Thursday, 24 October 2024

मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना दलाच्या (NSS) ७०० स्वयंसेवकांचा सहभाग

 मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात

टाऊनहॉल’ कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजना दलाच्या (NSS) ७०० स्वयंसेवकांचा सहभाग

 

मुंबईदि. २३ :- येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लाला लजपतराय महाविद्यालयात टाऊनहॉल’ हे मतदार जागरूकता अभियान राबविण्यात आले. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप सेललाला लजपतराय महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना दल तसेच एनजीओ मार्क युवर प्रेझेन्स (MYP) यांनी संयुक्तपणे हे अभियान राबविले.

      नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरचे स्वीपविभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणेमतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढवणेआणि प्रत्येक मतदारापर्यंत त्या प्रक्रियेची माहिती पोहचवणे आहे. या माध्यमातून लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक बनविणे हे अभियानाचे मुख्य लक्ष्य आहे.

      मुंबई शहरातील सुमारे १५ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) ७०० स्वयंसेवक आजच्या या अभियानात सहभागी झाले. लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करत डॉ. सूर्यवंशी म्हणाले कीमतदारांच्या मतदानाला चालना देण्याची गरज आहे आणि ह्यामध्ये देशातील युवकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यांनी युवकांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाही दूत’ होऊन आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.

       मुंबई शहर स्वीप प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादमलाला लजपतराय महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. हरमीत कौर भसीनमुंबई शहर स्वीप समिती सदस्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक  क्रांती उके इंदूरकरमुंबई विद्यापीठाचे एनएसएस सेलचे ओसडी सुशील शिंदेचैतन्य प्रभू  ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi