लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी
नवी दिल्ली, 23: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत , विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या या दालनाला गेल्या तीन दिवसापासून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, आमदार विश्वजीत कदम, सीमा हिरे, मोनिका राजळे तसेच मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह मान्यवर संपादक, साहित्यिक आणि माध्यम प्रतिनिधींनी या दालनास भेट दिली.
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी मराठी भाषा आणि साहित्य संमेलनाबाबत यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या अंकांची आस्थेने पाहणी केली. लोकराज्यशी आपला दीर्घकाळापासून ऋणानुबंध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या सर्व मान्यवरांनी या दालनात ठेवलेल्या लोकराज्यच्या अभिजात अंकांची पाहणी केली. महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी त्यांना विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment