Wednesday, 23 October 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

 मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी

केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

 

    मुंबईदि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १७८ - धारावी१७९- सायन कोळीवाडा१८० - वडाळा१८१- माहीम१८२ - वरळी या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, १८३ - शिवडी१८४- भायखळा१८५ - मलबार हिल१८६- मुंबादेवी१८७ - कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रीत यांची भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची

जिल्हा माध्यम कक्षास भेट

  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत  यांनी जिल्हा माध्यम संनियंत्रणासाठी माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

     यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवअपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी माध्यम कक्ष व सी-व्हिजील कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे इलेक्ट्रॉनिकमुद्रीत व समाजमाध्यमांवर  बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

   यावेळी माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi