Thursday, 21 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्या

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक

जिल्ह्यात ६५.५८ टक्के मतदान

 

                           * सर्वाधिक मतदान परंडामध्ये तर सर्वात कमी उमरगा मतदारसंघात.

 लक्ष ८९ हजार पुरुष   लक्ष ३२ हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क.

                           * १८ तृतीय पंथीयांनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य.

     

                धाराशिव दि.२१ (माध्यम कक्षविधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ करीता जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान झालेमतदानाची टक्केवारी ६५.५८ इतकी आहे.सर्वाधिक मतदान ६९.८३ टक्के परंडा विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी ६१.७९ टक्के मतदान उमरगा विधानसभा मतदारसंघात झाले.तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ६६.९८ टक्के  उस्मानाबाद मतदारसंघाची टक्केवारी ६३.७३ टक्के आहे.या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील  लक्ष ८९ हजार १२२ पुरुष आणि  लक्ष ३२ हजार १४० महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.तर १८ तृतीय पंथीयांनी देखील  मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

         २४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात  लक्ष ६६  हजार ३० पुरुष, लक्ष ४९ हजार ३५५ महिला आणि  तृतीय पंथीय असे एकूण  लक्ष १५ हजार ३९४ मतदार आहे.२० नोव्हेंबर रोजी  लक्ष  हजार ७८७ पुरुष,९३ हजार १०३ महिला आणि  तृतीयपंथी अशा एकूण  लक्ष ९४ हजार ८९६  मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

        २४१ -  तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण  लक्ष ८३ हजार ७७ मतदार आहे.यामध्ये  लक्ष  हजार २५ पुरुष, लक्ष ८२  हजार ४५ महिला आणि   तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहेयापैकी २० नोव्हेंबर रोजी  लक्ष ५६ हजार ५६९  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये   लक्ष ३५ हजार ९९१  पुरुष, लक्ष २० हजार ५७६  महिला आणि  तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.

       २४२ -  उस्मानाबाद   विधानसभा मतदारसंघात  लक्ष ९६  हजार ३५२    पुरुष, लक्ष ७८ हजार ३९९ महिला आणि १७ तृतीयपंथी असे एकूण  लक्ष ७४ हजार ७६८ मतदार आहे.त्यापैकी  लक्ष  ३८  हजार ८४०मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये  लक्ष २७ हजार १२७ पुरुष, लक्ष ११ हजार ७०८   महिला आणि  तृतीयपंथी मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान केले.

         २४३ - परंडा विधानसभा मतदारसंघात  लक्ष ३०  हजार  ७७३  मतदार असून यामध्ये  लक्ष ७५  हजार २२१ पुरुष, लक्ष ५५   हजार ५४६ महिला आणि  तृतीयपंथी मतदार आहे.त्यापैकी  लक्ष २४ हजार २१७ पुरुष, लक्ष  हजार ७५३ महिला आणि    तृतीयपंथी मतदार अशा एकूण  लक्ष ३० हजार ९७५ मतदारांनी मतदान केले.

****.


चारही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५८.५९ टक्के मतदान * १५२३ मतदान केंद्रावर मतदान * वेब कस्टिंगच्या माध्यमातून ५० टक्के मतदान केंद्रावर नजर * विविध उपक्रमातून मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

 

चारही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी  वाजतापर्यंत ५८.५९ टक्के मतदान

 

१५२३ मतदान केंद्रावर मतदान

वेब कस्टिंगच्या माध्यमातून ५० टक्के मतदान केंद्रावर नजर

विविध उपक्रमातून  मतदान जनजागृती

 

धाराशिव २० ( माध्यम कक्षविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळी  ते सायंकाळी  वाजतापर्यंत मतदान झाले.सायंकाळी  वाजतापर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ५८.५९ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सायंकाळी  वाजतापर्यंत झालेले मतदान मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे आहे२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात ५७.८८ टक्के,२४१तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ६२.२६ टक्के,२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ५६.२२ टक्के आणि परंडा विधानसभा मतदारसंघात ५७.७० टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर  मतदान झाले.जिल्ह्यात मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.मतदान शांततेत  सुरळीत पार पडले.सायंकाळी  वाजता नंतरही काही ठिकाणी मतदान सुरू होतेजिल्ह्यातील ७६२ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले.काही मतदान केंद्रावर महिला मतदारांनी मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून मतदान केले.

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले चारही निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार (सामान्य),श्री.गोपालचंद (सामान्य),श्री.अलुर वेंकट राव (खर्च),आर.एस.बेलवंशी (पोलीस), जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे  पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी विविध ठिकाणच्या मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली.

जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनात सायकल रॅली,मॅरेथॉनमानवी साखळी,पथनाट्य  आई वडिलांना पत्र लेखन यासारखे उपक्रम मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आले.

Wednesday, 20 November 2024

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

  

आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली;

७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १० हजार १३४  तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

 

टीप : सोबत जिल्हानिहाय आणि विभागनिहाय तक्ता सोबत जोडण्यात आला आहे.

0000


--

राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप

 राजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न;

राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थाप




 


मुंबई दि. 20 : गांधी फिल्म्स फाउंडेशन आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टच्या वतीने कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राजभवन मुंबई येथे मंगळवारी (दि. १९) एका चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कार्यशाळेला भेट दिली तसेच विद्यार्थी कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व कलाकार तसेच आयोजकांना कौतुकाची थाप दिली. 


या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू व निसर्गाचे चित्रण केले.  


गांधी फिल्म्स फाउंडेशनचे कलाकार व क्युरेटर संजय निकम व ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


 


Maharashtra Governor pats artists, students


for bringing Raj Bhavan on the canvas


 


Mumbai, Nov 20 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan admired the paintings drawn by the students and artists at a painting workshop organised by Gandhi Films Foundation and Photography Promotion Trust at Raj Bhavan Mumbai on Tue (19 Nov). 


The Governor interacted with the students and artists participating in the workshop and complimented them for bringing the heritage and beauty of Raj Bhavan on the canvas. 


Senior photographer Sudharak Olwe and Sanjay Nikam of Gandhi Films Foundation had organised the workshop.


0000

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी

राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

 

           मुंबईदि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

          राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर -  ६१.९५टक्के,

अकोला - ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८  टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड - ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४  टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे - ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९  टक्के,

हिंगोली - ६१.१८ टक्के,

जळगाव - ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर-  ६७.९७ टक्के,

लातूर - ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६  टक्के,

नागपूर - ५६.०६ टक्के,

नांदेड -  ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२  टक्के,

नाशिक -५९.८५  टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे -  ५४.०९ टक्के,

रायगड -  ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली - ६३.२८ टक्के,

सातारा - ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे - ४९.७६ टक्के,

वर्धा -  ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२  टक्के,

यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Featured post

Lakshvedhi