Thursday, 16 January 2025

नवकल्पना आणि ऊर्जा स्टार्टअप्ससाठी गरजेचे मान्यवरांचे मार्गदर्शन

 नवकल्पना आणि ऊर्जा स्टार्टअप्ससाठी गरजेचे

मान्यवरांचे मार्गदर्शन

 

मुंबईदि. 16 :- नवकल्पना आणि ऊर्जा हे स्टार्टअप्ससाठी अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना होणारा फायदा ही महत्वाची बाब असल्याचे मत राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवसमध्ये 'स्टार्टअप्स कसे सुरू करावे' याविषयी मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवालास्कॉईडव्हेंचर्सचे संस्थापक ईसप्रीत सिंग गांधी यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चासत्रात व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशनएलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्लू स्मार्टचे सह संस्थापक पूनित गोयल यांनी याचे सूत्रसंचालन केले.

                100 पैकी 99 लोकांनी एआय (AI) सोबत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोणताही नविन स्टार्टअप्स सुरु करताना त्यातून बऱ्यापैकी नफा व्हायला हवा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. बहुतेक माणसे गुंतवणूक करताना सर्व विचार करूनच योग्य तो निर्णय घेतात. आपल्या देशातील शासकीय यंत्रणा खूप चांगली आहे. गुंतवणुकदारांनी आसपासच्या वातावरणाचा व्यवस्थित अंदाज घ्यावा आणि मगच स्टार्टअप्सला सुरवात करावी. ऑनलाईन शिक्षण सुद्धा सहज उपलब्ध करून दिले जात असून व्यवस्थित प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळतेच हा मंत्र लक्षात ठेवावा.

सुरवातीच्या काळात स्टार्टअप्स कसे असेल हे संपूर्णपणे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही व्यवहार करताना तुम्ही आत्मविश्वास आणि योग्य नियोजनासोबत केलेले काम महत्वाचे ठरते असे मत या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

००००

इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा

 ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 16 : ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावतकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार प्रवीण दरेकरआमदार प्रसाद लाडचित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री.फडणवीस यावेळी केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले

मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे ???*

 *मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे  ???*

🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭


केळीचे झाड हे शापित झाड आहे !!

ऋषि दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचे झाड आहे !!


ही अख्यायिका अशी आहे की,


ऋशी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रम्हमुहुर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे  होते.थकून भागून आल्या मुळे ब्रम्हमुहुर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रम्हमुहुर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले. पण ऋषि पत्नी कंदिनी ला ही ब्रम्हमुहुर्तावर जाग आली नाही. जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषि ना जाग आली व ब्रम्हमुहुर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठाना मध्ये बाधा आल्या मुळे त्यांनी क्रोधीत होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला.


ऋषि पत्नी कंदिनी राख होऊन पडली. ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषि अंबरीश यांना समजली. ते दुःखी होऊन त्या राखे कडे पाहू लागले.ऋषि दुर्वास पित्या समान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले. ऋषि अंबरीश यांनी ऋषि दुर्वास यांना कंदीनी स शाप मुक्ती साठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली..त्या प्रमाणे ऋषि दुर्वास यांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व वरदान दिले, की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगलकार्य,पुजा, अनुष्ठान होईल, तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल.


म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळी व केळीचे पान व खोड याचा समावेश होऊ लागला. केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे.

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

डाॅ. उदय तेलकर -पुणे

जागतिक टपाल दिन*

 🔴


*जागतिक टपाल दिन*


१५ पैशाचं *पोस्ट कार्ड* 

खुशाली *कळवत होतं*


अर्धं लिहिलेलं कार्ड

*रडायला* लावत होतं....


एक रुपया सुट्टा घेऊन

*एसटीडीच्या लाईनमध्ये* 

उभा रहात होतो

फोन लागला की...

*मन भरुन* येत होतं.


whatsapp वर आता

२४ तास संपर्कात राहातोय.

ना कोणाला ती *ओढ* आहे....

ना कोणाला ती *हुरहुर* आहे.

काळ बदलला बदलली साधने

मी अजूनही *जिव्हाळा* शोधतच आहे.


१५ हजाराच्या मोबाईलला

*१५ पैशाची सर नाही...*

नात्याची तर नाहीच नाही,

अजून काय काय बदलेल.. 

पण

ते दिवस.. ती माया...ती आपुलकी 

*पुन्हा कधीच* मिळणार नाही....

पुन्हा कधीच *मिळणार नाही.*

👌👌👌👌👌

*जागतिक टपाल दिनाच्या                                               हार्दिक शुभेच्छा.....*

मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?*

 *मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची कधी?*


*वय--20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे… !! बघु नंतर 

*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे… !! बघु नंतर

*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.… !! बघु नंतर

*31 ते 35 वर्षे* -- मुल  आजारी होते.दवाखान्यात बरेच पैसे खर्च झाले,पैसे आले की लगेच करु.

*36-40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.… !! बघु नंतर

*41-45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.… !! बघु नंतर

*46-50 वर्षे* -- मुलगा/मुलगी दहावीला आहे.… !! बघु नंतर

*51-55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले… !! बघु नंतर

*56-60 वर्षे* -- मुलग्याचं/मुलीचं लग्न करायचं आहे,त्यातच बीपी,डायबेटिस सुरू झाला आहे आता मेड़िक्लेम करावाच लागेल, पण थोडं  थांबा.… !!

*62-63 वर्षे* --छातीत चेस्टपेन झाला दोन तीन दिवसात मी आपणास फोन करतो.

*63-64 वर्षे* -- डाॅक्टरांनी  एन्जोग्राफी करायला सांगितले.त्यातच एन्जोप्लास्टी झाली 3 लाख खर्च झाले. 

*65 वर्षे* -- इच्छा तर खूप होती मेड़िक्लेम करून घेण्याची, पण गुडघ्यांचा त्रास खूप वाढला होता.दोन्ही गुडघे कृत्रिम बसवावे लागले (हॉस्पिटल मध्ये ६ लाख ख़र्च झाले)

*66-70 वर्ष*-- मुलगा बाहेर गावी/परदेशी आहे.एकाएकी छातीत पेन/दुखणे वाढले डाॅक्टरांनी बायपास सर्जरी करण्यासाठी सांगितलं आहे सर्व पैसा संपुन गेला.पुढचं आयुष्य जगायचं कसं?  

अरे पैशाअभावी जीव गमवावा लागला !!


अरेच्चा !!! मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची राहुनच गेले.       


यात आपण थंडी-ताप,डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनीया,संसंर्गजन्य रोग,टायफाॅइड,काविळ,न्युमोनिया,डायरिया,रस्त्यावर खाल्यामुळे अन्नातुन विषबाधा,छोटे-मोठे  अपघात याचा खर्च किती?


महत्वाचे:-

आधी मेडिक्लेम घेऊन सुरक्षित व्हा.आपली बचत,गोल्ड,स्थावर मालमत्ता वाचवा.

एखाद्या मोठ्या आजारपणासाठी हॉस्पिटल मधील १० दिवसाचा स्टे,मागील २०-२५ वर्षात अत्यंत मेहनतीने कमावलेली आपली बचत साफ करू शकतो.. 


आपणास मदतीचा हात देण्यास आम्ही तयार आहोत. 

 

आरोग्यविमा घेणे काळाची गरज आहे.

*✔संपत्ती निर्मिती जेव्हढी महत्वाची,तेव्हढंच तिचं संरक्षण महत्वाचं.* 


*अत्यंत महत्वाचा मेडिक्लेमचा नियम*

मेडिक्लेम पॉलिसी गरज नसताना घेऊन ठेवा. 

कारण,जेंव्हा खरी गरज लागेल तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल.मिळणार नाही !!!

**

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'अटल' उपक्रम

 आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये

आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'अटलउपक्रम

- उच्च व  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

मुंबईदि. 15 : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून  'अटलउपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  परीक्षांचा  सराव करता  यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास  वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेलअसे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी  केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते  महाराष्ट्र राज्य  सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल’ (ATAL - Assessment, Tests And Learning) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे  उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईसीईटी सेलचे घनश्याम केदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणालेया उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येणार आहे. या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे  विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल. शैक्षणिक आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. सायकोमेट्रिक टेस्टद्वारे  विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसूनविद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देणारा आहे.असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

माहिती :https://cetcell.mahacet.org यावर उपलब्ध आहे.

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

 युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

 

मुंबईदि. 15 : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 4 फेब्रुवारी 2025 पासून राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी दिली.

            या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी दि. 30 जानेवारी 2025 पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 022-22070942 येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi