Wednesday, 12 February 2025

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत

 छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी

तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

 

नवी दिल्ली दि. 12 मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत्या निमित्ताने मराठी भाषा मंत्री श्री सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केलीयावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहारसमन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेतमुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहेतर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आलेतसेच सभागृह क्रमांक एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेतर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात येणार आहेव्यासपीठाला  स्वकाकासाहेब गाडगीळ आणि स्वलोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे अशी माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष रेल्वे 19 तारखेला सुटणार आहे यामध्येही साहित्यविषयक परिसंवाद तसेच कवी संमेलनचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. नहार यांनी दिलीसाहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणारे नियोजन याचीही माहिती श्री नहार यांनी श्री सामंत यांना दिलीमहाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi