मुंबई उपनगर जिल्हयात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहाचे आयोजन
- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई दि 19 - शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी 19 ते दि.24 डिसेंबर 2024 या काळात मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात 'प्रशासन गाव की ओर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय यांच्या निर्देशानुसार हा सप्ताह राबविण्यात येत आहे.
या अभियानात विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित विविध तक्रारीचे निवारण युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच विविध सेवा पुरविणेबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपले सरकार पोर्टल, CPGRAMS इ. ठिकाणी तक्रारी नोंदविता येतील. या व्यतिरिक्त महाऑनलाईन पोर्टलवर विविध सेवासाठी अर्ज करता येईल. तसेच आयोजित विशेष शिबिरामध्ये अर्ज दाखल करता येतील.
या अभियानातंर्गत दाखल तक्रारी अथवा अर्ज यावर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा व आपली गाऱ्हाणी व विविध सेवासाठींचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment