सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 15 January 2025
वैद्यकीय पर्यटन सुरू करावे
वैद्यकीय पर्यटन सुरू करावे
- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई,दि.१४: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाची १७३वी बैठक झाली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी टुरिस्ट गाईड प्रोग्राम, वैद्यकीय पर्यटन पुन्हा सुरू करणे, जंगल सफारी येथे कॅरॅव्हॅन सुरू करणे, इत्यादींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर येथे ११ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सुविधा सुरू करणे तसेच तापोळा, वासोटा, प्रतापगड येथे पर्यटकांच्या सोयीसाठी हेलिपॅड उभारण्यास परवानगी मिळवणे, महाबळेश्वर येथे टुरिस्ट गाईड, पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारू नयेत यासाठी गाईड प्रोग्रामची अंमलबजावणी करावी. या प्रोग्राममध्ये अधिक सक्षम प्रमाणीकरण करावे, अशा सूचना पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी
महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी
- मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.
यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा 'सक्षम अंगणवाडी आणि पोषण' उपक्रम, ' मिशन वात्सल्य ', ' मातृवंदना योजना ', 'वन स्टॉप सेंटर (सखी)' या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.
0000
वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना
वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.
वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल, असे मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.
नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईल, असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.
मंत्री श्री.नाईक म्हणाले की, ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापि, वाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, बफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.
000
पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य
पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार
पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक
नवी दिल्ली, दि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युध्दात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.
पानिपत युध्दाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या युध्द मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळयांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एकेकाळी राखले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया असेही ते म्हणाले.
या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धानक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळ, यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे
· कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली.
· शिंदेशाही पगडी, शौर्य स्मारकाची प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत.
· विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडून, मर्दानी खेळांचे प्रदर्शन
· महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित. खासकरून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित.
000
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य पदरी असणे निश्चित आहे अन्यथा कृष्णामाईचे दर्शन घडणे शक्य नाही . थोरले महाराज कृष्णा लहरीत म्हणतात ,
पुरेष्टं दत्तं वा विहितमपि पूर्वं च सुकृतं l
स्वधीतं वा जप्तं श्रुतमपि यशो S जस्य हि तदा ll
भवददृष्टिः कृष्णे भवति भवभीहृत्खलु नृणां l
नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते ll १९ ll
हे कृष्णे !! पूर्वजन्मी जर काही याग केले असतील किंवा दाने दिली असतील अथवा वाटसरूंना विश्रांती घेण्यासाठी बगीचे ,पाणी पिण्यासाठी विहिरी वगैरे खणल्या असतील व यथाविधी क्षौत्रस्मार्त कर्मे केली असतील अथवा वेदाध्ययन केले असेल ,किंवा पुरश्चरणादि जप विधिपूर्वक केला असेल ,अथवा श्रीविष्णू किंवा श्रीमहादेव यांची लीला भक्तीने श्रवण केली असेल तरच संसारातून मुक्त करणारे तुझे दर्शन त्या मनुष्याला घडेल अन्यथा घडणार नाही . हे श्रीकृष्णे ! तुला माझा नमस्कार असो . हे दत्तमान्ये शमिततृष्णे ! तुझा जयजयकार असो ll १९ ll
या ठिकाणी थोरल्या महाराजांनी केवळ दर्शनाचा उल्लेख केला आहे ,केवळ दर्शनाकरिता हि पूर्वपुण्याईची पात्रता असली तर या कृष्णामाईत असलेल्या तीर्थात स्नान ,तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात यजन- पूजन आणि सर्वात वरची पायरी म्हणजे तीरस्थ या नात्याने जन्माला येणे यासाठी किती पूर्वपुण्याई हवी याचा विचार करावा .
तीरस्थ म्हणजे या काठी निवास असलेल्या कुळात जन्म . आता तीरस्थांमध्ये देखील काय पात्रता आहेत ?? ,केवळ तीरावर म्हणजे कृष्णामाई काठी जन्म ,त्यानंतर या तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात जन्म त्याही पुढे नृसिंहवाडीसारख्या दत्त महाराजांच्या क्षेत्रात पुजारी कुलोत्पन्न आणि त्यातही वेदविद्यासंपन्न होऊन दत्त महाराजांची विधिवत सेवा घडून येणं .
आता थोरल्या महाराजांना जर कृष्णामाईचे दर्शन जर एव्हडे दुर्लभ आणि पुण्यकारक वाटत असेल तर या पुढील सर्व पायऱ्या चढून नृसिंहवाडीसारख्या क्षेत्री पुजारी कुलोत्पन्न होऊन दत्त महाराजांची सेवा हातून घडणे म्हणजे किती पूर्व पुण्याई हवी याचा विचार करावा .
शमिततृष्णे म्हणजे विषयरूपी तृष्णेचे शमन हा अर्थ असला तरी महाराजांना काय अर्थ अपेक्षित आहे ?? --- तृष्णा म्हणजे तहान , देहाचा विचार करता हि तहान पाणी पिऊन भागली कि काही वेळाने पुन्हा तहान लागते . इथे महाराज म्हणतात या विषयरूपी तृष्णेचे शमन कर म्हणजे कायमस्वरुपी हि विषयरूपी तहान नष्ट कर . विषयरूपी तहान कायम स्वरूपी शमली कि दत्त महाराजांच्या कृपेस पात्र होऊ .🙏🏻
🪷श्रीगुरुदेव दत्त !!! ---🪷
अभय आचार्य 💫🙏🏻🚩
Mirning walk ,take care
🚨 सकाळी एकटे फिरायला जाऊ नका, जाणारच असाल तर सोबत काठी घेऊन जा.
🚨 पहाटे कुत्री भुंकत असतील तर थोडं खिडकीतून डोकावून बघा कोणाला तरी तुमच्या मदतीची गरज असेल
🚨 घराच्या अवतीभोवती खरकटे टाकू नका त्यामुळे गल्लीत कुत्री वाढत आहेत....
🚨 प्रशासन तुम्हाला कुत्र्यांपासुन संरक्षण देईल या आशेवर बसु नका...आता तुम्हीच तुमचे रक्षणकर्ते बना.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...

