Tuesday, 11 February 2025

स्मार्ट प्रकल्पाच्या प्रदर्शनीस मार्टिन मेअर यांची

 स्मार्ट प्रकल्पाच्या प्रदर्शनीस मार्टिन मेअर यांची भेट

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मेअर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मूल्यसाखळी विकास आधारित कृषी विस्ताराबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या ताज्या फळांबाबत औत्सुक्याने चौकशी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले.

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

 अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी

स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 11 : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी असून स्वित्झर्लंड सोबत परस्पर व्यापार वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक आहे. स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावेमहाराष्ट्र त्यांचे स्वागत करेलअसे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत आणि कौन्सुलेट कॉर्प्स चे डीन मार्टिन मेअर यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

मंत्री श्री. रावल यांनी महाराष्ट्रातील विविधतेबाबत श्री.मेअर यांना माहिती दिली. राज्यात हापूस आंबासह्याद्रीच्या रांगांमधील चवदार तांदूळमिलेट्सताजी फळेभाजीपाला मुबलक प्रमाणात आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठी संधी आहे. राज्यात नुकतीच सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. गाईंचे पालन ही दोन्ही देशांमधील साम्य असलेली बाब असून स्वित्झर्लंड सोयाबीनची खरेदी करण्यास इच्छुक असल्यास महाराष्ट्रातून निर्यात करता येईलअसे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध प्रकारची पर्यटनस्थळे असून स्वित्झर्लंडमधील पर्यटकांनी येथे भेट द्यावीअसे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी श्री.मेअर यांच्याकडे केले. यासाठी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना येथील पर्यटन स्थळांची ओळख करुन देण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

श्री.मेअर यांनी स्वित्झर्लंडच्या महावाणिज्य दूतावासाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन आमचा वर्षभर चालणाऱ्या पर्यटनवाढीवर भर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने सर्वाधिक चांगले राज्य असल्याची प्रशंसा त्यांनी केली

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा

 मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा

-        राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. ११ :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेचप्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. तसेचपावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊनहा नवीन मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवानसुरक्षित आणि सोयीस्कर होईलअसा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

एकूण सुधारित मार्ग: खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग आहे.

यामध्ये सध्याचे १९ किमीचे अंतर ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे.प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत,इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट,घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पुणे विभागातील अधिक्षक अभियंता  राहुल वसईकरकार्यकारी अभियंता राकेश सोनवणे तसेच प्रकल्प सल्लागारकंत्राटदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

        



 मुंबई  दि.११ :  जपानचे लोक परिश्रमीप्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकलाते अतिशय कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  काढले.

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे सोमवारी (दि.१०) हॉटेल ताजमहालमुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारचा शोध अमेरिकेत लागला असला तरी जपानमध्ये तयार झालेल्या कार गुणवत्तेच्या बाबतीत जगात सर्वोत्कृष्ट व आरामदायी असतात. जपान देशात निर्माण झालेले प्रत्येक उत्पादन गुणवत्तेच्या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरल्याशिवाय जपान ती वस्तू बाजारात आणत नाहीही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पविशेषतः अटल सेतू मुंबई मेट्रो लाईनबुलेट ट्रेन यांना अर्थसहाय्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी जपान सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारत आणि जपानमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिकअध्यात्मिक व तत्वज्ञान विषयक संबंध दृढ असून उभय देशांमध्ये पर्यटन विशेषतः अध्यात्मिक पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन पर्यटनाला चालना देणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि जपान मधील संबंध स्वाभाविक आणि राजनीतिक दृष्टीने महत्त्वाचे असून आज उभय देशांमध्ये आर्थिकव्यापार विषयक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य नव्या उंचीवर गेले आहे. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून जपान तर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचा सर्वात मोठा लाभार्थी महाराष्ट्र असल्याचे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी यावेळी सांगितले.भारतातून गेल्यावर्षी २.३० लाख पर्यटक जपानला गेले असून ही पर्यटक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत व जपानच्या राष्ट्रगीताने करण्यात आले. जपानचे सम्राट नारुहितो यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे या  शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यागी कोजीमुख्य सचिव सुजाता सौनिकउद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

०००००

 

Governor attends the 65th birthday celebrations

of His Majesty the Emperor of Japan Naruhito

            Mumbai, 11th :Maharashtra Governor C.P. Radhakrishnan attended the 65th birthday celebrations of His Majesty the Emperor of Japan Naruhito organised by the Consulate General of Japan in Mumbai.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Rahul Narwekar, Minister of Protocol Jayakumar Rawal, Minister of Skill Dev. Mangal Prabhat Lodha, Consul General of Japan in Mumbai Yagi Koji, Chief Secretary Sujata Saunik, Captains of Industry and Consuls of various countries were present.

00000

 

कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन pl share

  

कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई,दि. ११ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखातर्फे आयोजित कै. श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२४- २०२५ या वर्षात निबंधस्पर्धेसाठी विकसित भारत- 'सन २०४७', उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध हा वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावानिबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मकसंशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नयेनिबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून)टोपणनावपत्तासंपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपयेदुसरे बक्षिस  ७ हजार ५०० रुपयेतिसरे बक्षीस ५ हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षिस २ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळया लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी)टोपणनावपत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर 'कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा२०२४-२०२५असे नमूद करावे. आणि हा लिफाफा 'मानद अध्यक्षभारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखातळ मजलाबँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला मंत्रालयमादम कामा मार्गमुंबई- ४०००३२या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. स्पर्धकांच्या काही शंका असल्यासमाहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: jsmrb-iipa@egov.in द्वारे संपर्क साधावा.

०००००००००

दिव्यांगांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

 दिव्यांगांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता

जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची माहिती

 

         मुंबई  दि.११ :  सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३  टक्के इतकी आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेतात्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल १ टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहितीउपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

         जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनाशाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्री यासाठीच्या एकंदरीत ५ टक्के निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या ९५ टक्के निधीमधून १९ टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री.पवार यांनी  ०५ फेब्रुवारी२०२५ च्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ आराखडा बैठकीत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत कमाल १ टक्का पर्यंत निधी राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने नियोजन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

             "जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)" अंतर्गत "दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व कल्याण" या करीता राखून ठेवावयाच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरीता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभागवित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील अशी माहितीहीउपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.

००००० 

कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी

 आज आपणा सर्वांकडे स्मार्ट फोन्स आहेत. संपर्काची अत्यंत शक्तीशाली माध्यमं आहेत! आज रस्ते उत्तम आहेत! रेल्वेचे जाळे आहे, विमाने आहेत! जीपीएस आहे! नकाशे आहेत! आपण खूप पर्यटन देखील करतो.

तरी आपण ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तिथे तिथे मागे काय उरते? 


कल्पना करा! आजपासून ४०० वर्षांपूर्वी वरील पैकी काहीही नसताना समर्थ रामदास स्वामींनी भारतभर फ़िरून जी ११०० हून अधीक मठांची स्थापना केली

त्यातील बहुतांश मठ आजही शिल्लक आहेत! इतकेच नव्हे तर त्या त्या प्रांतात मराठी लिहिता-वाचता-बोलता येणारे मठपतीही आजही वंशपरंपरेने शिल्लक आहेत! 


तिबेटच्या सीमेपासून केवळ ३० किमी वर बद्रीनाथ येथे समर्थांचे २ मठ आजही आहेत. तमिळनाडू मध्ये आजही १४ मठ जिवंत आहेत. आंध्रात ६५, कर्नाटकात ३६, राजस्थान, मध्यप्रदेश इ. अनेक ठिकाणी समर्थांचे माठ आजही राष्ट्रभक्ती जागविण्याचे कार्य करत आहेत!


आग्र्याहून सुटून केवळ २३ दिवसात राजगडावर पोहोचणे शिवाजी महाराजांना शक्य झाले कारण त्यांना दर ठराविक अंतरावर घोडे बदलून मिळाले! सर्वत्र मुघलांचे राज्य असताना कुणी घेतली असेल ही जबाबदारी? विचार करा! त्या काळातच काय आजही इतके भक्कम जाळे विणलेला संप्रदाय अस्तित्वात नाही!

सर्वांना कळावे यासाठी अवश्य शेअर करा हा नकाशा!


Featured post

Lakshvedhi