या कीमहाविद्यालयाने आता बांधकामाचा प्रस्ताव नव्याने सादर केला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. याठिकाणी केलेल्या पाहणीमध्ये काही बांधकामे अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. या अनधिकृत बांधकामांसंदर्भात चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

यासंबंधी सदस्यांनी बृह्नमुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला असता त्याचे उत्तर इंग्रजीमध्ये देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले कीमराठी ही राज्यभाषा असून इंग्रजीमध्ये उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक समज देऊन उत्तर मराठीमध्ये देण्याविषयी आदेश देण्यात येतील.

0000

https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.

 शासनाच्या सर्व विभागांची माहिती 'सीएम डॅश बोर्ड'वर लवकरच उपलब्ध  

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         'सीएम डॅश बोर्डसंकेतस्थळ आणि 'स्वॅसमाहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

             मुंबई, दि. 11 शासनाच्या सर्व विभागांची माहिती  जनतेला 'सीएम डॅश बोर्डवरलवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, 'स्वॅस' (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.                

  विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅश बोर्डसंकेतस्थळ आणि 'स्वॅसमाहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच  उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून  माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमाहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची 'स्वॅस'(SWaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये  राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा.ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 

            माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा 'सीएम डॅश बोर्ड व 'स्वॅस'(SWaaS)  ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले

*माझ्या वाढदिवसाला* -------------------------शेतकऱ्याचा फायदा.

 *माझ्या वाढदिवसाला*  

---------------------------


माझ्या वाढदिवसाला 

नाही कापणार केक.

शेतकऱ्यांचं हे फळ 

घरी आणीन रे एक.


वाढदिवसाला करा

शेतकऱ्याचा फायदा.


केक ऐवजी एकदा

करा फळाचा वायदा.


फळ कापून रे आता

वाढदिवस सजवा.

माझ्या शेतकऱ्यासाठी 

हात लावा रे उजवा.


पहा आधार देऊन

फळबाग पिकवेल.

जगण्याचं तत्त्वज्ञान

मग तोही शिकवेल.


येता सुगीचे दिवस

तेही स्वप्न आखतील.

शेतकरी बांधवांच्या

आत्महत्या रोखतील.


सफरचंद व पपई

कलिंगड,पेरू,आंबा.

अशी फळं घेऊनच

वाढदिवसाला थांबा.


किती स्वस्त आणि मस्त

असा फळांचा बाजार.

बघा कधीच कुणाला

नाही होणार आजार.


*****************




☘️🌹☘️🌹☘️🌹☘️

Featured post

Lakshvedhi