Friday, 17 January 2025

विविध योजनांचे सुसूत्रीकरण आणि साधनसंपत्तीच्या स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी समिती

 विविध योजनांचे सुसूत्रीकरण आणि साधनसंपत्तीच्या

स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी समिती

 

मुंबई, दि. १६ : विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण करणे तसेच साधनसंपत्तीच्या स्रोतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी राज्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून याचा शासन निर्णय वित्त विभागामार्फत दि.१६ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी दिनांक २८ जून२०२४ रोजी सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात खर्चाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे घोषित केले होते. तसेचमुख्य सचिव यांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मर्यादीत निधीचा चांगल्या प्रकारे वापर आणि जलद आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी योजनांचे एकत्रिकरण करणेसंस्थांचे एकत्रिकरण करणेअनुत्पादक अनुदान योजना कमी करणे तसेच उत्पादक भांडवली खर्च वाढविणे यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना  प्रधानमंत्री महोदयांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत. या बाबींच्या अनुषंगाने राज्यातील सुरु असलेल्या योजनांचे मूल्यमापन करुन सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री (वित्त) असून समिती सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीमित्र (महाराष्ट्र इन्स्टीट्यूटशन फॉर ट्रान्स्फॉरमेशन)अपर मुख्य सचिव (वित्त)अपर मुख्य सचिव (नियोजन)प्रधान सचिव (व्यय) हे निमंत्रक असूनसचिव (वित्तीय सुधारणा)संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव हे सदस्य आहेत.

या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे आहे -  विविध प्रशासकीय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य योजनाचे / जिल्हा योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहचावेत यासाठी अशा सर्व योजनांचे मुल्यमापन करुन त्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी संबंधित विभागासमवेत आढावा घेवून शासनास शिफारस करणेविविध योजनांच्या सुसूत्रीकरणासंदर्भात मित्र संस्थेने तयार केलेले प्रस्ताव देखील या समितीस सादर करण्यात यावेतसमितीने संबंधित विभागासमवेत अशा प्रस्तावांबाबत आढावा घेवून शासनास शिफारस करणेकालवाह्य झालेल्या योजनाच्या बाबतीत तसेचज्या ठिकाणी योजनांच्या लाभाची द्विरुक्ती होत असेलयोजनांच्या उदिष्टाच्या अनुषंगाने द्विरुक्ती होत असेलअशा योजनांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी शासनास शिफारस करणेमर्यादीत निधींचा चांगल्या प्रकारे वापर आणि जलद आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी योजनांचे एकत्रिकरण करणेसंस्थांचे एकत्रिकरण करण्यासाठी शासनास शिफारस करणेमहाराष्ट्र शासनाच्या साधनसंपत्तीच्या कर उत्पन्न व करेतर उत्पन्न यांचा स्रोताचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम या समितीद्वारे केले जाईल, असे शासन निर्णयात नमूद आहे

Thursday, 16 January 2025

भगवान् का घर


 

आर्टी' मध्ये ८५ टक्के सवलतीत विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

 आर्टी' मध्ये ८५ टक्के सवलतीत विक्रीसाठी पुस्तके उपलब्ध

 

            मुंबई दि. १६ : महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेलपण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

  देशातील अनेक महापुरुषांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोचविण्याच काम केले. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी बार्टीचे महासंचालक श्री. वारे आणि निबंधक इंदिरा आस्वार यांच्या संकल्पनेतून आर्टी  संस्थेने महापुरुषांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

भारताचे संविधानराजर्षी शाहू महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा जोतीराव फुलेअण्णा भाऊ साठे यांचे खंड आणि त्यांच्यावर लिहिलेली मराठीइंग्रजी भाषेतील पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सामाजिकराजकीयखासगीशासकीय आणि शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येकांनी संग्रहित ठेवावेअसे हे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत.

  पुस्तकाची मूळ किंमत व कंसात सवलतीत दर पुढील प्रमाणे

भारताचे संविधान ४५० रुपये (६३)शूद्र पूर्वी कोण होते३०० (४५)बुद्ध आणि त्यांचा धम्म ४०० (६०)डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र चांगदेव खैरमोडे सेट ४ हजार (६००)समग्र आंबेडकर चरित्र बो. सी. कांबळे सेट २५०० (३७५)फकिरा १६० (२४)फकिरा इंग्रजी अनुवाद २५०० (३७५)अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ४८० (७२)राजर्षी शाहू रयतेच्या राज्याचे चित्रमय चरित्र १५०० (२२५)साहित्यसम्राट १५० (२३)स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समता १२० (१८)कर्तृत्व आणि व्यक्ति महत्त्व. ११०० (१६५). एकूण किंमत ११ हजार ५२६ रुपये किमतीची पुस्तके सवलतीच्या दरात १७३० रुपयात उपलब्ध होणार आहेत.

  नोव्हेंबरडिसेंबर या दोन महिन्यात ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली आहे. आर्टी कार्यालयाचा पत्ता  बी- 201/ 2022 रा मजला,  ‘बी’ विंगअर्जून सेंटरस्टेशन रोडगोवंडी (ईस्ट) येथे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गोवंडी स्टेशनपासून पूर्वेकडे 5 मिनीटाच्या अंतरावर आर्टी ही संस्था आहे.

0000

आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

 आविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचे

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबई, दि. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठलोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी, २०२५ दरम्यान पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्तम कामगिरी करून १३ सुवर्ण७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजेत्यांचे आणि मुंबई विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होण्यासही मदत होईल.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरेकुलसचिव डॉ. प्रसाद कारंडेडॉ. सुनिल पाटील,डॉ. मनीष देशमुख ,डॉ. वैशाली निरमळकरप्रा. डॉ. शशिकुमार मेननप्रा. डॉ. सुनीता शैलजनडॉ. मिनाक्षी गुरवडॉ. भूषण लांगीडॉ. रूपा राव मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राजभवन येथे आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये  राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठतून या स्पर्धेसाठी मानव्यविद्याभाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी,  मुलभूत शास्त्रे,  शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली आहेत.

या स्पर्धेत प्रथम बंडाबेझनेटा रेमंडराधिका भार्गवश्रेयांस कांबळेचैताली बनेकृष्णकांत लसुनेफरहीन शेखविवेक शुक्लाअंकित गोहिलश्रावणी वाडेकरतनिशा कौरप्रतिक मेहेरआणि वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक अथर्व लखानेचैत्रा देशपांडेमंगलम लुनकरऋतुजा शिंदेविरा जैनआभाश शर्मा आणि मानसी झा यांना प्रदान करण्यात आले. समृद्धी मोटेतेजश्री जायभाये आणि श्रेया गर्गे यांना कांस्य पदक मिळाले.

0000

महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी :

 महाराष्ट्र स्टार्टअप्सची राजधानी : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कौशल्य विकास विभागाला गती दिली. राज्यातील स्टार्टअप्सला जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रयत्नशील आहेत. जगात देशाला नंबर एक बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्व स्टार्टअप्स देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सर्वाधिक महिला स्टार्टअप्स : फाल्गुनी नायर

‘नायका’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर म्हणाल्या की, महिलांनी उद्योगात आघाडीवर येण्यासाठी शासकीय नियमांचे कोणतेही अडथळे नाहीत. उद्योगाच्या अनेक संधी शासनामार्फत उपलब्ध आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याने महिलांचे सक्षमीकरण होत आहे.महाराष्ट्र हे स्टार्टअप्स कॅपिटल असून त्याचा राज्यातील महिलांनी नक्की लाभ घ्यावा, असेही सांगितले.

यावेळी डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स आयटीआय गोवंडीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप्स विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमास कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईकव्यवस्थापक अमित कोठावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अवाना दुबाशराखी तांबट यांनी केले.

000

स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल

 स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण 

देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिडबी (SIDBI) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

 

मुंबईदि. 16 : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक  विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशनएलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation,Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले.

कार्यक्रमात कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगेव्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशीमेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवालाअपग्रेड अँड स्वदेस फाऊंडेशनचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवालानायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्यार्थी कल्याण चक्रवर्तीगो इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्तामहाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञानकृषीसेवा क्षेत्रऔषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील एक हजार स्टार्टअप्स या कार्यक्रमात उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत  सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26 हजार स्टार्टअप्स आहेत. देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.  स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे.

            उद्योजकदूरदर्शी गुंतवणूकदार, धोरणकर्तेइन्क्युबेटर्सविद्यापीठे  हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. ‘इज ऑफ डूईंग’ बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासना बरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.  भांडवली सहभागाच्या दृष्टीने मुंबई आघाडीवर असूनपुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र  आहे. आपली टियर-२ आणि टियर-३ शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत.  नाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

         विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअप्सला बळकटीकरण देणाऱ्या संस्था  आहेत. ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढवणार असून,   उद्योजकांना मार्गदर्शननेटवर्किंगकायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअप्सना बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे रोजगार निर्माण करणारे घटक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

‘ए आय’ स्टार्टअप्सचे सक्षमीकरण करून उत्कृष्टतेचे केंद्र बनतील. एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य असून स्टार्टअप्ससाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्याला स्टार्टअप्समध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १८ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या  (‘ ७.१४ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०४३ ’ ) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी२०४३ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१४ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

Featured post

Lakshvedhi