Wednesday, 12 February 2025

जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव

 जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव

 

मुंबईदि. 11 : दशावतारी नाट्य महोत्सव नवी मुंबई मधील जुईनगर बॉम्बे बंट्स असोसिएशनयेथील सभागृहात दि. १३ ते १८ फेब्रुवारी २०२५या कालावधीत आयोजन करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककलालोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावीया उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्रीं कार्यालयाचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेयांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार नाट्य महोत्सव आयोजन करण्यात आला आहे.

दशावतार ही कोकणातील एक पारंपारिक लोकनाट्य शैली आहेज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीकुडाळमालवणवेंगुर्लाकणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला विशेष लोकप्रिय आहे.

जुईनगर, नवी मुंबई येथे दशावतार नाट्य महोत्सव दि. १३ ते १८ फेब्रुवारी २०२५या कालावधीत रोज सायंकाळी ६:३० वाजता बॉम्बे बंट्स असोसिएशनसभागृहात आयोजित करण्यात येत आहे.गुरुवारदि. १३ फेब्रुवारी २०२५ सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळनेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर शुक्रवारदि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देवेंद्र नाईक चेंदवणकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळचेंदवण्यांचा नाट्य प्रयोग होईल रविवारदि. १६ फेब्रुवारी २०२६ जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळओरोस यांचा नाट्यप्रयोग होईल..सोमवारदि. १७ फेब्रुवारी २०२५ आरोलकर पारंपारिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळअखली व ओंकार दशावतार नाट्य मंडळवेंगुर्ला यांचा नाट्य प्रयोग होईल मंगळवारदि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळमानखुर्द व तेंडोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ झाराप यांच्या नाट्य प्रयोगाने या दशावतारी नाट्य महोत्सवाचा समरोप होईल.

हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून जुईनगर, येथे होऊ घातलेल्या या दशावतारी नाट्य महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा,नाट्य - नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन विभूषण चवरेसंचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi