Wednesday, 12 February 2025

70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, होणार मराठी भाषेचा जागर!

 70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळाहोणार मराठी भाषेचा जागर!


वृद्धिंगत होणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान!

सहाव्यांदा लाभणार महिलेला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!


      
मराठी भाषातिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 70 वर्षांनी राजधानी दिल्लीत होत आहेसरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे 98 वे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपन्न होणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉतारा भवाळकर भूषवणार आहेतयापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते.

 

     ज्येष्ठ साहित्यिक डॉतारा भवाळकर यांना मिळणार संमेलनाध्यक्ष होण्याचा मान!
1878 
साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेतेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरु आहेयंदा 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. 1961 साली ग्वाल्हेर येथे झालेल्या 43 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होतेकुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होतायानंतर जवळपास 15 वर्षांनी म्हणजेच 1975 साली कऱ्हाड येथे झालेल्या 51 व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होतायानंतर जवळपास 21 वर्षांनी 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविलेतर इंदूर येथे 2001 मध्ये झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.

 

यानंतर 2019 मध्ये म्हणजे जवळपास 18 वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. 2019 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉतारा भवाळकर यांना मिळाला आहेलोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ.तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहेसाहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.


       
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणार संमेलन
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी निर्णय घेतलामराठीसह बंगालीआसामीप्राकृतपाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाअनेक वर्षांपासून मराठी साहित्यिकभाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होतीमराठी भाषा हा आपला अभिमान आहेदेशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहेआता 70 वर्षांनंतर नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.


70 
वर्षांनंतर दिल्लीत होणार मराठीचा जागर !

     सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22,23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहेयापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होतेत्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळसंमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होतेसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ

70 वर्षांनी दिल्लीत रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, होणार मराठी भाषेचा जागर!


वृद्धिंगत होणार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान!

सहाव्यांदा लाभणार महिलेला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!


      मराठी भाषा, तिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 70 वर्षांनी राजधानी दिल्लीत होत आहे. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे 98 वे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपन्न होणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर भूषवणार आहेत. यापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते.

 

     ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना मिळणार संमेलनाध्यक्ष होण्याचा मान!
1878 साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरु आहे. यंदा 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. 1961 साली ग्वाल्हेर येथे झालेल्या 43 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होते. कुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. यानंतर जवळपास 15 वर्षांनी म्हणजेच 1975 साली कऱ्हाड येथे झालेल्या 51 व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होता. यानंतर जवळपास 21 वर्षांनी 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविले. तर इंदूर येथे 2001 मध्ये झालेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.

 

यानंतर 2019 मध्ये म्हणजे जवळपास 18 वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. 2019 मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ.तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. 70 वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.


       मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणार संमेलन
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी निर्णय घेतला. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. मराठी भाषा हा आपला अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. आता 70 वर्षांनंतर नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.


70 वर्षांनंतर दिल्लीत होणार मराठीचा जागर !

     सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22,23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे. यापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ

 

जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव

 जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव

 

मुंबईदि. 11 : दशावतारी नाट्य महोत्सव नवी मुंबई मधील जुईनगर बॉम्बे बंट्स असोसिएशनयेथील सभागृहात दि. १३ ते १८ फेब्रुवारी २०२५या कालावधीत आयोजन करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककलालोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावीया उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्रीं कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेयांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार नाट्य महोत्सव आयोजन करण्यात आला आहे.

दशावतार ही कोकणातील एक पारंपारिक लोकनाट्य शैली आहेज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीकुडाळमालवणवेंगुर्लाकणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला विशेष लोकप्रिय आहे.

जुईनगर, नवी मुंबई येथे दशावतार नाट्य महोत्सव दि. १३ ते १८ फेब्रुवारी २०२५या कालावधीत रोज सायंकाळी ६:३० वाजता बॉम्बे बंट्स असोसिएशनसभागृहात आयोजित करण्यात येत आहे.गुरुवारदि. १३ फेब्रुवारी २०२५ सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळनेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर शुक्रवारदि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देवेंद्र नाईक चेंदवणकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळचेंदवण्यांचा नाट्य प्रयोग होईल रविवारदि. १६ फेब्रुवारी २०२६ जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळओरोस यांचा नाट्यप्रयोग होईल..सोमवारदि. १७ फेब्रुवारी २०२५ आरोलकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळअखली व ओंकार दशावतार नाट्य मंडळवेंगुर्ला यांचा नाट्य प्रयोग होईल मंगळवारदि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळमानखुर्द व तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ झाराप यांच्या नाट्य प्रयोगाने या दशावतारी नाट्य महोत्सवाचा समरोप होईल.

हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जुईनगर, येथे होऊ घातलेल्या या दशावतारी नाट्य महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा,नाट्य - नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन विभूषण चवरेसंचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

0000

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत

 छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी

तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

 

नवी दिल्ली दि. 12 मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत्या निमित्ताने मराठी भाषा मंत्री श्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केलीयावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहारसमन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेतमुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहेतर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आलेतसेच सभागृह क्रमांक एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेतर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात येणार आहेव्यासपीठाला  स्वकाकासाहेब गाडगीळ आणि स्वलोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष रेल्वे 19 तारखेला सुटणार आहे यामध्येही साहित्यविषयक परिसंवाद तसेच कवी संमेलनचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. नहार यांनी दिलीसाहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणारे नियोजन याचीही माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना दिलीमहाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी

 जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि

मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी

- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

 

नवी दिल्लीदि. 12 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेलअसे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. सामंत यांनी जेएनयु विद्यापीठात भेट दिलीजवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु डॉशांतिश्री पंडित आणि  छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी स्टेटस चेअरपर्सन तथा डीन प्रोफेसर अमिताभ मट्टू यांच्याशी या अध्यासनाबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली.

या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी रुपये देण्यात येतीलतरपुढच्या आर्थिक वर्षात सात कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितलेमराठी भाषा अध्यासनासाठी यापूर्वी आर्थिक तरतूद करण्यात आली असून यापुढेही आर्थिक तरतूद करण्यात येईलतसेच या दोन्ही अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून इमारत बांधण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. या निधी मधील काही भाग हा ‘जेएनयु’ येथील मराठी भाषा अध्यासनासाठीही वापरला जाईलजेएनयु च्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स तर्फे बांधण्याचा मानस असून जेएनयु कडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

दिल्लीत विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी दिल्लीतील मराठी शाळांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

‘जेएनयु’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामधील अभ्यासक्रम याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आलीया अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अरविंद येलेरी आणि समन्वयक डॉ. जे. जगन्नाथन यांनी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.  प्राध्यापक डॉ.मनीष दाभाडेडॉराजेश खरातसरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी विद्यापीठाच्या समन्वयकाकडून छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे प्रशासनपरराष्ट्रीय धोरणव्यापार धोरण याबाबत माहिती देण्यात येईलअसे सांगितले.

महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी

 महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी

 परस्पर सहकार्य वाढावे

-         पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमीच स्वागत आहेअसे सांगत महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले. स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर यांनी मुंबई येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभा अध्यक्ष  अॅड.राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कीदेशाच्या स्वातंत्र्यापासून आजवर भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. व्यापारशिक्षणतंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य होत असते. त्याचबरोबर सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रातही दोन्ही देशांतील आदानप्रदान वाढावे. महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने असे परस्पर सहकार्य कायमच महत्त्वाचे राहीलअसे सांगत श्री. देसाई यांनी महावाणिज्यदूत मार्टिन मायर यांना पर्यटन विभागाकडून पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे पर्यटन विभागाकडून आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्टिन मायर यांना आमंत्रण दिले.

0000

Featured post

Lakshvedhi