Sunday, 16 February 2025

आरोग्य फक्त आपल्या हातात!!हे वाचून नक्कीच फ्री मेडिकल चेकअप ची पायरी लोक चढणार नाहीत.*pl share

 *हे वाचून नक्कीच फ्री मेडिकल चेकअप ची पायरी लोक चढणार नाहीत.*

*लक्षपूृर्वक वाचावा असा लेख.*

अहमदनगर आयुर्वेद एक्सपो मध्ये वैद्य सुविनय दामले सर यांनी दिलेल्या व्याख्यानाचा सारांश.

✍..आरोग्य फक्त आपल्या हातात!!

अनेक वेळेस अनेक मेडीकल चेकअप कॅम्प्स लावले जातात  तज्ञ डाॅक्टर येणार, आधुनिक यंत्रानी तपासण्या होणार, भविष्यातील रोगाचे निदान लवकर होणार, अर्ध्या किंमतीत तपासण्या, तपासणी पॅकेज ऑफर..

अशा कोणत्याही आमिषांना कुणी बळी पडू नये.🙏🙏🙏

एक वैद्य / डाॅक्टर म्हणून कुणीही असं जाहीरपणे सांगणार नाही.. पण... बुडते हे जन देखवेना डोळा.... म्हणून सांगायचं धाडस करतोय....

खरं सांगायचं तर अशा फ्री चेक  कॅम्प मधूनच नवीन नवीन रोग जन्माला घातले जातात. कुठेतरी रिपोर्ट मधे जरा कमी जरा जास्त दाखवले जाते. 

पण एक किडा डोक्यात सोडून दिला जातो. नसलेल्या रोगावर स्लो पाॅयझन औषधे सुरू होतात. कॅल्शियम कमी, थोडंस बीपी, थोड्डासा इसीजीतला बदल, कदाचित कॅन्सर होऊ शकेल अशी एवढुशी गाठ, थायराॅईड वाढतंय, शुगर बाॅर्डरवर आलीय, कोलेस्टेरॉल वाढलंय...

अश्या अनेक लक्षणांपैकी प्रत्येकाला एक एक संभाव्य धोकेदायक भीती सांगितली जातात. आपणही, "चला आता औषधाना सुरवात झाली..." असं स्वतःच कौतुक करीत एकच गोळी खायला सुरवात करतो. 

( सुरवातीला अभिमानाने फाईल फिरवली जाते. मोठ्या मोठ्या सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलची नावे घ्यायला, इम्प्रेशन मारायला जरा बरं वाटतं...)

असं करता करता किती वर्ष आपण नाहक केमिकलची गोळी खातोय, हे पण लक्षात येत नाही.

जसं, जरासा रक्तदाब वाढला की एक गोळी आयुष्यभरासाठी सुरू होते, ( ज्या रक्तदाबाचा खरंतर आपल्याला काहीच त्रास नसतो  आणि काहीवेळा रक्तदाब वाढणे ही शरीराची गरज पण असते....)

त्या गोळीने लघवीला जास्ती होते . रक्तातील पाणी जबरदस्तीने बाहेर काढले जाते. ताण निर्माण करतो मनावर...

टेन्शन मेंदुला, 🧠 रोगाचे नाव रक्ताशी संबंधीत असलेल्या 🫀 ह्रदयावर... आणि औषध जातंय किडनीवर काम करायला !  यालाच म्हणतात रोग मांडीला औषध शेंडीला.. असो ! 

.....तर लघवीला जास्त झाल्याने रक्ताची पीएच बदलते. थोडक्यात रक्त जाड होते. 

आता रक्त पातळ करणारी गोळी सुरू होते. ही एस्पीरीनची एकच गोळी, ह्दयातील रक्त पातळ करताकरता सर्व अंगातील रक्त पातळ करते. (ही गोळी बाकी सर्व अवयवतज्ञांना देखील नको असते. जसे डेंटीस्ट,🦷 सर्जन, ऑर्थोपेडीक्स,👨‍🦽 गॅस्ट्रोएन्टराॅलाॅजिस्ट, इ.इ. कारण या गोळीने रक्त ❣गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ) परिणामी महत्वाच्या अवयवातील रक्ताची पीएच बदलते. ते अवयव कमजोर व्हायला लागतात. (दुधात पाणी घातलेल्या चहाचा आनंद कसा मिळेल. 🤨 ) अवयवांची उपासमार सुरू होते. अधिक केमिकलची भर रक्तात पडत जाते. तेवढे केमिकल बाहेर काढायला यकृत, किडनी, फुप्फुसे, गर्भाशय इ. अवयवांना आपण छळतो.

आवश्यकतेपेक्षा  रक्त जाड झाल्याने चिकटपणा वाढतो, (त्याला एलोपॅथीनुसार कोलेस्टेरॉल म्हणतात.) आणि चरबी चिकटणे सुरू होते.... 

इथेच फॅटी लिव्हर (या नसलेल्या आजाराचा ) जन्म होतो.

"आता त्यावरची गोळी सुरू करूया."

आता येतो औषधातील स्टॅटीन गट !  या गटातील औषधी सुरू झाल्या की रक्तातील साखर वाढायला सुरवात होते. 🧊 म्हणजे रिपोर्ट मधे डायबेटिस दिसतो.  (प्रत्यक्षात डायबेटिसचे एकही लक्षण रुग्णाला जाणवत नसते. मी याला टाईप 3 डायबेटिस म्हणतो.😶) 

अशीच पाच सहा वर्षे जातात. अजूनही एकही औषध बंद होत नाही. 

कधीतरी थायराॅईड तपासले तर ते पण हट्टाने वाढते किंवा कमी होते.... त्याचीच कमी होती... सुरवातीला 25 नंतर 50...100 अशी चढती भाजणी सुरू होते. आणि समप्रमाणात साईड इफेक्ट्स पण ! 

याच गोळ्यांचा परिणाम म्हणून क्रिएटीनीन वाढत जाते. आता ... ?

 डायलेसीस... 😡😡

तोपर्यंत भरल्या खात्यापित्या घरात😽 चार वेळेस जेऊन सुद्धा जीवनसत्वांची कमतरता दिसायला लागते. मग.... ?

 व्हिटॅमिन्सचा मारा सुरू होतो.

Vit A, B, C D ...Z पर्यंत गोळ्या सुरू होतात. ज्यांची खरंतर गरजच नसते.

आता... ? 

अनावश्यक केमिकल, सांध्यांच्या आजूबाजूला जमायला सुरवात झालेली असते. 

दुखतंय दुखतंय या गोंडस नावाने व्यायामाला फाटा देऊन, कमोडवर बसायला सुरवात झालेली असते. डाॅक्टरनी, "तुमच्यासाठी हा एकच व्यायाम आहे,"असं सांगितल्यामुळे वाढलेली ढेरी सांभाळत, गुडघ्यावर भार टाकत, एका बाजूने लंगडत चालायला सुरवात केली जाते. 

माॅर्निंग वाॅकच्या 🏃‍♀🏃‍♂ क्रेझपायी ( सक्काळी सक्काळी चालणे हा भारतीय व्यायाम प्रकारच नाही. )  आमचे सांधे आणखीनच झिजवले जातात. 

आता वेदनाशामक औषधे आत जायला लागतात. आतड्यांची कोमल त्वचा जळायला लागलेली असते.

पोटदुखी सुरू होती. त्याच्या तपासण्या आणि स्कोपी.. सगळ्या छिद्रातून आतमधे नळ्या घालून तपासून त्यातून अल्सर, टीबीची लक्षणे ते अगदी कॅन्सर पर्यंत शंका डाॅक्टर घेतातच. या खरंतर फक्त शंकाच असतात. बहुतेक वेळेस खरं काहीच नसतं.... केवळ सस्पेक्ट ऑफ.... असतं. 

काही महाभाग वाॅटसप एफबीचे सल्ले वाचून, जाहीरातींना बळी पडून तोडकरी आयुर्वेदीय बोगस सल्ले, एमवे हेल्थ, नोनी, आणि नको नको ती औषधे स्वतःच्या मनाने खातच असतात  (म्हणे आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात....किती खोटं ? अहो, ज्याला इफेक्ट्स असतात, त्याला साईड इफेक्ट्स असणारच ना ! असो. ) यासाठी कायम आयुर्वेदातील तज्ञ, शासनमान्य अधिकृत वैद्यांचा सल्ला घ्यावा. 

एव्हाना दहा पंधरा प्रकारच्या गोळ्या सुरू झालेल्या असतात.

( बिचार्‍या पोटाने काय काय केमिकल सहन करायची ? )

 कुणीतरी आयुर्वेदातील तज्ञ गाठतोही, पण आधीच्या केमिकलच्या गोळ्या औषधे सुरू ठेवून स्वतःची चूर्णे, गोळ्या वट्या ते वैद्य देतातच. 

एवढं करून छातीत, पाठीत दुखणं सुरूच असतं.

फाईलमधील  कागद वाढतच जातात....

गोळ्या, 💉 औषधे सुरूच असतात...

गुण चार आणे पण नाही..

दुखणे वाढतच असते...

बाहेरची बाधा तपासून अंगारे धुपारेही होतात..☠

वास्तुशास्त्रानुसार ⚒🪚 तोडफोड होते...

नवीन रत्न, ♦️🟣आभूषणे खरेदी होते...

लांबलांबचे वैदू, डाॅक्टरही🩺 पाठी पडतात...

पण कोणालाच अचूक निदान☹️ मिळत नाही....

'एनर्जी' 💪💪काही वाढत नाही....

'इमर्जन्सीमधे' इसीजी, स्ट्रेसटेस्ट, एन्जियोग्राफी, लगेचच इमर्जन्सी एन्जीयोप्लास्टी 😡 करायला भागच पाडले जाते.

 ज्या कारणासाठी डाॅक्टरकडे जातोय, ते कारण/लक्षण बाजूलाच रहाते आणि नकोतेच निदान बाहेर येते आणि नकोती औषधे, नको ते पथ्य, पुनः त्यातून कमतरता... कायम स्वरूपी पाठी लागतात.

*बघा पटतंय का ? 👊*

याची सुरवात कुठुन झाली.. ते आठवा... फ्री चेकअप कॅम्प्स अथवा स्वतःच्या मनाने करवून घेतलेल्या तपासण्या, किंवा सहजपणे डाॅक्टरनी सांगितलेल्या आरोग्य तपासण्या ! ... आणि फक्त एकच 💊 गोळी ! 

*यालाच म्हणतात आ बैल मुझे मार !*

आता काय करायचं हे आपण ठरवा.

पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

उगाच वाद घालत अथवा शंका घेत राहू नका.!    

*आरोग्यमं धन संपदा!*

*आनंदी रहा,  हसत रहा!*

म्हणूनचं तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात व्यायामाने करु या 💪

सायबर expert, PL share


 

बायको वाल्याकोळयाची

 🌷 *बायको वाल्याकोळयाची*🌷

*वाचायला जर विचित्र वाटतंय ना ?*पण आज तिचीच गरज आहे*


 बायको कशी असावी ?

 बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी.....


   रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.          

रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!


   'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!

 'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', 

भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',

 'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'

 'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'


*सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?*


        मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. 

तो म्हणजे,


*'बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'*


  *कारण तीच खरी रामायणकर्त्याची 'कर्ती ' आहे !* हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.


  रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.


  वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात

अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. 

*एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले!*


*'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी'!* 

   असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात!

 *'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?*

'तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो' असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. 

*वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?'*


   आता असा विचार करा! *शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार?*


*पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता,  *'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!'* असे सडेतोडपणे सांगितले.


नंतर 


*तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.*


  गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. 

*तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा *वाल्मिकीऋषी*  होऊन  *रामायण*   हे महाकाव्य रचतो.


   ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की, 

*समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने,  'व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !' असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?*


     *नारदाचं काही खरं नव्हतंच पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?*

 अशी रास्त शंका घेता येऊ शकते !


  *पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या " "सुसंस्कृत भारतीय गृहिणी"  नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!*


 फक्त त्यांनी *वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे.*

 असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल ! 

       *पुन्हा एकदा आपल्या भारत 'भू' वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल...यात शंकाच नाही...!!!*

हा लेख मला एका ग्रुप वर आला होता तो तसाच्या तसाच पुढे पाठवला आहे. 


*वाचण्यात आलेला सुंदर लेख*🕉️🕉️🕉️

मानवी शरीर रचना...* *विधात्याची अमूल्य देणगी*... (संग्रह करावा असाच लेख)

 *👌 मानवी शरीर रचना...*

    *विधात्याची अमूल्य देणगी*...

(संग्रह करावा असाच लेख)


*1) हाडे:-* माणसाला जन्मत: 266 हाडे असतात.त्यातूनच जोडणी होऊन शेवटी *206* हाडे राहतात. अनेक प्रकारचे सांधे तयार होतात.

*2)फुफ्फसे:-* दोन्ही- कडे दोन असतात. दररोज *वीस लाख लिटर* हवा फिल्टर करतात.

*3)सेल्स:-* दर सेकंदास *पंचवीस*

   *कोटी* नवीन बनतात.

*4) कोशिका:-* दररोज *200 अब्ज* रक्त- कोशिकांचे उत्पादन होते. शरीरात *2500 अब्ज* कोशिका असतात.

*5) हृदय:-* हृदय हे दररोज *एक लाख वेळा धडधडतं*(प्रती मिनिट 72 ) रक्तदाब प्रचंड असतो,म्हणजे चिळकांडी *30 फूट* उंच जाऊ शकते.

*6) डोळे:-* एक कोटी रंगांना ओळखतात. लहानात लहान फरक ओळखतात.*कॅमेरे व  दुर्बीणही* फिके पडणार!! त्यांचा विकास लहानपणीच होतो.

*7) नाक:-* एअर कंडिशनरच.थंड हवेला गरम आणि गरमला थंड करून फुफ्फुसात पाठविते.हे *वासाचे इंद्रिय* आहे. विकास आयुष्यभर होत राहतो.

*8) चेतासंस्था:-* ताशी *400 कि.मी.* वेग आहे. उपयुक्त सूचनांचे *प्रसारण* करतात.

*9) नर्व्हस सेल:-* आपल्या मेंदूत *100 अब्ज* नर्व्हस सेल असतात.

*10) दात:-* आपणास दगडासारखे मजबूत *32 दात* प्रत्येकाला असतात. पण दातांचे दुखणे शरीर थांबवू शकत नाही.

*11) लाळ:-* दररोज *1.7 लीटर* लाळ तयार होते.अन्नाचे पाचन करणे हे तिचे प्रमुख काम.

*12) जीभ:-* हाडे नसलेला मांसल भाग. *10,000 स्वाद* ओळखते.

*13)पापण्या:-* आपल्या डोळ्यांचे *संरक्षक* आवरण. कचरा साफ करणे हे प्रमुख काम.

*14) नखे:-* मधल्या बोटाची नखे वेगाने वाढतात तर अंगठ्याचे मात्र हळू हळू वाढते.

*15) दाढी:-* पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगवान वाढतात.दाढी राखल्यास *30 फूट* लांबीची होऊ शकते.

*16) बॅक्टेरिया:-* एक चौरस इंचात *3.2 कोटी* असतात.*10% वजन* हे त्यांचेच असते.

[ साबण,सॅनिटायझर, केमिकलचा वापर हा अपायकारकच आहे.] *17)शिंकणे:-* शिंकताना हवेची गती ही *150 ते 300 कि.मी.* असते.उघडे डोळे ठेवून शिंकणे केवळ *अशक्यच*  आहे.

*18) कान:-* लाखो आवाजांचा फरक ओळखतात.*ऐकणे* हे काम.ते एक इंद्रिय आहे. *50 हजार htj* आवाज ओळखतात.

 *19)पोट:-* आपले पोट ही *जादूची पेटीच* आहे.एक *अद्भुत कारखानाच* आहे. त्यातील आतडे *33 फूट* लांबीचे असते.

*20)झोप:-* झोपेतच माणसाची ऊर्जा वाढते.झोप हा *रिपेरिंगचा* काळ असतो. शरीराला आराम मिळतो. *विकासवाढीची* सर्व हार्मोन्स मुक्त होणेस उपयोगी आहे.

 *21)किडनी:-* रक्त *शुद्धीकरण* कारखानाच. *एक लाख* छिद्रातून हे कार्य चालते.

 *22)मूत्रपिंड:-* रक्ताचे शुद्धीकरण करून ते *हृदयाकडे* पाठवणे हे प्रमुख काम आणि *विषारी घटक* शरीराबाहेर फेकणेस मदत करतात.

👌वरील सर्वांची किंमत *गणितीय अंकात* मोजता येत नाही.तरीही माणुस म्हणतो *देवाने* मला काय दिले *आणि हे सर्व  देवाने निशुल्क दिले. हे  सर्व  टिकुन ठेवण्यासाठी आपल्याला योगा प्राणायम करणे आवश्यक आहे*

*👌Strong Mind Lives*

    *in Strong Body.*

Have a nice Body to all.

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

=================

जय श्री राम 🙏🚩🙏

Saturday, 15 February 2025

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी

 शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी

 

मुंबईदि. 13 :  शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजेया सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीयशहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावेअसे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक  तथा  राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले.

बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 संदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस  उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडेम्हाडाचे मुख्य अभियंता आडेम्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिं पवारगृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतलेवरिष्ठ सल्लागार मुकुल बापटविभाग स्तरीय तसेच शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.कवडे म्हणाले कीप्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा १ करिता मासिक प्रगती अहवाल भरून लवकरात लवकर जियो टॅगिंग करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा २ करिता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यकतेनुसार प्रचार अभियान राबविण्याचीही सूचना त्यांनी केली

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र शासनाने या नव्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

गृहस्वप्न साकार होणार!

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2015 पासून राज्यात राबविली जात आहे. राज्यातील 399 शहरांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असूनआतापर्यंत 14.70 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 3.79 लाख घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ही योजना वरदान ठरली असूनआता 2.0 टप्प्यात आणखी सुधारित स्वरूपात घरे बांधण्यात येणार आहेत.

नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३० ते ४५ चौ. मी. पर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) बांधली जाणार आहेत. या घरांमध्ये शौचालय व इतर नागरी सुविधांचा समावेश असणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ही (१) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (BLC), (२) भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (AHP), (३) भाडे तत्वावर परवडणारी घरे (ARH) आणि (४) व्याज अनुदान योजना (ISS) या चार प्रमुख घटकांद्वारे केली जाणार आहे.

सर्वसमावेशक नागरी सुविधा

घरकुलांसोबत पाणीपुरवठासांडपाणी व्यवस्थापनरस्तेवीजपुरवठा अशा मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. तसेचदिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक रॅम्प आणि सुविधा, अंगणवाड्यापावसाचे पाणी साठवण्यासाठी यंत्रणासौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवड या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) व नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जात असून आतापर्यंत राज्यात 43,989 कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

000

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील pl share

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशनयूएसए संस्थाचा पुढाकार

           मुंबईदि. १३ : राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशनयूएसए या संस्था मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनमध्ये शासनाला सर्वोतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरवर्षी साधारण एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थाच्या माध्यमातून राज्याला मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी नक्कीच मोलाचे सहकार्य होणार आहेअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

             नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन शासनाने हाती घेतलेल्या या मिशनला २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने सार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षणसामाजिक न्यायआदिवासी विकासशालेय शिक्षण या विविध विभागांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या मिशनची राज्यातील यशस्विता पाहून राष्ट्रीय अंध निवारण कार्यक्रम व धर्मादाय रूग्णालयांचे सहकार्य लाभत आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येत आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालये मिळून साधारण ३५० ऑपरेशन थिएटर येथे दररोज किमान दहा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. या उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने हे मिशन सुरू झाल्यापासून २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत साधारण साडेसतरा लाख व २०२२-२३ यावर्षात साधारण नऊ लाख मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे मार्च२०२४ अखेर पर्यंत नऊ लाख ४५ हजार ७३३ मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर मोफत चष्मे देखील देण्यात आले आहेत. या मिशनमुळे राज्यातील मोतीबिंदू रूग्णांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होत असल्याचे समाधान ही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

             शासनाचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन हे ध्येय २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी विदर्भातील मास्टेक आणि शंकरा फाऊंडेशन यांनी दरवर्षाला महाराष्ट्रामध्ये मोफत एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि त्यासोबतच इतर आर्थिक मदत ही देण्याचे मान्य केले आहे. यांच्यासोबत दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयवर्धालता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयडॉ. महात्मे आय हॉस्पीटलनागपूरएआयआयएमएसनागपूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालयनागपूरआयजीएमसीनागपूरसुरज आय इन्सस्टीट्युट आणि डॉ. नानगिया आय हॉस्पीटलनागपूर यासारख्या इतरही वैद्यकीय क्षेत्रातील संस्था मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रदान करण्यासाठी सहभागी असतील. या संस्था ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचं निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतीलया विश्वासाने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन म्हणून कायम या संस्थांना सहकार्य असेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/क्षेत्रातील संस्था मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रदान करण्यासाठी सहभागी असतील. या संस्था ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचं निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवणे आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतीलया विश्वासाने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन म्हणून कायम या संस्थांना सहकार्य असेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने

 जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मृद व जलसंधारण विभागात रूजू झाले 601 अधिकारीमुख्यमंत्र्यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

मुंबईदि. 13 :- राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसभागातून झालेली कामे  ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचे (‍रिमोटद्वारे ऑन लाईन पदध्दतीने ) वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रातिनिधीक स्वरुपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात झालेल्या या समारंभास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडराज्यमंत्री इंद्रनील नाईकमृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटीलआयुक्त प्रकाश खपले यांच्यासह नवनियुक्त अधिकारी व त्यांचे कुटुंबीय  उपस्थित होते.

जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या 601 अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेजलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे. या विभागाच्या परिवारामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे ध्येय बाळगावे. शासनाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्याची आपणास संधी मिळाली आहे. या संधीचे सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे. राज्यात 75 हजार हजार नोकर भरती करण्यास सुरुवात केली.  प्रत्यक्षात 1 लाख 50 हजार नोकर भरती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेराज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई दूर करून शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावे जलयुक्त झाली असून भूजल पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालेज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली. भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पीक घेता येऊ लागली हे या अभियानाचे यश आहे.

जलयुक्त शिवार योजना राज्याच्या जलसंधारणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या योजनेच्या कामांमुळे देशात महाराष्ट्रात भूजल पातळी वाढ झाल्याचे केंद्र शासन व उच्च न्यायालयानेही त्यांच्या अहवालात मान्य केले आहे. भविष्यात ही योजना अधिक काटेकोरपणे, नियोजनबद्ध तंत्रज्ञानाधारित आणि स्थानिक सहभाग घेऊन अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण मंत्री राठोड म्हणालेमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाने क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश असून या अभियानात मिळालेला लोकसहभाग हे या अभियानाचे यश असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.

नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे जलसंधारण विभागातील कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास श्री. राठोड यांनी व्यक्त केला. जलसंधारण विभागाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.

मृद व जलसंधारण राज्यमंत्री श्री. नाईक म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली  जलयुक्त शिवार अभियानात देशात आदर्शवत असे काम झाले आहे. जलसंधारण विभागामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांनी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे श्री. नाईक आवाहन केले.

            सचिव गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार आयुक्त प्रकाश खपले यांनी मानले.

0000

Featured post

Lakshvedhi