Monday, 3 March 2025

मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक,pl share

 मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक

-         कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबई, दि. ३ : मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. शासन याबाबत सकारात्मक असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.  मंत्रालयात यासंदर्भात आमदार सत्याजित तांबे यांनी श्री.लोढा यांची भेट घेऊन मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.

 

सात महिन्यांपूर्वी शासनाने मिलराईट मेटेनेन्स मेकॅनिक हे वर्ग तीनचे पद सेवा नियमित केले आहे. मात्र अद्याप या कामगारांना पदोन्नती दिली गेली नसल्याचे आमदार सत्याजित तांबे यांनी निदर्शनाला आणले. पदभरती होण्यापूर्वी नव्याने अधिसूचित झालेल्या वर्ग ३ च्या सेवा प्रवेश नियमानुसार मिलराईट कामगारांना पदोन्नती द्यावीअशी मागणी तांबे यांनी केली. मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले कीकोणत्याही कामगाराचा न्याय हक्क हिरावला जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

विविध औद्योगिक प्रकल्पात रेखाचित्रांनुसार नवीन मशीन बसवणेमशीनचे भाग बसवणे किंवा बदलणेवेल्डर किंवा हायड्रॉलिक बोल्टर सारख्या विशेष साधनांचा वापर करून महाकाय मशिन्स कार्यान्वित करणे असे जिकिरीचे आणि जोखमीचे काम करणारा हा मिलराईट मेंटेनन्स कामगार आहे. मिलराईट फिटर  संदर्भातील अभ्यासक्रम विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रकल्पवीज निर्मितीखाणकाम आणि बांधकाम क्षेत्रात मिलराईट फिटर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi