Friday, 20 December 2024

बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

 बोट दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन

 

नागपूरदि. १९ :- मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची दुर्घटना घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले कीनौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसारनौदलाच्या डॉक्टरांनी आपापर्यंत १३ जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे ३ तर १० नागरिकांचा समावेश आहे. ३ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक ४ वर्षाची मुलगी आहे. एक ८ महिन्यांची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान सुध्दा गंभीर असून उपचार घेत आहे.

प्रसंगाचे गांर्भीय लक्षात घेता नौदलकोस्टगार्डमुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अजूनही ८ क्राप्ट१ कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरुच आहे.

मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा क्र. ०२८३ दि. १८. १२. २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता२०२३ कलम १०६ (१)१२५ (a), १२५ (b), २८२३२४ (३)३२४ (५) प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेचअपघाताची Inland Vessels Act मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वंकष चौकशी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

0000

कृषी, पदुम, उद्योग, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी

 कृषीपदुमउद्योगऊर्जासार्वजनिक बांधकाम विभागाच्या

2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 19 :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रूतगती महामार्ग प्रकल्पाकरिता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवलराज्यातील रस्तेपूल आदी पायाभूत सुविधांचा विकासमुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनाप्रधानमंत्री पीकविमा योजनालघुमध्यमउद्योग घटकांनाविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन योजनादूध अनुदान योजनाकेंद्र शासनाचे अनुदान असलेल्या विकास योजनाप्रकल्पांसाठी राज्याचा हिस्सा आदी खर्चासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक बांधकामकृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसायउद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले कीसंबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पन्नास सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7 हजार 490 कोटी 24 लाख रुपयेकृषी व ‘पदुम’ विभागाच्या 2 हजार 147 कोटी 41 लाख रुपयेउद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाच्या 4 हजार 112 कोटी 79 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली.

----००००----

Thursday, 19 December 2024

Narayan पुजते,pl share

पत्रकारिता में दक्षता बढ़ाने के लिए कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) को समझना आवश्यक"

 पत्रकारिता में दक्षता बढ़ाने के लिए कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) को समझना आवश्यक"

                                        - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

* नागपुर प्रेस क्लब में पत्रकारों के लिए विशेष व्याख्यान

* पत्रकारिता को 'रियल टाइम' बनाने में एआई उपयोगी

* पूर्व राज्य सूचना आयुक्त राहुल पांडे की अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न

नागपुर, 18 दिसंबर: सूचना एवं जनसंपर्क विभाग के प्रधान सचिव एवं महानिदेशक ब्रिजेश सिंह ने कहा कि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) ने मीडिया कर्मियों को अधिक सक्षम बनने का मार्ग प्रशस्त किया है। मातृभाषा में ज्ञान प्राप्ति की जो सीमाएं थीं, वे अब एआई के माध्यम से कम हो गई हैं।

नागपुर प्रेस क्लब और सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के नागपुर कार्यालय द्वारा आयोजित 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन जर्नलिज्म' विषय पर विशेष कार्यक्रम में श्री सिंह ने कहा कि एआई से दूर रहने के बजाय इस तकनीक को समझना और इसके उपयोग को परिपूर्ण करना हमारी सामूहिक जिम्मेदारी है।

उन्होंने कहा कि नई तकनीक आने पर नौकरियां कम होने की आशंका व्यक्त की जाती है, लेकिन अनुभव बताता है कि तकनीक से नए अवसर सृजित होते हैं। उन्होंने एआई से प्राप्त जानकारी की जांच-पड़ताल और उसकी नैतिक एवं संवैधानिक दृष्टि से समीक्षा करने की आवश्यकता पर बल दिया।

कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे पूर्व राज्य सूचना आयुक्त राहुल पांडे ने भारतीय परिप्रेक्ष्य में एआई विकसित करने की आवश्यकता पर जोर दिया। इस अवसर पर नागपुर प्रेस क्लब के अध्यक्ष प्रदीप मैत्र, क्षेत्रीय संचालक डॉ. गणेश मुले, सूचना संचालक किशोर गांगुर्डे और दयानंद कांबळे उपस्थित थे।

राज्य के विभिन्न जिला सूचना कार्यालयों और पत्रकारिता संस्थानों ने ऑनलाइन माध्यम से कार्यक्रम में भाग लिया।

                                                     00000 

 

 

 

 

 

 

 

 

"Understanding AI Technology Essential for Enhanced Efficiency in Journalism"

Principal Secretary Brijesh Singh

Key Highlights:

Ø  Special lecture for journalists at Nagpur Press Club

Ø  AI beneficial for making journalism 'real-time'

Ø  Former State Information Commissioner Rahul Pande presided

   Nagpur, DEC 18: "Artificial Intelligence (AI) has opened new pathways for media professionals to become more information-efficient. The limitations previously faced in acquiring knowledge in our mother tongue have been significantly reduced through AI," stated Brijesh Singh, Principal Secretary and Director General of Information and Public Relations, during a special session at Nagpur Press Club.

Speaking at a program on 'Artificial Intelligence in Journalism' organized jointly by Nagpur Press Club and DGIPR's Nagpur Directorate, Singh emphasized that instead of avoiding AI, it's our collective responsibility to understand and perfect this technology through proper usage.

Singh cautioned that while concerns about job losses due to new technology are common, history has shown that technology creates new opportunities. He stressed the importance of fact-checking AI-generated content and ensuring its constitutional and ethical compliance.

 

The event was presided over by former State Information Commissioner Rahul Pande, who emphasized developing AI tools with an Indian perspective. Nagpur Press Club President Pradeep Maitr, DGIPR Regional Director Dr. Ganesh Mule, Information Director Kishore Gangurde, and Dayanand Kamble were present at the event.

The lecture was also attended online by district information offices across Maharashtra and various journalism institutions.

                                                00000



अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक

 अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक

                                                      - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

  नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान

 आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त

नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.    

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

००००००

मुंबई उपनगर जिल्हयात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहाचे आयोजन

 मुंबई उपनगर जिल्हयात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहाचे आयोजन

- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

मुंबई दि 19 - शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी 19 ते दि.24 डिसेंबर 2024 या काळात मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी दिली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात 'प्रशासन गाव की ओर हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय  यांच्या निर्देशानुसार हा सप्ताह राबविण्यात येत आहे.

या अभियानात विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित विविध तक्रारीचे निवारण युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच विविध सेवा पुरविणेबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपले सरकार पोर्टल, CPGRAMS इ. ठिकाणी तक्रारी नोंदविता येतील. या व्यतिरिक्त महाऑनलाईन पोर्टलवर विविध सेवासाठी अर्ज करता येईल. तसेच आयोजित विशेष शिबिरामध्ये अर्ज दाखल करता येतील. 

या अभियानातंर्गत दाखल तक्रारी अथवा अर्ज यावर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा व आपली गाऱ्हाणी व विविध सेवासाठींचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधान परिषदेत ठराव

 पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधान परिषदेत ठराव

 

नागपूरदि. 19 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. 

या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळपुणे येथील विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

.

Featured post

Lakshvedhi