Thursday, 21 November 2024

चारही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५८.५९ टक्के मतदान * १५२३ मतदान केंद्रावर मतदान * वेब कस्टिंगच्या माध्यमातून ५० टक्के मतदान केंद्रावर नजर * विविध उपक्रमातून मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

 

चारही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी  वाजतापर्यंत ५८.५९ टक्के मतदान

 

१५२३ मतदान केंद्रावर मतदान

वेब कस्टिंगच्या माध्यमातून ५० टक्के मतदान केंद्रावर नजर

विविध उपक्रमातून  मतदान जनजागृती

 

धाराशिव २० ( माध्यम कक्षविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळी  ते सायंकाळी  वाजतापर्यंत मतदान झाले.सायंकाळी  वाजतापर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ५८.५९ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सायंकाळी  वाजतापर्यंत झालेले मतदान मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे आहे२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात ५७.८८ टक्के,२४१तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ६२.२६ टक्के,२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ५६.२२ टक्के आणि परंडा विधानसभा मतदारसंघात ५७.७० टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात १५२३ मतदान केंद्रावर  मतदान झाले.जिल्ह्यात मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.मतदान शांततेत  सुरळीत पार पडले.सायंकाळी  वाजता नंतरही काही ठिकाणी मतदान सुरू होतेजिल्ह्यातील ७६२ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले.काही मतदान केंद्रावर महिला मतदारांनी मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून मतदान केले.

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले चारही निवडणूक निरीक्षक श्री.पंकज कुमार (सामान्य),श्री.गोपालचंद (सामान्य),श्री.अलुर वेंकट राव (खर्च),आर.एस.बेलवंशी (पोलीस), जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे  पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी विविध ठिकाणच्या मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली.

जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मोठ्या संख्येने मतदान व्हावे यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनात सायकल रॅली,मॅरेथॉनमानवी साखळी,पथनाट्य  आई वडिलांना पत्र लेखन यासारखे उपक्रम मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi