Monday, 24 February 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ल्यांना नामांकन !

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ल्यांना नामांकन !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासहकेंद्र  सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहेअसे मंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे. त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहेत्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केलीअसेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

यावेळी  शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगेपुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.


लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

 लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

 

नवी दिल्ली, 23: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य  दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,  मराठी भाषा मंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.

महाराष्ट्र शासनाच्या या दालनाला गेल्या तीन दिवसापासून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंतविधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेराज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरखासदार सुप्रिया सुळे,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूआमदार विश्वजीत कदमसीमा हिरेमोनिका राजळे तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णीलोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह मान्यवर संपादकसाहित्यिक आणि माध्यम प्रतिनिधींनी या दालनास भेट दिली.

संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषा आणि साहित्य संमेलनाबाबत यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या अंकांची आस्थेने पाहणी केली. लोकराज्यशी आपला दीर्घकाळापासून ऋणानुबंध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

या सर्व मान्यवरांनी या दालनात ठेवलेल्या लोकराज्यच्या अभिजात अंकांची पाहणी केली. महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी त्यांना विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

 

Sunday, 23 February 2025

सूर्यनमस्कार का घालायचे.....?*

 *सूर्यनमस्कार का घालायचे.....?*


आपल्याला शाळेत आठवी, नववी मध्ये शरीर शास्त्रात शिकवले आहे की, आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे  लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे.

       

आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा Volume किती? हे कसे? विचार चालेना!

         

एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.


सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा  भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. 


दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी १० ते १२ सूर्यनमस्कार घातले, तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेलच.


सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते.दररोज १२ ते १५ सूर्यनमस्कार घालायला १० ते १५ मिनीटे लागतात. सुर्योपासनाही होते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो.


 *सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ...* 


*१. ॐ  मित्राय नमः :* ‘सूर्यावर आमचे, निसर्गाचे, पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे. काळाची परिवर्तने तो घडवून जीवन देतो म्हणून मित्र.


*२. ॐ रवये नमः :* रवि म्हणजे श्रेष्ठ. सर्व तेजांत सूर्य सर्वाधिक तेज देतो आणि तेजस्वी बनवतो म्हणून रवि.


*३. ॐ सूर्याय नमः :*

 सूर्य म्हणजे प्रगती, पराक्रम.


*४. ॐ भानवे नमः :*

 वैभव देतो आणि वैभव राखतो तो भानू.


*५. ॐ खगाय नमः :* सूर्यमालेतील सगळ्या ग्रहांना तोलून धरतो, सावरतो, गती देऊन अंतरिक्षात फिरतो; म्हणून तो खग. या गतीमुळेच दिवस, रात्र, ऋतू, अयन, संवत्सर असे कालचक्र निर्माण होते; म्हणूनच तो खग.


*६. ॐ पुष्णे नमः :*

 पुष्टी देतो तो पूषन्. अन्न-वस्त्र समृद्धी देतो तो पुषन्.


*७. ॐ हिरण्यगर्भाय नमः :*

विश्वगोलाला कवटाळून असलेल्या ब्रह्मांडाची जाण देतो तो हिरण्यगर्भ. ब्रह्मांडाचा अल्पसा अंश अशा या आमच्या पृथ्वीवरचा परमात्मा तो हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे ब्रह्मांडाचे सारसर्वस्व. तो सूर्यदेव हा हिरण्यगर्भ.


*८. ॐ मरीचये नमः :* किरणे विस्तारीतो तो मरीची. सूर्यकिरणे नाना वर्णांची, नाना गुणधर्मांची असतात. काही किरणे अन्नधान्य पिकवतात, काही जीवनसत्त्वे आणि जीवन देतात, काही रोगजंतू नष्ट करतात, तर काही जीवनाला ऊर्जा पुरवतात; म्हणून तो मरीची.


*९. ॐ आदित्याय नमः :* पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जा आणि घडामोडी यांचे मूळ सूर्य आहे. ते मूळ, ते मूलत्व प्रकाशित करतो, तो आदित्य.


*१०. ॐ सवित्रे नमः :* चेतना जागवतो, प्रेरणा देतो आणि परमात्मज्ञान देतो, तो सवितृ. वेदातील सर्वश्रेष्ठ, गायत्रीमंत्राची देवता, तो 

.

*११. ॐ अर्काय नमः :* वेदमंत्रांना ‘अर्क’ म्हणतात. वेदांना ॐ ची (ॐ मधूनच वाणी प्रकटली) प्रेरणा देतो, तो अर्क.


*१२. ॐ भास्कराय नमः :*

प्रकाश, प्रज्ञा, प्रतिभा देतो, तो भास्कर.🙏🙏🙏🙏🙏

आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा

 आयुष मंत्रालयाच्या प्रसारासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण

 

मुंबईदि. 20 : आयुर्वेद व योगाभ्यास यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची निर्मिती केली. या आयुष मंत्रालयाच्या कार्याचा प्रचार व प्रसार सर्वत्र होण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहेअसे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.   

            एनसीपीए येथील जमशेद भाभा थिएटर येथे आयोजित धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा आणि देश का प्रकृती परीक्षण’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप नुकताच झाला. या कार्यक्रमात श्री. जाधव बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य. राजेश कोटेचाभारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य. जयंत देवपुजारीपद्मश्री देवेंद्र त्रिगुणावैद्य. राकेश शर्मादेश का प्रकृति परीक्षण अभियानाचे सचिव डॉ. आशुतोष गुप्तासच्चिदानंद प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून 26 नोव्हेंबर 2024 रोजी देश का प्रकृति परीक्षण हे अभियान जाहीर करण्यात आले. या अभियानाचा पहिला टप्पा 25 डिसेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला. या अभियान कालावधीत आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकृती परिक्षण केले. या एक महिन्याच्या कालावधीत या अभियानाच्या अनुषंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून एका महिन्यात सर्वाधिक प्रतिज्ञा व डिजिटल प्रमाणपत्र दाखविणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन फोटो अल्बम व समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा व्हिडीओ अल्बम तयार करण्यात आला. आयुष मंत्रालयाची व्याप्ती वाढवून आयुर्वेदाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी धन्वंतरी दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचप्रमाणे जेनेरिक औषध केंद्रांच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. तसेच भविष्यात आयुष मंत्रालयाच्या कामकाजात एआय’ चा वापर करण्यात येईलअसेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.

            धन्वंतरी पुरस्कारार्थी तसेच आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या विविध पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेआयुर्वेदयोगाचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार करण्यासोबतच देशात देश का प्रकृती परिक्षण’ अभियान राबविण्यात आले. त्याचपद्धतीने राज्याच्या अर्थसंकल्पातदेखील आयुष किंवा आयुर्वेदासाठी तरतूद करण्यावर भर देण्यात येईलअसे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. 

धन्वंतरी पुरस्कारार्थी :

            1. वैद्य माया राम उनियाल 2. वैद्य ताराचंद शर्मा, 3. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना रुपये 5 लाखाचा धनादेश व स्मृती चिन्हकलश व सन्मानपत्र देऊन धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याचप्रमाणे देश का प्रकृती परिक्षण अभियानाच्या कालावधीत :

1. एका महिन्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 2. एका आठवड्यात आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 3. 24 तासांत आरोग्य अभियानासाठी सर्वाधिक प्रतिज्ञा मिळाल्या. 4. डिजिटल प्रमाणपत्र दाखवणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम / पिन बॅज घातलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन फोटो अल्बम. 5. समान वाक्य बोलणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम.

या पाच बाबींसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे जाहीर करून त्याबाबतचे प्रमाणपत्र या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले.

यासोबतच देश का प्रकृति परीक्षण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा व देशातील आयुर्वेदिक महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी केले तर आभार सच्चिदानंद प्रसाद यांनी मानले.

0000

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत

10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 

            मुंबई, दि. 23 :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलगिरीष महाजनशंभुराज देसाईआमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाडॲड.अनिल परबहेमंत पाटीलश्रीकांत भारतीयछगन भुजबळजितेंद्र आव्हाडडॉ.नितीन राऊतरणधीर सावरकरअमिन पटेलविधिमंडळ सचिव (1) जितेंद्र भोळेसचिव (2) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. 13 मार्च 2025 रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला

  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

 

मुंबईदि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे.

महाराष्ट्र शासनाने 'मराठा लष्करी भूप्रदेश' (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगडराजगडप्रतापगडपन्हाळाशिवनेरीलोहगडसाल्हेरसिंधुदुर्गसुवर्णदुर्गविजयदुर्गखांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

युनेस्कोकडे पाठवलात्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री ॲड.शेलार यांनी आभार मानले आहेत.

या प्रस्तावाच्या अनुषंगानेमहाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी२०२५ या कालावधीत पॅरिसफ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगेपुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारेया किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यासया किल्ल्यांचे जतनसंवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्व आणि जतन सुनिश्चित होईलअशी आशा ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

00000


संत गाडगेबाबा जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादनm


 संत गाडगेबाबा जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन


 


मुंबई, दि. 23 - संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


0000


संत गाडगेबाबा जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन


 


मुंबई, दि. 23 - संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आज मंत्रालयातील तळमजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.


 


यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित 

होते.


 


00000


Featured post

Lakshvedhi