Sunday, 26 January 2025

बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही -महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकर

 लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून

रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही

-महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकर बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून


रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही


-महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

 

मुंबई,दि.26  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत  प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.

या योजनेमध्ये  काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने  कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही.  लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री. यादव यांनी केले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन 75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा

 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणेदि. 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानशिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

लोकांनीलोकांसाठी चालवलेलेलोकांचे राज्यहा विचार घेऊनदेशाने गेल्या 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या 75 वर्षात देशासमोर अनेक संकटे आलीआव्हाने निर्माण झालीपरंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीलाअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलपोलीस अधीक्षक पंकज देशमुखस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीविविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीज्येष्ठ नागरिकविद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेशेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटेआव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून 75 वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटालाआव्हानालाएकजुटीनंनिर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.

देशाची एकताअखंडतासार्वभौमतासंविधानदेशातली लोकशाहीदेशाच्या सीमासुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्यागबलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचाभारतीय लोकशाहीचाभारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेदमतभेद असले तरीदेशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहेही भावना गेल्या 75 वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या 75 वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेलाराज्यघटनेवरच्यालोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेतहे  पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृतीकलासमृद्धीचा गौरव आहेअशा शब्दात श्री. पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पोलिस-अग्निशमन पदक, सेवापदक व शौर्यपदक, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही त्यांनी अभिनंदन केले.

जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालयपिंपरी-चिंचवड महानगरापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकमाजी सैनिकनिमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचे समाधान -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

 पायाभूत सुविधारस्ते विकासशेती प्रगतीसामाजिक अन् आरोग्य क्षेत्रातील

सुधारणांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचे समाधान

-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणे,दि.26आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतोत्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधारस्त्यांचा विकासशेतीची प्रगतीसामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटतेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

पोलीस क्रीडा संकुलसाकेत मैदानठाणे येथील भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकमाजी सैनिक, खासदार नरेश म्हस्केआमदार संजय केळकरवींद्र फाटकजिल्हाधिकारी अशोक शिनगारेठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ रावजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेकल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुखपोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाणपोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजमहात्मा जोतिराव फुलेक्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेराजर्षी शाहू महाराजभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो.

श्री.शिंदे पुढे म्हणाले कीमहाराष्ट्र हे तर भारताचे ग्रोथ इंजिन आहे. देशाला महासत्ता करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे योगदान द्यायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली.

ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाहीहे दाखवून दिले आहे. ठाणेभिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती दिली आहे. 500 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि करीत राहूमात्र यासाठी आपण सर्व एकजुटीने काम करालअशी आशा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथे न्यायाचे राज्य आहे.

या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

अधिकारीव्यक्ती/संस्थांचा गौरव

या सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

११ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स घेऊन एकट्यानेच जन गण मन वाजविणारा अफलातून कलाकार राघव सरकार पहा.


 ११ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स घेऊन एकट्यानेच जन गण मन वाजविणारा अफलातून कलाकार राघव सरकार पहा.

मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत ---- किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती

 मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत

----

किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.26 : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडेअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनीमुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमुंबई किनारी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवार दि. २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिकामरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तरवाहिनीचे लोकार्पण होत असून या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेलअसा विश्वास व्यक्त केला. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. 

या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हे सुशोभीकरण मे.टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

 

दृष्टिक्षेपात प्रकल्प...

 

• धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राइव कडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार.

• मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार.

• बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार. 

• वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास. 

• धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे.

• धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.

• आजतागायत या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

 

• प्रकल्पाचे फायदे :

वेळेची सुमारे ७० टक्के बचततर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅकसार्वजनिक उद्यानेजॉगिंग ट्रॅकखुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.

 

• प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) अ






सलेल्या बोगद्याची निर्मिती. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्तापूलउन्नत मार्गउतरण मार्ग अच्छादित बोगदासमुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदाआरक्षणाची निर्मिती. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.

• प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी.

 

0000

--

प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

 प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन

 

     मुंबई, दि. 26 :   देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.

        राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली.

         राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.

000

Republic Day: Governor C. P. Radhakrishnan unfurls

National Tricolourat Raj Bhavan

 

             Maharashtra Governor C. P. Radhakrishnan unfurled the National Tricolour on the occasion of the 76th Republic Day at Raj Bhavan Mumbai on Sun (26 Jan).

 

              Officers and staff of Raj Bhavan and platoons of the State Reserve Police Force and Maharashtra Police saluted the flag even as the National Anthem and  State Song was played.

 

                Governor Radhakrishnan  joined by his wife Sumathi Radhakrishnan exchanged Republic Day greetings and distributed sweets to all those present on the occasion.

 

26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...

 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील  मुख्य फरक ...

                                     


1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात    तर ...   26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात 

कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

************                                                                      


2) 15 ऑगस्टला झेंडा      उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 

************   


3)15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात.         तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात.                              ***************    


4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणहोते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.             *************      


_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच हा संविधान गौरव दिन आहे, हा संविधान गौरव दिन भारतातील कोणत्याही सण आणि उत्सवापेक्षा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटनेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.

   

 *संविधान गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

Featured post

Lakshvedhi