Thursday, 24 October 2024

२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती ‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या १०११ तक्रारी प्राप्त; यापैकी ९९५ निकाली

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

 

२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती

‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या

१०११ तक्रारी प्राप्तयापैकी ९९५ निकाली

 

 मुंबईदि. २३ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्र निरीक्षक (Central Observer) यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी १३९ सामान्य निरीक्षक (General Observer), ४१ पोलीस निरीक्षक (Police Observer) व ७१ खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९८ टक्के तक्रारी निकाली

१५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप’(C-Vigil app)वर एकूण १०११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे ‘सी-व्हिजिल ॲप’ (C-Vigil app) हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.

 

आचारसंहिता भंगाच्या 

अ.क्र.

जिल्हा

एकूण दाखल तक्रारी

निवडणूक अधिकारी यांनी निकाली काढलेल्या तक्रारी

1.                   

अहमदनगर

३९

३९

2.                   

अकोला

3.                   

अमरावती

३२

३१

4.                 

औरंगाबाद

२१

१९

5.                  

बीड

6.                   

भंडारा

११

११

7.                  

बुलडाणा

8.                  

चंद्रपूर

२६

२६

9.                   

धुळे

१८

१२

10.               

गडचिरोली

००

००

11.               

गोंदिया

12.               

हिंगोली

१४

१३

13.               

जळगाव

१३

१३

14.             

जालना

१२

१२

15.              

कोल्हापूर

16.               

लातूर

17.              

मुंबई शहर

१९

१८

18.              

मुंबई उपनगर

१२७

१२६

19.               

नागपूर

२९

२९

20.              

नांदेड

२८

२८

21.               

नंदुरबार

22.              

नाशिक

23.              

उस्मानाबाद

24.             

पालघर

25.              

परभणी

26.              

पुणे

२१४

२११

27.             

रायगड

१०

१०

28.              

रत्नागिरी

29.              

सांगली

००

००

30.              

सातारा

२५

२५

31.               

सिंधुदुर्ग

००

००

32.              

सोलापूर

३९

३९

मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांची भेट

 मलबार हिल निवडणूक कार्यालयाला

केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांची भेट

 

    मुंबईदि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.

  केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमशी लवकरच त्या भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनकुमार पोतदार,सहायक खर्च निरीक्षक संजय गोरेकेंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत  यांचे संपर्क अधिकारी श्याम दडस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

*****

मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना दलाच्या (NSS) ७०० स्वयंसेवकांचा सहभाग

 मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात

टाऊनहॉल’ कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजना दलाच्या (NSS) ७०० स्वयंसेवकांचा सहभाग

 

मुंबईदि. २३ :- येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लाला लजपतराय महाविद्यालयात टाऊनहॉल’ हे मतदार जागरूकता अभियान राबविण्यात आले. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप सेललाला लजपतराय महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना दल तसेच एनजीओ मार्क युवर प्रेझेन्स (MYP) यांनी संयुक्तपणे हे अभियान राबविले.

      नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरचे स्वीपविभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणेमतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढवणेआणि प्रत्येक मतदारापर्यंत त्या प्रक्रियेची माहिती पोहचवणे आहे. या माध्यमातून लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक बनविणे हे अभियानाचे मुख्य लक्ष्य आहे.

      मुंबई शहरातील सुमारे १५ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) ७०० स्वयंसेवक आजच्या या अभियानात सहभागी झाले. लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करत डॉ. सूर्यवंशी म्हणाले कीमतदारांच्या मतदानाला चालना देण्याची गरज आहे आणि ह्यामध्ये देशातील युवकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यांनी युवकांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाही दूत’ होऊन आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.

       मुंबई शहर स्वीप प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादमलाला लजपतराय महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. हरमीत कौर भसीनमुंबई शहर स्वीप समिती सदस्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक  क्रांती उके इंदूरकरमुंबई विद्यापीठाचे एनएसएस सेलचे ओसडी सुशील शिंदेचैतन्य प्रभू  ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र दाखल

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत 

१५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र दाखल

 

मुंबईदि. २३ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत १५३ उमेदवारांचे १६४ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

000

Wednesday, 23 October 2024

टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज....

 विधानसभा निवडणूक २०२४

टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज....

 

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे.

राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारीसैन्यदलातील अधिकारीदिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक  यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारीकर्मचारीपोलीससैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय देण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ हजार २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे.  

                  निवडणूक  कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र '१२किंवा '१२ अमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.तर  संबधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करून मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते. प्रपत्र १२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे.तर १२ 'हा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी उपलब्ध करून  दिला जातो.

                     निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची व सुरक्षेसाठी तैनात अधिकारी यांची संपूर्ण माहिती  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तयार  करण्यात येते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची आगाऊरित्या माहिती भरलेले (pre- filled) प्रपत्र -१२ व १२-'संबंधित  निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात.

               पोस्टाद्वारे मतदानाचा हक्क बजाऊ इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी प्रपत्र-१२ मध्ये आपला मतदान करण्यासाठी असलेला अर्ज संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडेमतदानाच्या तारखेच्या आधी किमान ०७ दिवसांपर्यंत सादर करावा असा नियम आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती भरुन सही केलेले प्रपत्र-१२  जमा करुन घेण्यात येते. कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रपत्र-१२ तसेच १२ 'चे वितरण व संबंधित कर्मचाऱ्यांकडून भरण्यात आलेल्या प्रपत्रांची माहिती संकलित करण्यात येत असते.

          कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रपत्र-१२ विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे करणे व स्वतंत्र पाकिटांमध्ये त्या त्या मतदारसंघाचे नाव व जिल्ह्याचे नाव लिहून त्यामध्ये ठेवणेप्राप्त झालेले ‘प्रपत्र-१२’ स्कॅन करुन त्या सोबतच्या प्रपत्र-४ मधील यादीसह त्या - त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठविले जातात.

          निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पुढील ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत  विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी पडताळणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकानिवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्र व त्या सोबतचे आवश्यक प्रपत्र व लिफाफे तयार करणे व संबंधित कर्मचाऱ्यांबाबत मतदार यादीमध्ये (Marked copy) आवश्यक नोंद घेणे आवश्यक असेल.

               जिल्हा समन्वय केंद्रास दिलेल्या पहिल्या भेटी वेळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिताच्या टपाली मतपत्रिका जिल्हा समन्वय अधिकाऱ्याकडे देण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.९ नोव्हेंबर २०२४ सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा समन्वय अधिकारी यांनी राज्य स्तरावरील समन्वयन केंद्रामधील (State Clearing Centre) एकत्र येऊन त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभानिहाय टपाली मतपत्रिका तसेच त्या सोबतच्या आवश्यक प्रपत्र व लिफाफ्यांची देवाणघेवाण अन्य जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांबरोबर केली जाते. पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रवाना केली जाईल.

             निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी (दि. १० नोव्हेंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४या कालावधीत) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी हे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेण्यात येते. मतदान संपल्यानंतर सुविधा केंद्रामध्ये सर्व मतदारांनी (निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचारी) मतदान केल्यानंतर सुविधा केंद्राच्या प्रमुखाने राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांच्या उपस्थितीत मतपेट्यांमधील टपाली मतपत्रिका असलेले लिफाफे बाहेर काढून संबंधित विधानसभानिहाय त्याची विभागणी करून ते स्ट्रॉगरुमध्ये ठेवतील.

                  त्यानंतर मतदानाच्या पाच दिवस आधी  म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) संबंधित जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ असलेले स्वतंत्र लिफाफे/बॅग हे त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय किंवा अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान करण्यात आलेल्या मतपत्रिकांचे लिफाफे संबंधित जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडे सुर्पूद करतील. त्यानंतर मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य समन्वय केंद्रात सर्व जिल्ह्यांचे जिल्हा समन्वय अधिकारी टपाली मतदान पत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ यांचे आदानप्रदान करून व पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना होतील. 

           मतदानाच्या तीन दिवस ते एक दिवस आधीपर्यंतचा कालावधी ( १७ नोव्हेंबर २०२४ते १९ नोव्हेंबर २०२४) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी यांच्या मार्फत मतदान कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या प्रशिक्षणानंतर राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या दुस-या भेटी वेळी त्या त्या दिवशी प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेतली जाते व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकांच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही पूर्ण होईल.

             राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या तिसऱ्या भेटीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी व जिल्हा समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभा समन्वय अधिकाऱ्यांकडून टपाली मतपत्रिका जमा करुन घेतील व त्या राज्य समन्वय केंद्रामध्ये घेऊन जाणे व तेथे अन्य जिल्ह्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांशी टपाली मतपत्रिकांचे लिफाफे व बॅग यांचे आदानप्रदान करण्याची कार्यवाही होते.

            प्रत्येकाचे मत मोलाचे आहे राज्याची निवडणूक यंत्रणा हे जाणून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही कार्यवाही करत आहे. तरी लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी जरूर मतदान करावे.


मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

 मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी

केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

 

    मुंबईदि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १७८ - धारावी१७९- सायन कोळीवाडा१८० - वडाळा१८१- माहीम१८२ - वरळी या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, १८३ - शिवडी१८४- भायखळा१८५ - मलबार हिल१८६- मुंबादेवी१८७ - कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रीत यांची भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची

जिल्हा माध्यम कक्षास भेट

  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत  यांनी जिल्हा माध्यम संनियंत्रणासाठी माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

     यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवअपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी माध्यम कक्ष व सी-व्हिजील कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे इलेक्ट्रॉनिकमुद्रीत व समाजमाध्यमांवर  बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

   यावेळी माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.


Featured post

Lakshvedhi