Sunday, 9 March 2025

दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘ए आय अनझीप्ड’ या पुस्तकाचा उपयोग

 दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी ए आय  अनझीप्ड’ या पुस्तकाचा  उपयोग

    -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

 

मुंबईदि.8: ए आय  अनझीप्ड(AI Unzipped) या पुस्तकातून एआय चा दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयोग होईल. कृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञानविद्यार्थीनीविद्यार्थी व दैनंदिन कामकाजात एआय चा वापर करण्यासाठी हे पुस्तक उपयोगी होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ए आय  अनझीप्ड’ या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. अपुर्वा पालकर  यांच्या पुस्तकाचे  सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले. 

       यावेळी उपमुख्यमंत्री,  एकनाथ शिंदेमंत्रीकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग मंगलप्रभात लोढा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ. अपुर्वा पालकर,डॉ. अमित जाधवप्रकाशक मंदार जोगलेकर,  कुलसचिव रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डॉ. राजेंद्र तलवारे  उपस्थित होते.

 

ए आय  अनझीप्डया पुस्तकातून एआय चा दैनंदिन कार्यातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी एआय चा उपयोगकृत्रीम बुध्दीमत्तेमागील अद्यावत तंत्रज्ञानकृत्रीम बुध्दीमत्तेचा उद्योग क्षेत्रआरोग्य सेवाशिक्षण या क्षेत्रातील उपयोगएआय चा उपयोग कसा व करावा?, याची माहिती  तसेच एआय च्या 500 हून अधिक ओपन सोअर्स टुल्स आणि कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणेकरुन सर्वच महिलाविद्यार्थीनीविद्यार्थी व दैनंदिन कामकाजात एआय वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करायला हे पुस्तक उपयोगी होईल. 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी  या पुस्तकाच्या लेखनाबद्दल कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचे अभिनंदन केले. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे विद्यार्थीनी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या Code Without Barriers, AI Inititive with Microsoft ज्यामध्ये 10,000 विद्यार्थीनी व महिलांचे प्रशिक्षण सुरु आहेयाचेही कौतुक केले. 

 

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी   विभाग यांनी या पुस्तकाचे कौतुक करुन हे पुस्तक नक्कीच सर्व महिलाविद्यार्थीनीविद्यार्थ्यांना व दैनंदिन कामकाजात एआय वापरण्याऱ्या नव उद्योजकसंशोधक यांना उपयोगाचे ठरेलअसा विश्वास व्यक्त केला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi