Wednesday, 12 February 2025

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी

येरवडा-कात्रज भुयारी मार्ग

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 12 : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग 'ट्वीन टनलपद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले. पुण्यासोबतच नाशिकनागपूर व छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटीरांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 'अर्बन ग्रोथ सेंटरकरिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्गपुणे सातारा आणि पुणे - नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली कनेक्टिव्हिटी तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नवीन शहर नियोजन करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविकास योजना तयार करताना लागणारा कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्तेमलनिस्सारणपाणीपुरवठाविज पुरवठास्मशान भूमीदफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुणे व नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलछत्रपती संभाजी नगर प्राधिकरणाच्या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटनागपूरच्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात. प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

विकास योजनेत रस्ते 18 मीटर रुंदीचे करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेविकासयोजनांचे नियोजन करताना चांगल्या दर्जाची सल्लागार एजन्सी नियुक्त करावी. प्राधिकरणांनी भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावायासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रकल्प कार्यान्वित करावे. पाण्याची उपलब्धता बघूनच बांधकाम परवानगी देण्यात यावी.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सोंडापार येथील प्राधिकरणाच्या प्रस्तावित कार्यालय आणि कर्मचारी निवासी संकुलाची व्यवहार्यता तपासावी. नागपूर शहरात फुलांचे मार्केट तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासकीय जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव ठेवावी. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास योजना तयार करावी. नाशिक प्रदेशात ''स्पिरीच्युअल सिटीकरण्यासाठी जमीन संपादित करावी.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळदुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे 500 बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाहीयाची काळजी घ्यावी. पुणे, राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहराजवळील औद्योगिक क्षेत्र व पर्यटन क्षेत्रांचा विचार करावा. त्यानुसार आपली विकास योजना तयार करावी यावी. प्राधिकरणाने शहराजवळील असलेले औद्योगिक क्षेत्रपर्यटन स्थळे यांना जोडणारे प्रशस्त रस्ते तयार करावे.

नाशिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. माणिक गोरचाळपुण्याच्या बैठकीत महानगर आयुक्त योगेश म्हसेनागपूरच्या बैठकीत महानगर आयुक्त संजय मीना आणि छत्रपती संभाजी नगरच्या बैठकीत महानगर आयुक्त दिलीप गावडे यांनी सादरीकरण केले. बैठकीला नगरविकासगृहनिर्माण तसेच प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/


 

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

 मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणासंस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणाअधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेचबालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेलहे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेतत्याचे विवरण खालील प्रमाणे -

 महसूल विभाग: ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी

पोलीस विभाग: जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी

 शालेय शिक्षण विभाग: प्रत्येक महसूली विभागातून १ शाळाअशा ६ शाळांचा गौरव

 महिला व बालविकास विभाग: एकूण ९८ अधिकारी व कर्मचारीतसेच संस्था यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

०००

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’ राबवणार

 बाल हक्क संरक्षणासाठी बालरक्षा अभियान

राबवणार -  अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह

मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

 

मुंबईता. १२ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच बालस्नेही पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली. 

मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालकशिक्षकपोलिससामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्कसमन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून हे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी आयोग प्रयत्नशिल आहे. बहुतांश प्रकरणात आरोपी हा पिडीत बालकांच्या ओळखीतला असतो. तक्रार करण्याची भितीसामाजिक दबाव यामुळे अनेक प्रकरणे दडपली जात असल्याचे निदर्शनात येते. या प्रकरणात तक्रार करण्याचे प्रमाण वाढावेशाळांमध्ये बाल अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रभावी प्रतिसाद प्रणाली उभारणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी पालकशिक्षकपोलिससामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क आणि समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे आहे यासाठी आयोग बालरक्षा अभियान राबवित असल्याची माहिती अध्यक्षा शहा यांनी दिली.

या अभियानाचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:०० वाजतासह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे व विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी बालरक्षा अभियान’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपर पोस्टर्सचे अनावरणबालकांच्या तक्रार निवारणासाठी विकसित व सुधारित बालस्नेही चिराग ॲप’ लाँच केले जाणार आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई शहरमुंबई उपनगरठाणे,नागपूरअकोलानाशिकपुणेछत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यात शिक्षकपालकपालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी व निवडक विद्यार्थी यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ७,००० जणांना बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्देश बालकांच्या सुरक्षिततेविषयी शिक्षक व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणेशालेय वातावरण अधिक सुरक्षित बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणेबालकांच्या हक्कांचे संरक्षणतक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे, असे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास सुधारित प्रस्ताव सादर करावा

 ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास

सुधारित प्रस्ताव सादर करावा


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश


१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत


कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली


 


नवी दिल्ली दि. 12 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.


या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आत्तापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या ४०% अथवा कमाल रु. ३५ लाख अनुदान देण्यात येते.


उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत विनंती केली.


या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनेत सुधारणा करून सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी निर्देश दिले. या सुधारित प्रस्तावास केंद्र शासनाची त्वरित मान्यता देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

 कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता

- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा गणवेश दर्जाक्रीडा मार्गदर्शक मानधन,

प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय

 

            मुंबईदि. 12 :- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यातकाही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात,असे निर्देश देत गणवेश दर्जाप्रशिक्षक मानधनभोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओलक्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदेक्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक सहास पाटीलनवनाथ फडतारे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले कीमहाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणेराज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणसंतुलित आहार देणेअद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठम्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठपुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापनदेखभाल दुरुस्तीनवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जागुणवत्ता कायम राखावीअसेही निर्देशही दिले.

कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता

            क्रीडा मंत्री भरणे म्हणालेकोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिध्द होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचाफुटबॉल खेळाडूंचाफुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेलअसा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई टेक वीक २०२५ आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची

 मुंबई टेक वीक २०२५

आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

 

मुंबई, दि. १२ : मुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला आशियाचा AI सँडबॉक्स’ म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत’ दृष्टिकोनाला गती देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व उद्योजकसंशोधक आणि तंत्रज्ञांना MTW 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयलश्री. अश्विनी वैष्णवआणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवायटाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरनउद्योगपती आकाश अंबानी तसेच गुगल डिपमाईंडॲन्थ्रोपिकस्केलकृत्रिमसर्वममेटागुगलमायक्रोसॉफ्ट आणि सेल्सफोर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचे एआय’ क्षेत्रातील तज्ज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबईची टेक इकोसिस्टम आणि TEAM ची भूमिका

TEAM ही मुंबईतील तंत्रज्ञान उद्योजकांची अग्रगण्य स्वायत्त संघटना आहे. या संघटनेमध्ये 65 हून अधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न कंपन्यांचे संस्थापक असूनत्यांची एकत्रित बाजारपेठेतील किंमत $60 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

TEAM च्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये ड्रिम11 चे सह-संस्थापक हर्श जैनहापटिकचे सह-संस्थापक आकृत वैषद गुड ग्लॅम ग्रुपच्या नय्या साग्गीलॉगीनेक्स्टचे ध्रुविल संघवी आणि GoQii चे विशाल गोंडल यांसारखे नामवंत उद्योजक समाविष्ट आहेत.

मुंबई टेक वीक 2025 : भारताला जागतिक ‘एआय’ स्पर्धेत आघाडीवर आणण्याचा प्रयत्न

या महोत्सवाच्या माध्यमातून एआय’ तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापरस्टार्टअप्ससाठी नवीन संधीभारतीय एआय’ संशोधनआणि उद्योजकांसाठी गुंतवणूक व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. देश-विदेशातील तंत्रज्ञसंशोधक आणि गुंतवणूकदारांसाठी हा कार्यक्रम या क्षेत्रातील संधींचे दार उघडणारा ठरणार आहे.

 

MTW 2025 साठी नोंदणी आणि अधिक माहिती

️ अधिकृत वेबसाइट: www.mumbaitechweek.com

️ ताज्या घडामोडींसाठी आम्हाला फॉलो करा: LinkedIn | Twitter | Instagram

 

*रुजवू संस्कृती स्वच्छतेची

 *रुजवू संस्कृती स्वच्छतेची*

स्वच्छतेची सवय अंगीकारूया, आपले शहर सुंदर ठेऊया.

❌*नकोत या वाईट सवयी:*

o रस्त्यावर कचरा फेकणे

o पान-तंबाखू खाऊन थुंकणे

✅ *अंगीकारु या सवयी:*

o कचरा नेहमी डस्टबिनमध्ये टाकणे

o सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे

🤝 चला, एकत्र येऊन नवी सुरुवात करूया आणि अस्वच्छतेवर मात करूया!


*एकच लक्ष्य शहरे स्वच्छ*

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0

नगर विकास विभाग


Featured post

Lakshvedhi