Friday, 14 February 2025

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. १४ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात  सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवली येथील शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापक यांनी केले आहे.

    या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्गअनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी   सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

****

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Pl share

 ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार;

इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुबंईदि. १४ : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघरनवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च२०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर

ऑनलाईन अर्ज करावेअसे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे आलेले व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचने मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे.

 

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोनकॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच  उमेदवारांशीपत्रव्यवहारकेला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहितीनोंदणी क्रमांकमोबाईल क्रमांकईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अवैध फोन कॉल्सपासून सावध राहावेअधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in संकेस्थळास भेट द्यावी. नियम व अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन pl share

 विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’चे आयोजन

           

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे "उत्तुंग महाखादी प्रदर्शन" आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्ससुभाष रोडविलेपार्ले (पूर्व) येथे होणार असूनदररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहेअशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 या प्रदर्शनात खादी वस्त्रखादी साड्याशुद्ध सेंद्रिय ‘मधुबन’ मधहळदमसालेकोल्हापूरी चप्पलगूळ तसेच इतर ग्रामोद्योग उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रममुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममधकेंद्र (मधमाशापालन)मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.

 ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच खादी आणि ग्रामोद्योग वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर pl share

 प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 

लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाही

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड

 

मुंबईदि. 14 : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन बालकांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली.

            यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडेमत्स्य उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

            या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील 17 विविध योजनांच्या एकूण 234 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

            गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे.  सर्वसाधारण गटातील प्रमोशन ऑफ रिक्रेशनल फिशरीज या 50 लक्ष रुपयांच्या योजनेचा लाभ एका लाभार्थ्याला देण्यात आला. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या 6 लाभार्थ्यांना आणि 32 महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. तसेच मत्स्य तलाव योजनेसाठी 6 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी 25 लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी 27 लाभार्थी निवड करण्यात आली. प्रत्येकी 25 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी 54 लक्ष या प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लक्ष  रुपयांचा लाभ दिला जातो. 10 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी 5 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी 40 लक्ष या प्रमाणे एकूण 2 कोटींचा लाभ दिला जातो.

20 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी 4 महिला लाभार्थीप्रती लाभार्थी 80 लक्ष  या प्रमाणे 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर दीड कोटी रुपयांच्या 50 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना यासाठी एका महिला लाभार्थीची निवड करण्यात आली. 6 लाभार्थींना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांच्या रेफ्रिजेरेटेड व्हेईकलचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत एकूण दीड कोटींच्या लाभाचे वाटप होणार आहे. इन्सुलेटेड व्हेईकल गटात 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे एकूण 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

            याशिवाय 75 हजार रुपयांच्या मोटार सायकलसह आईस बॉक्स गटासाठी 9 लाभार्थी3 लक्ष रुपयांच्या थ्री व्हीलर सह आईस बॉक्स इन्क्लुडिंग ई-रिक्शा फॉर फिश वेंन्डीग या गटासाठी 7 लाभार्थींची निवड करण्यात आली. 20 लक्ष रुपयांच्या लाईव फिश वेन्डींग सेंटरसाठी 37 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या गटात प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे 7 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ  दिला जाणार आहे.

 30 लक्ष रुपयांच्या मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 2 टन अ डे या गटासाठी 12 लाभार्थी1 कोटी रुपयांच्या मिडियम मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 8 टन अ डे या गटासाठी 1प्रत्येकी 10 लक्ष रुपयांच्या कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क इन्क्लुडिंग किओस्क ऑफ ॲक्वेरिअमओर्नामेंटल फिश या गटासाठी 9 महिला लाभार्थी आणि पारंपारीक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौकांना सहाय्य या योजनेसाठी 18 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 1 कोटी 20 लाख या प्रमाणे एकूण 21 कोटी 60 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

            या योजनांसाठी राज्यभरातून एकूण तीन हजार अर्ज आले होते. यापैकी 234 लाभार्थ्यांची निवड आज लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली.

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य

 दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास 

शाश्वत विकास शक्य

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. १४ : सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणेतसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षाशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडनहिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसकबीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा,इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते,  जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवानवरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघरितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समुहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधनबचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीभारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅसवीज वापरयोग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरलेसिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की१४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये  विद्यार्थीतरूणवाहन चालकक्लिनरकर्मचारीशेतकरीनिवासी संस्थाग्रामपंचायतीस्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्वफायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सायक्लोथॉनवॉकेथॉनचित्रकला स्पर्धाइंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

०००

*अन्नदानाचे महत्व-* १. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो

 *अन्नदानाचे महत्व-*

१. अन्नदान करणाऱ्याच्या २१ पिढ्यांचा उद्धार होतो.

२. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.

३. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.

४. अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही.

५. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो.

६. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते.

७. जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो पर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.

८. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल, हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती, यथासामर्थ्य दान देत राहावे.

९. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते, जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वछ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.

१०. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून 

अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो.

११. न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते.

१२. अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव `सात्विक आहार' होय.

१३. शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो.

१४. अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही.

१५. भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात.

21व्या शतकातील विज्ञान युगात आजही अंधश्रद्धेची जबरदस्त भीती व दहशत कायम...*

 *21व्या शतकातील विज्ञान युगात आजही अंधश्रद्धेची जबरदस्त भीती व दहशत कायम...*


Featured post

Lakshvedhi