Monday, 3 March 2025

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक;

 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक;

२७ मार्चला मतदान

 

मुंबईदि. ३ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.

 

आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधीप्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६)राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०)रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र या सदस्यांची दि. २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

 

या निवडणुकीसाठी सोमवार१० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार१७ मार्च२०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार१८ मार्च२०२५ रोजी केली जाईलतर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार२० मार्च२०२५ अशी आहे. गुरूवार२७ मार्च२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च२०२५ पर्यंत पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi