Sunday, 9 March 2025

AI Unzipped’ Book Useful for Enhancing Daily Work Efficiency

 AI Unzipped’ Book Useful for Enhancing Daily Work Efficiency

                                – Chief Minister Devendra Fadnavis

Book Released by Chief Minister Devendra Fadnavis

 

Mumbai, March 8: The book ‘AI Unzipped’ will help enhance efficiency in daily tasks through Artificial Intelligence (AI). This book will be useful for understanding advanced AI technologies, and for students and professionals to incorporate AI into their daily work, said Chief Minister Devendra Fadnavis.

 

On the occasion of International Women’s Day, Chief Minister Devendra Fadnavis released the book ‘AI Unzipped’, authored by Prof. Dr. Apoorva Palkar, Vice-Chancellor of Ratan Tata Maharashtra State Skill University, at Sahyadri Guest House.

 

On this occasion, Deputy Chief Minister Eknath Shinde, Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship, and Innovation Mangal Prabhat Lodha, Vice-Chancellor Prof. Dr. Apoorva Palkar, Dr. Amit Jadhav, publisher Mandar Joglekar, and University Registrar Dr. Rajendra Talware were present.

 

The book ‘AI Unzipped’ provides insights into how AI can enhance daily work efficiency, details about advanced AI technologies, and its applications in industries, healthcare, and education. It also explains how AI can be effectively utilized and includes information on over 500 open-source AI tools and programs, making it a valuable resource for women, students, and professionals looking to integrate AI into their work.

 

Chief Minister Fadnavis congratulated Dr. Apoorva Palkar for authoring this book. He also appreciated the initiatives taken by Ratan Tata Maharashtra State Skill University, such as "Code Without Barriers" and "AI Initiative with Microsoft", which have provided AI training to 10,000 women and students.

 

Minister Mangal Prabhat Lodha praised the book, stating that it will be highly beneficial for women, students, young entrepreneurs, and researchers looking to implement AI in their respective fields.

 

**

दैनिक कार्यों की कार्यक्षमता बढ़ाने के लिए ‘एआई अनज़िप्ड’ पुस्तक उपयोगी –

 दैनिक कार्यों की कार्यक्षमता बढ़ाने के लिए एआई अनज़िप्ड’ पुस्तक उपयोगी

 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों पुस्तक का विमोचन

 

मुंबई8 मार्च: एआई अनज़िप्ड’ (AI Unzipped) पुस्तक के माध्यम से कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) का उपयोग दैनिक कार्यों की कार्यक्षमता बढ़ाने के लिए किया जा सकता है। यह पुस्तक आधुनिक एआई तकनीकोंछात्रोंछात्राओं और दैनिक कार्यों में एआई के उपयोग के तरीकों को समझाने में सहायक होगीऐसा मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

 

अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों एआई अनज़िप्ड’ पुस्तक का विमोचन सह्याद्री अतिथिगृह में किया गया। यह पुस्तक रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय की कुलगुरु प्रो. डॉ. अपूर्वा पालकर द्वारा लिखी गई है। इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  मंत्री मंगलप्रभात लोढ़ाप्रकाशक मंदार जोगलेकरडॉ. अमित जाधवविश्वविद्यालय के कुलसचिव डॉ. राजेंद्र तलवारे सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

 

एआई अनज़िप्ड’ पुस्तक में एआई के माध्यम से कार्यक्षमता बढ़ानेकृत्रिम बुद्धिमत्ता की नवीनतम तकनीकोंउद्योगस्वास्थ्य सेवाओंशिक्षा आदि क्षेत्रों में एआई के उपयोग की विस्तृत जानकारी दी गई है। साथ हीइसमें 500 से अधिक ओपन-सोर्स टूल्स और प्रोग्राम्स की जानकारी शामिल हैजिससे महिलाओंछात्रों और आम नागरिकों को एआई अपनाने के लिए प्रेरित किया जा सके।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने इस पुस्तक के लेखन के लिए डॉ. अपूर्वा पालकर को बधाई दी और रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विश्वविद्यालय द्वारा "Code Without Barriers" और "AI Initiative with Microsoft" जैसे कार्यक्रमों की सराहना कीजिनमें 10,000 छात्राओं और महिलाओं को एआई प्रशिक्षण दिया जा रहा है।

 

मंत्री मंगलप्रभात लोढ़ा ने भी इस पुस्तक की प्रशंसा करते हुए कहा कि यह महिलाओंछात्रोंनवोद्यमियों और शोधकर्ताओं के लिए अत्यंत उपयोगी सिद्ध होगी।

दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘ए आय अनझीप्ड’ या पुस्तकाचा उपयोग

 दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी ए आय  अनझीप्ड’ या पुस्तकाचा  उपयोग

    -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

 

मुंबईदि.8: ए आय  अनझीप्ड(AI Unzipped) या पुस्तकातून एआय चा दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. कृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञानविद्यार्थीनीविद्यार्थी व दैनंदिन कामकाजात एआय चा वापर करण्यासाठी हे पुस्तक उपयोगी होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ए आय  अनझीप्ड’ या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. अपुर्वा पालकर  यांच्या पुस्तकाचे  सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले. 

       यावेळी उपमुख्यमंत्री,  एकनाथ शिंदेमंत्रीकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग मंगलप्रभात लोढा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. अपुर्वा पालकर,डॉ. अमित जाधवप्रकाशक मंदार जोगलेकर,  कुलसचिव रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डॉ. राजेंद्र तलवारे  उपस्थित होते.

 

ए आय  अनझीप्डया पुस्तकातून एआय चा दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी एआय चा उपयोगकृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञानकृत्रीम बुध्दीमत्तेचा उद्योग क्षेत्रआरोग्य सेवाशिक्षण या क्षेत्रातील उपयोगएआय चा उपयोग कसा व करावा?, याची माहिती  तसेच एआय च्या 500 हून अधिक ओपन सोअर्स टुल्स आणि कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणेकरुन सर्वच महिलाविद्यार्थीनीविद्यार्थी व दैनंदिन कामकाजात एआय वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करायला हे पुस्तक उपयोगी होईल. 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी  या पुस्तकाच्या लेखनाबद्दल कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचे अभिनंदन केले. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे विद्यार्थीनी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या Code Without Barriers, AI Inititive with Microsoft ज्यामध्ये 10,000 विद्यार्थीनी व महिलांचे प्रशिक्षण सुरु आहेयाचेही कौतुक केले. 

 

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी   विभाग यांनी या पुस्तकाचे कौतुक करुन हे पुस्तक नक्कीच सर्व महिलाविद्यार्थीनीविद्यार्थ्यांना व दैनंदिन कामकाजात एआय वापरण्याऱ्या नव उद्योजकसंशोधक यांना उपयोगाचे ठरेलअसा विश्वास व्यक्त केला

महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

 महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठीसाठी,डॉ. दिलीप झवेरी यांचा गुजराती साहित्यकृतीसाठी केला गौरव

 

नवी दिल्लीदि. 8: मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ विंदांचे गद्यरूप’ यासाठी तर गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या 'भगवाननी वातोया कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

 

येथील कमानी ऑडिटोरियममध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2024 अर्पण'  सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास  प्रख्यात नाटककार आणि लेखक महेश दत्तानी प्रमुख पाहुणे म्हणूनतर साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिकउपाध्यक्ष कुसुम शर्मासचिव के. श्रीनिवासराव व्यासपीठावर तसेच विविध भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मान्यवरांसोबत उपस्थित होते. पुरस्काराच्या स्वरूपात ताम्रपत्रशाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम प्रदान केली जाते.

 

आज झालेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात 23 प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना गौरवण्यात आले.

विंदांचे गद्यरुप या पुस्ताकाविषयी

 

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या विंदाचे गद्यरुप या समीक्षात्मक पुस्तकात प्रख्यात मराठी कवी आणि समीक्षक विंदा करंदीकर यांच्या समीक्षात्मक लेखनावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी

 

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखनसमीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे.

 

कवीलेखक दिलीप झवेरी लिखित 'भगवाननी वातो'  कवितासंग्रहाविषयी

गुजराती भाषेचे ज्येष्ठ कवी लेखक आणि  समीक्षक दिलीप झवेरी यांचा जन्म मुंबईतील असून ते ठाणे येथे स्थायिक झाले आहेत.

'भगवाननी वातो हा गुजराती भाषेतील  16 पृथक्क गद्य कवितासंग्रह संग्रह असून एकच लांब कविता आहे. या कवितासंग्रहामध्ये ईश्वरा बद्दल जटिल कोलाज मांडलेले असल्याने हा गंभीर केंद्रीय विषय आहे. हा कवितासंग्रह नाजूकपणे रोजच्या बोली भाषेत मांडलेला आहे. या कविता संग्रहामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाला एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये राजकीय व्यवस्थाविज्ञानइतिहास  भूतकाळ आणि वर्तमान का यांचे एकत्रित मिलाफ करून कविता गुंफल्या आहेत.

 

कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार समालोचक आणि अनुवादक मुकेश थळी  यांना त्यांच्या 'रंगतरंग निबंध संग्रहासाठी आज साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रंगतरंग या निबंध संग्रहात एकूण 24  वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिलेले आहेत. या निबंधाची भाषा अत्यंत काव्यात्मक सुंदर तथा सहज स्पष्ट आणि आकर्षक अशी आहे. यामध्ये म्हणी, वाक्यप्रचार यांचा उपयोग करण्यात आला असून जी वाचकांना चकित करते.

 

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सर्वच सन्मानित साहित्यिक उद्या साहित्य अकादमी परिसरातील नर्मदा या सभागृहात  सकाळी दहा वाजता त्यांच्या  पुरस्कार प्राप्त साहित्य विषयी संवाद साधतील.

गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन

 गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने

 विशेष कार्यक्रमांचे आयोजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि.8 – गुरु तेग बहादुर यांच्या शहादीच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्यावतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलतांना सांगितले.

 

गोरेगावनेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले "गुरु तेग बहादुरजींनी देशधर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो." त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्यागनिःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईलअसे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत  गुरुजनांनी संरक्षण केलेतर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

रागोपनिषद'व्दारे शास्त्रीय संगीताचे जतन, संवर्धन

 रागोपनिषद'व्दारे शास्त्रीय संगीताचे जतनसंवर्धन

                                                                                    -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रागोपनिषद ग्रंथ आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन

 

मुंबई. दि.8 :- भारतीय शास्त्रीय संगीतात अद्भुत शक्ती असून याची अनुभूती आपण वेळोवेळी घेतो. हा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला असून रागोपनिषद या ग्रंथाद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन व संवर्धन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते संवादिनीचे सूर छेडून रागोपनिषद या ग्रंथाचे आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढागुजरातचे गृहमंत्री हर्षद भाई सांगवी,आमदार पराग अळवणीविद्या ठाकूरगच्छाधिपती कल्पतरू सूरी महाराजतीर्थभद्र सूरी महाराजपन्यास तीर्थ रुची महाराजपन्यास कल्पजीत महाराजतीर्थ रतीजी महाराज,  जिग्नेश दोशीकिरीट भन्साळी,  सनी पंड्यापृथ्वीराज कोठारी,विदुषी अश्विनी भिडे-देशपांडेपं. भरत बलवल्लीपं. आनंद भाटेव मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,सामवेद हा आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा मुलाधार आहे. असा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत तेजस्वी आहे. ते मनाला सुखावणारे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच अनेक व्याधी दूर करण्यासाठीही भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक्त ठरते हे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. दीर्घ संशोधनातून रागोपनिषद हा ग्रंथ साकारला असून विलुप्त होत असलेल्या रागांचे पुनरुज्जीवनच यानिमित्ताने करण्यात आले आहे हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

देशातील नामवंत गायकांनी यामधील रचना गायल्या आहेत हे  वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात यमन कल्याण हा राग अतिशय प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच आम्ही देखील नेहमी जनकल्याणाचाच राग आळवतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

आचार्य तीर्थभद्र सूरी महाराज म्हणालेभारतीय शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवा आपल्याला लाभला आहे. अनेक व्याधी दूर करण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या श्रवणाचा लाभ होतो हेही आपण जाणतो. रागोपनिषद हा ग्रंथ दीर्घ संशोधनातून साकारला असून देशातील नामवंत संगीत शिक्षण संस्था आपल्या अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश करणार आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

----- 000 -----

Saturday, 8 March 2025

एक महिला जी आपल्या आयुष्यात विविध कर्तव्य

 *8 मार्च  जागतिक महिला दिन* 🌹

एक महिला जी आपल्या आयुष्यात विविध कर्तव्य पार पाडते.एक मुलगी ते एक मैत्रीण,बहीण,आई आणि पत्नी. त्रिवार अभिवादन तुमच्या विविध रुपाला आणि तुमच्या धैर्यला 

कधी कधी दुर्गा,कधी लक्ष्मी ,कधी सरस्वतीच्या रुपात वावरणाऱ्या तुम्हास शतशः प्रणाम

           पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तुम्ही मात्र पुरुषापेक्षा जास्त सहनशीलताअसणाऱ्या ,म्हणुनच मातृत्वाची जबाबदारी मिळालेल्या स्त्रीत्वःला मातृत्वाला मानाचा मुजरा 🙏🌹

 आपणास महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 💐💐💐💐💐💐

Featured post

Lakshvedhi