Friday, 21 February 2025

महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे

 महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे

अपर मुख्य सचिव राजेश कुमार

·         महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ 

·         माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण  

 

 नांदेड दि. 21 :- कोणत्याही राज्याचीजिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरतेराज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमवृत्ती व सचोटीवर ठरते.  महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहेअसे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज येथे केलेमहसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये करण्यात आलेध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.  

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी नांदेडमध्ये संपन्न होत आहेतआज श्रीगुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झालायावेळी खासदार डॉअजित गोपछडेखासदार प्रारविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार श्रीजया चव्हाणअपर मुख्य सचिव राजेशकुमारविभागीय आयुक्त डॉदिलीप गावडे,निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरेजीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळहिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयलरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालमनपा आयुक्त डॉमहेश डोईफोडेअपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डेअपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरअपर आयुक्त प्रदिप कुलकर्णीनितीन महाजनसहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मामेघना कावली,  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.  

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केलाया स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडेनांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेयांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केलेनांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधानिवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतातअसे त्यांनी स्पष्ट केले.  

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतोयामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहेअगदी शिपाई पासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतोही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषण करतांना महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढलेत्यांनी कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचे सांगितलेया स्पर्धांना निधी कमी पडणार नाहीअशी तरतूद करण्याची सूचना केलीतत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केलेतसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली.  

याप्रसंगी खासदार डॉअजित गोपछडेखासदार रविंद्र चव्हाणआमदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार जितेश अंतापूरकरआमदार आनंद तिडकेआमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केलेयावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवारमहाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवारमहाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकरमहाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉसचिन खल्लाळमहाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियेळे यांनीही संबोधित केलेयावेळी अविरत महसूल या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आलेराज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेतपुढील दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi