Monday, 2 December 2024

Kazakhstan is in Central Asia. Have you ever heard the Kazakh language ?


 Kazakhstan is in Central Asia. Have you ever heard the Kazakh language ?

 

Listen to their news !

   *You'll love it !!*


No, this is not a joke at all.

      This is for real !!

चोवीस मुळांची आई तर पहा


 

बाबूजी सांभाळले पीना


 

*कळीचे फूल झाले*

 *कळीचे फूल झाले*

             एक दिवस लेकीला 

             आई हळूच बोले

             रांधा ,वाढा ,उष्टी काढा, 

             दुसरे मी काय केले? 


लेक म्हणे हसून

श्लोक ,ओव्या ,सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस

सुरेल शब्द, स्वच्छ वाणी

भांडार तूच खुले केलेस 


        तुझा स्वयंपाक बघून बघून

        मलाही लागली गोडी

        तुझ्यातली अन्रपूर्णा

        माझ्यातही आली थोडी


 संस्कारवर्गात नाही आई

 जावे लागले आम्हाला

 कसे वागावे, कसे बोलावे

 ठेवा तुझाच सर्वांना


      नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल

      तरी काहीच अडले नाही

      तुझ्यासोबत बोलताना

      गोष्टी कधीच संपल्या नाहीत


सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस ॲडजेसमेंट       


    आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

     डाॅक्टर आमचा तूच होशी

     ओवा, हळद, शेवपा, हरडा

     आजही असते माझ्यापाशी


तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहित नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली


       पै पाहुण्यात वाढलो म्हणून

       कंटाळा आजही येत नाही

       माणसं जोडण्याची कला

       जणू जगण्याचाच भाग होई


तरीही आई आता म्हणतेस

आयुष्यात मी काय केले

तुझ्याशिवाय का गं आई, 

माझ्यातल्या *कळीचे फूल झाले?*

Sunday, 1 December 2024

*अमृतधारा - ४९*

 💧श्रीराम समर्थ💧


   *अमृतधारा - ४९*


पुष्कळदा आपण जे करतो ते कशाकरता करतो कळत नाही. 


आपण नोकरीकरता नोकरी करत नाही तर पैशाकरता करतो. आपण गाडीत कशाकरता बसलो ते माहीत नसले, तर मग सगळाच  घोटाळा होतो. मुक्काम माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व जीवनाचे कष्ट कशाकरता करायचे ते माहिती पाहिजे. 


माणूस प्रपंचाकरता श्रम करतो, त्यासाठी देश सोडतो, मानापमान पण सोसतो, हे सर्व सुख समाधान मिळण्याकरता तो करतो.


मग विचार करू की इतके वर्षे कष्ट केले तर सुख किती मिळाले? 


प्रपंचात समाधान मिळाले नाही तर तो फुकट गेला. म्हणून माणसाने आपले ध्येय ठरवावे.


आनंद वेगळी अशी वस्तू नाही, तो ज्याच्याजवळ असतो तो भगवंत मिळवावा.


भगवंताच्या विस्मरणात इतर सर्व गोष्टी मिळतील, पण समाधान मिळणार नाही.


भगवंताचे स्मरण सुटले तर गाडीबरोबर ये-जा करण्यासारखे जन्म मरण घडते (ड्रायव्हर व गार्ड रोज गाडी बरोबर काशीला ये-जा करतात पण त्यांना काही काशीयात्रा घडत नाही).


समाधान वैभवाने वा श्रीमंतीने येत नाही. ते गरीबी व झोपडीतही असेल. ते मिळाले नाही तर सर्व कष्ट फुकट गेले. समाधान मिळाले तर कष्टाचे काही वाटणार नाही.


समाधान मिळण्याकरता काय करावे हे संतांनी सांगितले. भगवंत साधावा, त्याचे प्रेम साधावे. आपण भगवंताचे होऊन राहाणे यात खरे भूषण आहे. 


*ज्याच्या प्रपंचात भगवंत व त्याचे स्मरण आहे तेथेच समाधान असते.*


*आशीर्वाद.*

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

 जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

       मुंबईदि. ३० : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे 02 डिसेंबर,2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

 जागतिक एड्स दिनी दरवर्षी १ डिसेंबर रोजी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस एड्सबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत पावलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी सन २०२४ ची जागतिक एड्स दिनाची संकल्पना ‘टेक द राईटस् पाथ ही आहे. ही संकल्पना एचआयव्ही/एड्स संसर्गाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच मानवी हक्कांचे समर्थन करण्याच्या महत्वावर भर देते.

या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-2 नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त श्री.ओमागाधू श्री.रंगा नाईक, संचालक आरोग्य सेवा, मुंबई डॉ.स्वप्निल लाळे, संचालक आरोग्य सेवा, पुणे डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉ. विजय कंदेवाड, सिनेकलाकार संजय नार्वेकर, श्रीमती कल्याणी मुळे उपस्थित राहणार आहेत.

0000

Saturday, 30 November 2024

एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास

  

एनसीसीमधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास

                                             : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

            मुंबईदि. 30 : एनसीसीमधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतोत्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी एनसीसीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.  

            ‘एनसीसीच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरणया विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेत्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते. 

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनसीसीच्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी एनसीसीमध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून एनसीसीमुळे शिस्तपालनाचे महत्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.  

            शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी शिस्तअंगी बाणवली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. 

            चर्चासत्राला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंहएचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानीसर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीनमहासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालयदिप्ती चावलाअतिरिक्त सचिवसंरक्षण मंत्रालयएचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागलाएनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारीजवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

********

 

Maharashtra Governor inaugurates seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’

 

            Mumbai - The Governor of Maharashtra and Chancellor of state universities C P Radhakrishnan today inaugurated a Seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’ at KC College Auditorium in Mumbai.

            The Seminar was organized by NCC Directorate Maharashtra in association with HSNC University.

            Director General of NCC Lt Gen Gurbir Pal Singh, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Surgeon Vice Admiral Aarti Sarin DG Armed Forces Medical College, Dipti Mohil Chawla, Additional Secretary, Ministry of Defense, Vice Chancellor of HSNC University Prof Hemlata Bagla, Additional DG, NCC Maharashtra Maj Gen Yogender Singh, officers of Armed forces and NCC cadets were present.

0000

Featured post

Lakshvedhi