Friday, 10 January 2025

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

 

मुंबईदि. ९ : राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ईज ऑफ डुइंग बिझनेसची प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसात करावी. उद्योग विषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून त्यासंदर्भात तातडीने आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यासंदर्भात उद्योग विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमाहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारकामगार मंत्री आकाश फुंडकरराज्यमंत्री आशिष जैस्वालइंद्रनील नाईक उपस्थित होते.

उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांनी १०० दिवसात उद्योग विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामासंदर्भात सादरीकरण केले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) सध्या ३ हजार ५०० एकर जमीन वाटपासाठी उपलब्ध असून नवीन १० हजार एक जमीन अधिग्रहणासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ईज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत मैत्री पोर्टल व उद्योग आयुक्तालयाचे पोर्टलवर एआय चॅटबॉट सुविधा देण्यात येणार आहे. तसेच शून्य प्रलंबितता धोरण अवलंबून मैत्री पोर्टलवर आणखी ५० सेवांचा समावेश करण्याची प्रक्रिया येत्या १०० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

उद्योग धोरणइलेक्ट्रॉनिक धोरणजेम्स अँड ज्वेलरी पॉलिसीवस्त्रोद्योग धोरण व एमएसएमई धोरण या धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची आवश्यकता असून यासाठी मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू करावीअसेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्योग व निर्यातीला चालना देण्यासाठी सर्व जिल्हानिहाय गुंतवणूक व निर्यात परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दहा हजार नवउद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवउद्योजक तयार करतानाच तरुणांना अप्रेंटीशिप मिळावीयासाठी कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

तक्रार निवारणासाठी कक्ष तयार करणार

दावोस गुंतवणूक परिषद २०२५ मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यावर भर

गुंतवणूक प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तातडीने वितरित करणार

परकीय गुंतवणूक आणण्यासाठी पावले उचणार

ऑरिक सिटीदिघी पोर्ट व बिडकीन औद्योगिक शहरांमधील कामे तातडीने पूर्ण करणार

-जिल्ह्यांमध्ये उद्योग सेवा केंद्रांचे बळकटीकरणावर भर

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशीउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.


८.०६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

 ८.०६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२५ ची परतफेड

 

मुंबई,दि. ९ - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.०६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. १० फेब्रुवारी२०२५ पर्यंत देय असलेल्या  व्याजासह  दि. ११ फेब्रुवारी२०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईलअसे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा)सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.


महाराष्ट्र शासनाचे १९ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १९ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. ०९ : महाराष्ट्र शासनाच्या १९ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१४ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  १४ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १५ जानेवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १९ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी १५ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १५ जानेवारी२०४४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै १५ आणि जानेवारी १५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे १६ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १६ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. ०९ : महाराष्ट्र शासनाच्या १६ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१४ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  १४ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १५ जानेवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १६ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी १५ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक १५ जानेवारी२०४१ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै १५ आणि जानेवारी १५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची बैठक संपन्न

 किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची बैठक संपन्न


मुंबई, दि. ९ : १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य गुण वाढवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४-२५ योजना जिल्हा नियोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येते. सन २०२४-२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३ हजार ३०० उमेदवारांचे कौशल्य वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे करण्यात आले, असे शैलेश भगत, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्यो

जक


राज्यपालांच्या उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळा संपन्न 38 गुणवत्ताधारक स्नातकांना सुवर्णपदक प्रदान

 राज्यपालांच्या उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा

तिसरा दीक्षांत सोहळा संपन्न

38 गुणवत्ताधारक स्नातकांना सुवर्णपदक प्रदान

 

मुंबई, दि. 9 : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण सुरूच ठेवले पाहिजे. स्वयंशिस्तध्येयासाठी परिश्रम व सातत्य ठेवल्यास यश हे निश्चितपणे मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केले.

एचएसएनसीमुंबई विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळ राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या वरळी येथील दीक्षांत सभागृहात सपंन्न झालात्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध विद्याशाखांमधील ३८ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानीविद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागलाएचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीशकुलसचिव भगवान बालानीपरीक्षा मंडळाचे संचालक डॉ जयेश जोगळेकरअधिष्ठाताविविध महाविद्यालयांचे प्राचार्यशिक्षकपालक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी यांना विद्यापीठाचे पहिले प्रोव्होस्ट म्हणून यशस्वी कार्य केल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Maharashtra Governor presides over 3rd Convocation of HSNC University; gives away Gold Medals to 38 toppers

 

Maharashtra Governor and Chancellor of universities C P Radhakrishnan presided over the 3rd Annual Convocation of the HSNC University at Worli, Mumbai on Thu (9 Jan). Gold Medals were presented to 38 toppers from various disciplines.

Provost of HSNC University Dr. Niranjan Hiranandani, Vice Chancellor Prof. Hemlata Bagla, Trustee & President of HSNC Board Anil Harish, Registrar Bhagwan Balani, Director of Examination and Evaluation Dr. Jayesh Joglekar, Principals of Colleges, teachers and graduating students were present. The Governor also presented a Citation to Dr Niranjan Hiranandani for serving as the first provost of the HSNC University.

0000


मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत होणार

 मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत होणार


 


मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वय वर्ष 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2024 -25 ही योजना, जिल्हा नियोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप करण्यात आले आहे.


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती मुंबई उपनगर तर्फे किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2024 -25 तुकडी वाटपाकरिताची बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे, महासंचालक (प्रशिक्षण) (DGT) नरेशकुमार चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी प्रेरणा मोहने, जिल्हा अग्रणी बँकचे युवराज शिंदे, एसएमइ चेंबर ऑफ इंडियाचे मनेश भगत इत्यादी अधिकारी उपस्थित होते.


 कृषी, एरोस्पेस अँड एवियेशन, ऑटोमोटिव, ब्युटी अँड वेलनेस, कॅपिटल गुड्स, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, जेम्स अँड ज्वेलरी, हेल्थकेअर, इन्स्ट्रुमेंट, आयटीआय, माध्यम आणि मनोरंजन, पर्यटन आणि आदरातिथ्य, ऊर्जा या क्षेत्रांमध्ये उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


मुंबई उपनगर जिल्ह्यातील दहिसर, बोरीवली, कांदीवली, मालाड, अंधेरी, गोवंडी, चेंबूर, मुलूंड, कुर्ला या भागातील प्रशिक्षण संस्थांमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


जिल्ह्यातील रहिवासी व किमान दहावी व बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर 175, श्रेयस चेंबर्स, 1 ला माळा, डॉ.डी.एन रोड, फोर्ट, मुंबई 400001 दूरध्वनी क्र. (022-22626440) येथे संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शैलेश भगत यांनी के

ले आहे.


Featured post

Lakshvedhi