Tuesday, 4 March 2025

बालस्नेही पुरस्कार २०२४’ चे वितरण* *राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार* pl share

 बालस्नेही पुरस्कार २०२४ चे वितरण*

*राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार*

*महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे*

 

मुंबईदि. ३ :  बालकांना सुरक्षितसक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने बालस्नेही पुरस्कार २०२४  समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरराज्यमंत्री पंकज भोयरआमदार संजय केळकरआमदार मनीषा कायंदेमहिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जेआयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरेआयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैनशिक्षण अधिकारी माधुरी भोसलेसदस्य नीलिमा चव्हाणजयश्री पालवेसायली पालखेडकरसंजय सिंगलचैतन्य पुरंदरेआदिसह जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी,  विभागीय आयुक्तपोलीस अधिकारीविविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह*

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या कीमहिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर  देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असूनआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

            यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीआयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून  त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.

बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षणआरोग्यसंरक्षणमूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

 बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारीउत्कृष्ट विशेषगृहउत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रमउत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारीउत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सीपोलीस अधीक्षकउत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्वसहायक पोलीस आयुक्तउत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारीपोलीस निरीक्षकउत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयपोलीस उपनिरीक्षकउत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्षसहाय्यक पोलीस निरीक्षकउत्कृष्ट बाल कल्याण समितीपोलीस हवालदारउत्कृष्ट बालगृहपोलीस शिपाईबालस्नेही पुरस्कारपोलीस अंमलदारउत्कृष्ट परिविक्षा अधिकारीउत्कृष्ट खुले निवारा गृहउत्कृष्ट काळजी वाहकउत्कृष्ट समुपदेशकउत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 

बालस्नेही पुरस्कार २०२४

उत्कृष्ट जिल्हाधिकारी :

नाशिक विभाग - श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.

नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.

पुणे विभाग - श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.

अमरावती विभाग - श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.

छत्रपती संभाजी नगर विभाग - दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.

उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :

पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.

नाशिक विभाग -            श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.

अमरावती विभाग - श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.

नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.

उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :

पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.

नागपूर विभाग - श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर

कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण

 उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :

अमरावती विभाग - श्री. गिरीष पुसदकर, अकोला

नागपूर विभाग - श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.

पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.

कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.

नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.

उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष

कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी

नाशिक विभाग- नंदुरबार.

नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी

अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.

पुणे विभाग- कोल्हापूर.

उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :

कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर

नाशिक विभाग- धुळे

अमरावती विभाग- बुलढाणा

नागपूर विभाग- गडचिरोली

पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर,  धाराशीव.

उत्कृष्ट खुले निवारागृह :

नाशिक विभाग-आस्था    नाशिक,  कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई


 

उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :

छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे,       परभणी.

अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती

कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड

नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.

उत्कृष्ट काळजी वाहक :

नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक

पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृहसांगली .

छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.

उत्कृष्ट समुपदेशक : अनिता निकम,ठाणे.

उत्कृष्ट बाल कल्याण समिती :

नागपूर विभाग - चंद्रपूर, अमरावती विभाग - यवतमाळ, कोकण विभाग - रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग -  धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग - छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी.  पुणे विभाग -  पुणे CWC-2, सातारा.

उत्कृष्ट बालगृह :

नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय,  नागपूर

छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.

अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती

पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृहकराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर

कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्पउल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.

उत्कृष्ट विशेषगृह :

छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.

अमरावती विभाग- सुर्योद्य बालगृह, अकोला.

नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.

पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी  संस्था, पंढरपूर

कोकण विभाग- MDC  होम मानखुर्द, मुंबई उपनगर.

उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :

नागपूर विभाग-  शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.

नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.

छत्रपती संभाजी नगर विभाग-  जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर

पुणे विभाग-  दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली

कोकण विभाग-             निरीक्षणगृह / बालगृहलांजा, रत्नागिरी.

उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :

कोकण विभाग - भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.

नाशिक विभाग - आधार आश्रम, नाशिक

छत्रपती संभाजी नगर विभाग - जीवन आशा ट्रस्ट ,परभणी

पुणे विभाग - जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.    


 

उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :

१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशनपुणेश्री. नागनाथ यमपल्लेजिल्हा शल्य चिकित्सकऔंध पुणे

२. डॉ. जयंत पाटीलअधीक्षकजिल्हा स्त्री रूग्णालयअकोला

३. सुनिल नायक, मुख्याध्यापक, ज्ञानविकास विदयामंदिरनंदननागपूर

४. किशोर देशपांडेसावली केअर सेंटरकोल्हापूर

५. रूद्रीतारा श्रॉफ, मुंबई.

 

बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वंयसेवी संस्था यांना सन्मानित करणे आले :

१. डॉ. कँरोलिन आँडाँयर डी व्हाँल्टरहोप फाँर चिल्ड्रन

२. युनिसेफमहाराष्ट्र

३. प्रेरणा

४. श्री. येशूदास नायडूइंटरनँशनल जस्टीस मिशन

५. श्रीमती शाहिन मिस्त्रीटिच फाँर इंडिया

६. कमिटेड कम्युनिटिज डेव्हलपमेंट ट्रस्टमुंबई

७. ओरियंट कन्सलटन्सी सर्व्हिसेसपुणे

८. श्रीमती किन्नी कौलमाइंड्स आई

९. श्रीमती आँड्रे डीमेलोमजलीस

 

उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व :

नागपूर- विशाल घोडमारे, शेखर संतोष उईके. अरूण आनंद मारकाम.

छत्रपती संभाजी नगर- कु. प्रतीक्षा तात्याराव बोर्ड, राजेश देविदास मिरगे, कु. बांगर शुभ होसराव.

पुणे - डॉ. शुभांगी किशोर भोर,

अकोला- सागर प्रकाश मोरे, योगेश गुजांळ, दिक्षा वाकोडे, प्रज्ञा वाकोडे, दिपाली इंगोले, सोनाली इंगोले. मुंबई -मनिषा खरात

 

पोलीस अधीक्षक : अमरावती ग्रामीण-  विशाल आनंद, कोल्हापूर- महेंद्र कमलाकर पंडित, वाशीम- श्री. अनुज तारे, गडचिरोली- निलोत्पल,जालना- अजयकुमार बंसल, मुंबई शहर- श्रीमती. रागसुधा आर. लातूर- सोमय मुंडे. धुळे- श्रीकांत धिवरे.  सोलापूर शहर -श्रीमती डॉ. दिपाली काळे.

सहाय्यक पोलीस आयुक्त :  पिंपरी चिंचवड शहर - डॉ. विशाल हिरे.

पोलीस निरीक्षक :मुंबई शहर- दिलीप प्रल्हाद तेजनकर, मीरा-भाईंदर वसई-विरार- सुजितकुमार तुकाराम गुंजकर, सोलापूर शहर -  महादेव राऊत, पिंपरी चिंचवड शहर - अरविंद पवार, नागपूर शहर -  महेश पाटीलबा-आंधळे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) - नंदिनी चानपुस्कार, छत्रपती संभाजीनगर - गजानन कामाजी कल्याणकर.

सहाय्यक पोलीस निरीक्षक : मुंबई शहर - दिनेश यशवंत शेलार,  नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) - संजय देविचंद्र पवार, नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) - सुधीर भालचंद्र खोडवे,  लातूर - दयानंद हरीचंद्र पाटील.

पोलीस उपनिरीक्षक :  मीरा-भाईंदर, वसई-विरार- प्रसाद शिवाजी शेनोळकर, छत्रपती संभाजी नगर शहर-इसाफ अस्मानखा पठाण आणि राधा काशिनाथ लाटे,  सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) - सुरेखा शिंदे

गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र)  - अमोल सूर्यवंशी.

पोलीस अंमलदार  : छत्रपती संभाजीनगर शहर- हिरा अशोक चिंचोलकर.

पोलीस हवालदार : लोहमार्ग मुंबई - निलीमा पदमाकर गांगवे,  पिंपरी चिंचवड शहर - दिपाली शिक्रे,

छत्रपती संभाजी शहर - वर्षा अण्णासाहेब पवार, रणजितसिंग मदनसिंग चव्हाण,  विजय उत्तमराव तेलुरे, गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र) - जमीलखाँ  पठाण,  सातारा -  पी.व्ही. वाघमारे

पोलीस शिपाई :  लोहमार्ग मुंबई - पुजा सुरेश मोहेर,  बुलढाणा (अमरावती परिक्षेत्र ) - योगिता वासुदेवराव शेळके, गोपाल मूकूंदे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) - वैशाली प्रभाकर भांदक्कर, पुनम संतोष मंजुटे, प्रिती हेतराम बुरेले, गायत्री सेवकराम बरेजु, राजेंद्र मनोहर अंबादे. सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) - अर्चना मस्के.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/


 

वृत्त क्र. ८९३


Monday, 3 March 2025

मालवणी खाजा,pl share,lokak क्लू ध्या


 

मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक,pl share

 मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक

-         कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई, दि. ३ : मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. शासन याबाबत सकारात्मक असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.  मंत्रालयात यासंदर्भात आमदार सत्याजित तांबे यांनी श्री.लोढा यांची भेट घेऊन मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.

 

सात महिन्यांपूर्वी शासनाने मिलराईट मेटेनेन्स मेकॅनिक हे वर्ग तीनचे पद सेवा नियमित केले आहे. मात्र अद्याप या कामगारांना पदोन्नती दिली गेली नसल्याचे आमदार सत्याजित तांबे यांनी निदर्शनाला आणले. पदभरती होण्यापूर्वी नव्याने अधिसूचित झालेल्या वर्ग ३ च्या सेवा प्रवेश नियमानुसार मिलराईट कामगारांना पदोन्नती द्यावीअशी मागणी तांबे यांनी केली. मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले कीकोणत्याही कामगाराचा न्याय हक्क हिरावला जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

विविध औद्योगिक प्रकल्पात रेखाचित्रांनुसार नवीन मशीन बसवणेमशीनचे भाग बसवणे किंवा बदलणेवेल्डर किंवा हायड्रॉलिक बोल्टर सारख्या विशेष साधनांचा वापर करून महाकाय मशिन्स कार्यान्वित करणे असे जिकिरीचे आणि जोखमीचे काम करणारा हा मिलराईट मेंटेनन्स कामगार आहे. मिलराईट फिटर  संदर्भातील अभ्यासक्रम विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रकल्पवीज निर्मितीखाणकाम आणि बांधकाम क्षेत्रात मिलराईट फिटर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक;

 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक;

२७ मार्चला मतदान

 

मुंबईदि. ३ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.

 

आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधीप्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६)राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०)रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र या सदस्यांची दि. २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

 

या निवडणुकीसाठी सोमवार१० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार१७ मार्च२०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार१८ मार्च२०२५ रोजी केली जाईलतर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार२० मार्च२०२५ अशी आहे. गुरूवार२७ मार्च२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च२०२५ पर्यंत पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली

महाराष्ट्र सागर मंडळाची कामकाज आढावा बैठक

 

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पीमुख्य अभियंता राजाराम गोसावीवित्त नियंत्रक व मुख्य लेखाधिकारी सारंगकरउपजिल्हाधिकारी अंजली भोसले महाव्यवस्थापक रोहित पुरीउपसंचालक (आशियाई विकास बँक) डॉ.महेश चंदूरकर उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले कीमहाराष्ट्राला व मुबंईला भव्य व निसर्गसंपन्न समुद्रकिनारा लाभलेला आहे. या जागेचा व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. या जागांच्या योग्य नियोजनातून महाराष्ट्र सागरी मंडळाला महसूल उपलब्ध होईल. अशा दृष्टीने नियोजन करावेअसेही श्री. राणे यांनी सांगितले.

कोची मेट्रो यांच्यावतीने केरळमध्ये बॅक वॉटरचा वापर करून मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबई व ठाणे या परिसरातील नद्यांच्या पाण्यात वॉटर मेट्रोसेवा सुरू केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. असा प्रस्ताव कोची मेट्रोच्या प्रतिनिधींनी मांडला. क्रिसील संस्थेच्या वतीने राज्यात नौका निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अशा प्रकल्पांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.

0000

भारत भाग्य विधाता,pl share


 

आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

 आर्थिक सक्षमीकरणातून लाडक्या बहिणींची झेप उद्योजकतेकडे

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विकसित भारत महिला उद्योजिका संमेलन

            मुंबईदि. 1 : आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास सुरू असून या प्रवासात झेप फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून बचतगटाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेकडे वळत आहेत. लाडक्या बहिणी लाडक्या उद्योजिका बनत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनच्यावतीने विकसित भारत महिला उद्योजिका 2025 च्या संमेलनाचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी, महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

            यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमउपायुक्त डॉ.प्राची जांभेकरनगरसेविका हर्षिता नार्वेकरवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, ‘झेपच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर यांच्यासह बचत गटाच्या महिला आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीजागतिक महिला दिन हा स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. यानिमित्त झेप फाउंडेशनने 500 पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांना एकत्रित केले आहे. दोन कोटीपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील महिलेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेचा लाभ महत्वपूर्ण ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी महिलांचा आपण आधार होऊ शकतो याचे समाधान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.

झेप फाउंडेशनने अशा महिलांना एकत्रित करून त्यांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. महिलांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. महिलांचेही कुटुंबातील योगदान वाढावे यासाठी हा प्रयत्न आहे. गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

ज्या महिला शासनाच्या या प्रयत्नांना साथ देत आहेत, चौकटी आणि रूढी परंपरातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना आणि ज्या भगिनी त्यांना यासाठी सहकार्य करीत आहेत अशा सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

प्रधान सचिव अश्विनी भिडे म्हणाल्या कीजिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर महिलाही आपले ध्येय गाठू शकतात. लघु उद्योगात ७० टक्के महिला कार्यरत आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही उद्यमशील बनवू शकतो. महिलांसाठी आकाश मोकळे आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम राज्य शासन करीत असून केवळ महिलांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीने हे साध्य होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी यावेळी सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

00000

Featured post

Lakshvedhi