Sunday, 23 February 2025

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत

10 मार्च रोजी अर्थसंकल्प

 

            मुंबई, दि. 23 :- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलगिरीष महाजनशंभुराज देसाईआमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाडॲड.अनिल परबहेमंत पाटीलश्रीकांत भारतीयछगन भुजबळजितेंद्र आव्हाडडॉ.नितीन राऊतरणधीर सावरकरअमिन पटेलविधिमंडळ सचिव (1) जितेंद्र भोळेसचिव (2) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. 13 मार्च 2025 रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi