Wednesday, 19 February 2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेचे आयोजन

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजीजय भारतपदयात्रेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी 'जय शिवाजीजय भारतपदयात्रा

- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

 

पुणेदि. 19: छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचारअठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरितामहिलांच्या कल्याणाचासन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी 'जय शिवाजीजय भारतपदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित 'जय शिवाजीजय भारतपदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवियाकेंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेमुरलीधर मोहोळराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलक्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेसांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारखासदार मेधा कुलकर्णीआमदार सिद्धार्थ शिरोळेहेमंत रासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणालेज्यावेळी भारतात अनाचारअंध:कार होता आणि भारतातील अनेक राजे रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते. मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते. अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलविला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले. संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याची देण दिली.

ते पुढे म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते. शेतकऱ्यांचे कल्याणजलसंवर्धनजंगलांचे संवर्धनउत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माणआरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदीसागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट

 आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

पुणेदि. 19: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलसांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारखासदार मेधा कुलकर्णीउदयनराजे भोसलेआमदार उमा खापरेअमित गोरखेविजय शिवतारेभीमराव तापकीरसुनील कांबळेनानासाहेब जाधवरविंद्र वंजारवाडकरशिवसृष्टीचे जगदीश कदमविनय सहस्त्रबुद्धेअमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्येउत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला.  त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केलीअसे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे 21 फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणालेशासनाने शिवसृष्टीला मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये 36 मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणालेदेशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचनापाण्याच व्यवस्थापनबाजार व्यवस्थाकिल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणालेशिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावेअसेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्यस्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालनगंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0000


 


निसर्ग, कोणीतरी कोणापेक्षा शक्तिमान असतो


 

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह; 11 ते 17 फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

 आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह;

11 ते 17 फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

 

मुंबईदि. 19 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयमुंबई या संस्थेच्या मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी, 2025 दरम्यान "मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह" साजरा करण्यात आला.

            मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये 11 फेब्रुवारी 2025 रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. तसेच सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडेमुख शल्यचिकित्साशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. अशोक डबीरमहाराष्ट्र राज्य मुख शल्यचिकित्साशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण शेनॉय यांच्यासह मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) आदी उपस्थित होते.

            त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारी 2025, रोजी शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात येणाऱ्‍या टाक्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा तसेच मुख कर्करोगावरील जनजागृतीसाठी व्हिडिओ आणि पोस्टर बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी विभागाने मरिनड्राईव्हच्या परिसरात मुखकर्करोगाची आणि तंबाखूच्या हानिकारक परिणामांची जनजागृती करण्यासाठी एका वॉकथॉन कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच माहिती पत्रिकांचे वितरण केले. तसेच 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुखकर्करोगाची तपासणी व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबीरामध्ये एक हजार 779 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये टॅक्सीचालकांचे समुपदेशन करुन तंबाखू सेवनाने होणाऱ्‍या आजारांबाबत माहिती देवून मुख शल्यचिकित्साशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमार्फत प्राप्त ध्वनीचित्रफित देखील शिबिरादरम्यान प्रदर्शित करुन जनजागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाचे आयोजन मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अभिलाषा यादव यांनी केले होते. 

 

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही

 किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटकिल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहेते आपले शक्तीस्थानस्फूर्तीस्थान असून त्यांचे जतनसंवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने

किल्ले शिवनेरीरायगडप्रतापगडसिंहगडपुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेतकिल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाहीअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंगत्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हितजनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपान्यायसुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुयामहाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीनेएकदिलाने काम करुयाशिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावेहीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेलअसे श्री. पवार म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध

 छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध







-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा 'सर्वसमावेशक कारभारडोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे,  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईलअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकीस्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जाप्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्लेजुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतअसे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडाआग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिकविद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरुm

 किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि. 19: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेतअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारेमाजी आमदार अतुल बेनकेकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीजिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचकेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलजिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुखउपवनसंरक्षक अमोल सातपुतेमराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होतेशिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजाश्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाहीयाबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्रजलसंवर्धनपर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतीलअशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजेराजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचारअत्याचार सुरु होते. माँ. जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केलीयामाध्यमातून देवदेश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या 140 कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या 5 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्तीतेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

Featured post

Lakshvedhi