Friday, 21 February 2025

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मुलाखत

 

मुंबई दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले 'रस्ता सुरक्षा अभियानव विविध उपक्रमयाविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

 

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात आयुक्त श्री. भीमनवार यांची मुलाखत मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.

 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात 'रस्ता सुरक्षा अभियानराबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गनहेल्मेटचा वापर करणेविभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणेजुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबीयाविषयी परिवहन आयुक्त श्री. भीमनवार यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi