Friday, 21 February 2025

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक

 राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोलीस्वच्छता सुविधांची पाहणी

स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक

सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई, दि. 21 : सामाजिक दायित्व निधीतून समाजकार्य अनिवार्य केल्यापासून गेल्या दशकामध्ये शिक्षणआरोग्यपर्यावरण यांसह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य झाले असून या निधीतून होत असलेले शासकीय व निमशासकीय शाळांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.     

राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज परळ मुंबई येथील श्री तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालयास भेट देऊन तेथे सामाजिक दायित्व निधीतून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट वर्गखोल्यांची तसेच स्वच्छतागृहांची पाहणी केलीत्यानंतर ते बोलत होते.

स्मार्ट क्लासरूम व डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देताना स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक आहे असे सांगून शिक्षक परिवर्तनासाठी तयार नसल्यास आधुनिक सुविधांचा लाभ अपेक्षित प्रमाणात पोहोचणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

'युवा अनस्टॉपेबलया अशासकीय संस्थेच्या पुढाकाराने शाळांच्या अद्ययावतीकरणाची देशव्यापी मोहीम राबविण्यात आली असून त्या योजनेअंतर्गत शाळेला स्मार्ट क्लासरूम व आधुनिक स्वच्छतागृहे  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.   

पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक परिवर्तनकारी उपक्रम राबविण्यात येत असून 'स्वच्छ भारतउपक्रमाअंतर्गत  रेल्वेमध्ये बायो टॉयलेट बसविल्यामुळे देशातील रेल्वे स्थानके स्वच्छ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

शाळांमध्ये आधुनिक स्वच्छतागृहे बसवून देताना तेथे पुरेसे पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी संस्थांना केली. 

यावेळी राज्यपालांनी मुलांना परस्पर संवादी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या विज्ञान - तंत्रज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली तसेच शाळेत नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधा आणि स्मार्ट वर्गखोल्यांची पाहणी केली. 

या प्रसंगी युवा अनस्टॉपेबलचे संस्थापक अमिताभ शहाएचडीएफसी बँक 'परिवर्तनउपक्रमाच्या प्रमुख नुसरत पठाणलेखक अमीश त्रिपाठीपार्थ वसवडा (युवा अनस्टॉपेबल)कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते आणि युवा अनस्टॉपेबलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. 

राज्यपालांच्या हस्ते टाटा कॅपिटलबँक ऑफ अमेरिकाजीएसकेनोमुराकॅपजेमिनीनुवामाएचडीएफसी बँकबजाज इलेक्ट्रिकल्सयेस बँकफिनोलेक्स आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या योगदानाबद्दल 'युवा कृतज्ञता पुरस्कारप्रदान करण्यात आले.  

००००

आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद

 आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद

-राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई, दि. 21 : आसियान देशांमधून भारत भेटीवर आलेल्या महिला उद्योजिका फिक्की महिला आघाडीच्या सहकार्याने भारतातील उद्योगांशी करीत असलेले परस्पर सहकार्य कौतुकास्पद असून यातून सर्व देशांमधील महिला उद्योजकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले. 

भारत आणि आसियान देशांमधील २० आघाडीच्या महिला उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

भारत आणि आसियान देशांमधील उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सर्व देश परस्परांशी थेट विमानसेवेने जोडणे आवश्यक आहे असे सांगून नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरु होत असून त्यानंतर मुंबई अनेक देशांशी थेट विमान सेवेने जोडले जाईल व त्यातून उद्योगांना चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाहून तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत असून भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी सध्याची वेळ अतिशय योग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महिला उद्योजिकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना धन्यवाद दिले.     

आसियान देशांमधील महिला उद्योजक नेत्यांच्या या भेटीचे आयोजन फिक्की संसथेच्या महिला विभागाद्वारे करण्यात आले होते.

यावेळी फिक्की मुंबई महिला विभागाच्या अध्यक्षा आर्मीन दोर्डी व आसियान इंडिया अध्यक्षा विनिता बिंबेट यांनी महिला उद्योजिकांच्या भारत भेटीबाबत माहिती दिली.

फिलिपिन्स येथील संस्थेच्या आसियान सह-अध्यक्षा पॅसीटा जुआनउद्योजिका मारिया ख्रिस्तिना कॉन्सेपसियान,  तसेच इतर फिलिपिन्स आणि म्यानमार येथील महिला उद्योजिका यावेळी उपस्थित होत्या. 

आसियान देशांतील महिला उद्योजिका आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी भारतभेटीवर आल्या आहेत.

००००

महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे

 महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे

अपर मुख्य सचिव राजेश कुमार

·         महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ 

·         माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण  

 नांदेड दि. 21 :- कोणत्याही राज्याचीजिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरतेराज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमवृत्ती व सचोटीवर ठरते.  महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहेअसे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज येथे केलेमहसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये करण्यात आलेध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.  

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी नांदेडमध्ये संपन्न होत आहेतआज श्रीगुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झालायावेळी खासदार डॉअजित गोपछडेखासदार प्रारविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार श्रीजया चव्हाणअपर मुख्य सचिव राजेशकुमारविभागीय आयुक्त डॉदिलीप गावडे,निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरेजीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळहिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयलरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉमहेश डोईफोडेअपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डेअपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरअपर आयुक्त प्रदिप कुलकर्णीनितीन महाजनसहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मामेघना कावली,  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.  

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केलाया स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडेनांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेयांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केलेनांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधानिवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतातअसे त्यांनी स्पष्ट केले.  

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतोयामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहेअगदी शिपाई पासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतोही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषण करतांना महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढलेत्यांनी कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचे सांगितलेया स्पर्धांना निधी कमी पडणार नाहीअशी तरतूद करण्याची सूचना केलीतत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केलेतसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली.  

याप्रसंगी खासदार डॉअजित गोपछडेखासदार रविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केलेयावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवारमहाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवारमहाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकरमहाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉसचिन खल्लाळमहाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियेळे यांनीही संबोधित केलेयावेळी अविरत महसूल या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आलेराज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेतपुढील दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 

मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे

 मुंबईतील ओव्हलआझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी

सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा;

मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 21:- खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदानआझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूलक्रीडासार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्रसर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईतील आझाद मैदानक्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (दूरदृश्य प्रणालीद्वारे)क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजसार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते)चे सचिव सदाशिव साळुंखेक्रीडा विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे सहसचिव दीपक देसाईमहसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकमनगरविकास विभागाचे सहसचिव निर्मलकुमार चौधरीविधी व न्याय विभागाच्या उपसचिव मनिषा कदममुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र कटकधोंडमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकउपाध्यक्ष संजय नाईकसचिव अभय हडपसहसचिव दीपक पाटीलखजिनदार अरमान मल्लिककार्यकारी सचिव सी. एस. नाईकसदस्य संदीप विचारेप्रमोद यादव आणि महाव्यवस्थापक किंजल पटेल आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुंबईतील आझाद मैदानओव्हल मैदान व क्रॉस मैदान ही सर्व खेळांसाठी महत्त्वाची मैदाने आहेत. या मैदानांवर हजारो क्रीडापटू रोज विविध क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षणासह  खेळाचा सराव करत असतात. या तिन्ही मैदानाची मालकी महसूल विभागाची आहे. क्रीडा विभागामार्फत ती खेळाच्या क्लबला भाडेपट्टा कराराने देण्यात येतात. सध्या या तिन्ही मैदानांवरील भूखंडांवर साठहून अधिक क्लब खेळाडूंना प्रशिक्षणाच्या व सरावाच्या सुविधा देतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून तो पुन्हा करण्यासाठी महसूल विभागक्रीडा विभागसार्वजनिक बांधकाम विभाग व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने एक स्वतंत्रसर्वसमावेशक धोरण तयार करावे. हे नव्याने तयार करण्यात येणारे धोरण मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. महसूलक्रीडासार्वजनिक बांधकाम व नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            तसेच आझाद मैदानओव्हल मैदान व क्रॉस मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीही स्वच्छतागृहे अत्याधुनिक करताना खेळाच्या सरावाला बाधा येऊ नयेततसेच मैदानाचे सौंदर्य खराब होऊ नये याची दक्षता घेत ती मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुलाखत

मुंबई दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले 'रस्ता सुरक्षा अभियानव विविध उपक्रमयाविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात आयुक्त श्री. भीमनवार यांची मुलाखत मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात 'रस्ता सुरक्षा अभियानराबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गनहेल्मेटचा वापर करणेविभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणेजुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबीयाविषयी परिवहन आयुक्त श्री. भीमनवार यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

मुंबईतील ओव्हल, आझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे

 मुंबईतील ओव्हलआझादसह क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी

सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा;

मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 21:- खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदानआझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूलक्रीडासार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्रसर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईतील आझाद मैदानक्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (दूरदृश्य प्रणालीद्वारे)क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराजसार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते)चे सचिव सदाशिव साळुंखेक्रीडा विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे सहसचिव दीपक देसाईमहसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकमनगरविकास विभागाचे सहसचिव निर्मलकुमार चौधरीविधी व न्याय विभागाच्या उपसचिव मनिषा कदममुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र कटकधोंडमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकउपाध्यक्ष संजय नाईकसचिव अभय हडपसहसचिव दीपक पाटीलखजिनदार अरमान मल्लिककार्यकारी सचिव सी. एस. नाईकसदस्य संदीप विचारेप्रमोद यादव आणि महाव्यवस्थापक किंजल पटेल आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुंबईतील आझाद मैदानओव्हल मैदान व क्रॉस मैदान ही सर्व खेळांसाठी महत्त्वाची मैदाने आहेत. या मैदानांवर हजारो क्रीडापटू रोज विविध क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षणासह  खेळाचा सराव करत असतात. या तिन्ही मैदानाची मालकी महसूल विभागाची आहे. क्रीडा विभागामार्फत ती खेळाच्या क्लबला भाडेपट्टा कराराने देण्यात येतात. सध्या या तिन्ही मैदानांवरील भूखंडांवर साठहून अधिक क्लब खेळाडूंना प्रशिक्षणाच्या व सरावाच्या सुविधा देतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून तो पुन्हा करण्यासाठी महसूल विभागक्रीडा विभागसार्वजनिक बांधकाम विभाग व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने एक स्वतंत्रसर्वसमावेशक धोरण तयार करावे. हे नव्याने तयार करण्यात येणारे धोरण मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. महसूलक्रीडासार्वजनिक बांधकाम व नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            तसेच आझाद मैदानओव्हल मैदान व क्रॉस मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीही स्वच्छतागृहे अत्याधुनिक करताना खेळाच्या सरावाला बाधा येऊ नयेततसेच मैदानाचे सौंदर्य खराब होऊ नये याची दक्षता घेत ती मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या

लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

 लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटनखनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात लोणार सरोवराच्या जतनसंवर्धनआणि विकास आराखडा संदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटीलएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीतसेच व्हीसीद्वारे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटीलसहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोडपुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही अनेकवेळा येथे येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी. पर्यटन विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगणसंग्रहालयचिल्ड्रन पार्कगार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का, यासंदर्भात पाहणी करावी.

****

Featured post

Lakshvedhi