Monday, 14 October 2024

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

 मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ


मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजेपासून याची अंमलबजावणी होईल.

हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल.  पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

दिव्यात्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती

 रतन टाटा यांच्या अलिबागजवळील बंगल्यातील नोकरास रात्री पोटरीला कुत्रा चावला.त्याला डॉक्टर मिळेना व पैसे ही नव्हते.कोणीतरी सांगितले व तो डॉक्टर संदीप केळकर यांच्याकडे आला.त्यानी योग्य उपचार केले.पैसे घेतले नाही.नंतर काही दिवसांनी टाटा बंगल्यावर आल्यावर त्यांना ही गोष्ट कळली त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात मोठं पत्र   लिहून व टाटा कंपनीचे घड्याळ पाठवले.Tme is money .त्या रात्री वेळेवर उपचार झाले हे महत्त्वाचे.

काल आम्ही अलिबागला गेलो तेंव्हा ते पत्र वाचले व घड्याळ पाहिले.या काळातही असे डॉक्टर आहेत यावर कदाचीत विश्वास बसणार नाही.

सगळ्यांना कळाव म्हणून ग्रूपवर पाठवल



आपटा पानांचा औषधी उपयोग*

 ४१. *आपटा पानांचा औषधी उपयोग*



माझे संशोधनात आपट्याच्या पानांचा उपयोग पुढील त्रासांसाठी आला आहे.


लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो, फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् खराब. ह्या त्रासावर आपट्याच्या पानांचे पाणी उपयोगी पडण्याची शक्यता आहे.


ही पाने फक्त दसर्यालाच मिळतात. ती साठवून ठेवून रोज दोन पाने गरम पाण्यात टाकून गार झाले की थोडेथोडे पिऊन पहावे.

 मला पडजीभेला फायदा झाला. मी एक पान तोंडात तासभर धरून ठेवले होते.


*वेगळ्या पध्दतीने केलेले निरीक्षण*

मला पडलेले प्रश्न 

*आपट्याची पाने दसर्यालाच का? फक्त आपट्याचीच पाने कां? इतर पाने (तुळस, माका, बेलाची पाने) का नाही चालत*

*आपले पूर्वज अडाणी नक्कीच नव्हते! कारण काय असावे?*

ह्यासाठी मी माझ्या एका बॉडी सेंसेटिव्ह असलेल्या तरुण  मित्र श्री पद्मनाभ देशपांडे यांच्यावर प्रयोग केले. ही पाने दुसर्याला देण्याची प्रथा आहे म्हणजे हताळली जातात म्हणजे स्पर्शाला महत्व दिले आहे. म्हणून मित्राला आपट्याचे पान बोटात धरून ठेवायला दिले. व काय वाटते विचारले. दोन मिनीटांत त्याने सांगितले काका स्नायुंना एनर्जी मिळते आहे व ऑरामधे एनर्जी वाढली. ऑरा दाट झाला. पुढील ३०मिनीटांत त्याने सांगितले- हार्टचे मसल व घशावर काम करते, ह्या दिवसात (सबंध पावसाळ्याचे दिवसात) कमी झालेली एनर्जी भरून येत आहे असे वाटत आहे.

नंतर त्याला पायाला दुखत होते तिथे आपटा पान ओले करून उलगडून सेलोटेपने लावून ठेवले. तासाभरात त्याने दुखणे कमी झाल्याचे सांगितले.

  दोन दिवसांनी एका गृहस्थाना खांद्याला दुखत होते तेथे आपटा पान ओले करून सेलोटेपने लावले. व दिवसभर ठेवण्यास सांगितले. दुसरे दिवशी वेदना आता नाहीत असे म्हणाले.

आपट्याचे हे गुण असल्याचे पूर्वजाना माहिती असल्याने समाजाला सांगत बसण्या ऐवजी समाजाचे उपयोगासाठी  आपट्याची पाने देण्याची प्रथा सुरू केली असावी असे माझे मत झाले.

  दसर्याचे दुसरे दिवशी  ही पाने कचर्यात टाकण्या पेक्षा साठवून ठेऊन वर्षभरात वेदना कमी करण्यासाठी जरूर वापरून पहा.


अरविंद जोशी B.Sc.

९४२१९४८८९४


हा लेख मी   दसऱ्याचे आधी व्हाट्सअप वर पाठवला होता त्यानंतर लोकांनी आपट्याच्या पानाचा उपयोग करून मला अनुभव सांगितले ते पुढे देत आहे.

 एका बाईंनी तो लेख दसऱ्याला वाचला आणि रात्री आपट्याची पाने पायाला गुडघ्याखालील बाजूला बांधून झोपल्या. कारण एक वर्षभर त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली दुखत होता. कुठल्याच औषधाने फरक पडत नव्हता. हैराण झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाय दुखतो आहे हे विसरून  गेल्या होत्या, असे त्यांनी मला  फोन करून सांगितले.


एका गृहस्थांची (वय ७०वर्षे) कंबर दुखत होती. त्यांनी आपट्याच्या पानाचा काढा करून,त्यात फडके ओले करून कमरेला बांधले. असेच सात दिवस केले. त्यांना वयाच्या ४५ व्या सारखी कंबर वाटू लागली.


एका गृहस्थांनी घसा दुखत होता म्हणून आपट्याची पाने घशाला बांधून ठेवली. दुसर्‍या दिवशी त्यांना बराच फरक जाणवला.


माझ्या मुलाला (वय ४०) १० दिवसापूर्वी ताप आला होता. ताप गेल्यावर भरपूर अशक्तपणा आला. त्याने प्रयोग म्हणून माझ्याकडे असलेल्या आपट्याच्या पानाचे चूर्ण घेतले. एक तासाभरात त्याला भरपूर एनर्जी  आली.


*८ सप्टेंबर २०२० चा माझा अनुभव*

८ तारखेच्या आधी तीन दिवस माझी कंबर दूखत होती. १० तारखेला माझ्या मुलीचा वाढदिवस म्हणून मला सातारला जायचे होते. मी ८ ला सकाळी मुलाला म्हणालो की कंबर दुखते आहे उद्या सातारला जाणे जमणार नाही. तो म्हणाला थांबा मी तुम्हाला आपट्याचे तेल लावून देतो. व लगेच त्याने लावून दिले. संध्याकाळ पर्यंत कंबर पूर्ण पणे दूखायची थांबली. आम्ही सातारला जाऊन आलो.

तेल करणे - एक वाटी तीळाचे तेलात आपट्याची १५-२० पाने तळणे. गार झाले की गाळून घेऊन वापरणे.


अरविंद जोशी B.Sc.

९४२१९४८८९४


*सुचना-*

*आपट्याची पाने खरखरीत असतात. मुलायम नसतात. आपटा पान ३ इंचापेक्षा लांब नसते*

*दसर्याला आपटा पाने खरेदी करतांना नीट पाहून घ्यावीत*




माझे सर्व लेख एकत्रित करून *'आजोबांचा बटवा'* नावाचे फेसबुक पेज बनवले आहे त्याची लिंक पुढे देत आहे.


https://www.facebook.com/profile.php?id=61550682486411&mibextid=ZbWKwL

पेन्शन समस्या निरसंना साठी महालेखापाल,मुंबई ,denak 15,16,रोजी

 


मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात 'संविधान मंदिरा’चे उद्घाटन

 मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात 'संविधान मंदिरा’चे उद्घाटन

  

मुंबईदि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर हा उपक्रम कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.  आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मंत्रालयातील स्वच्छता कर्मचारी जया दीपक चव्हाणकेशव  परमारप्रतिमा विलास मांगळे यांच्या हस्ते ‘संविधान मंदिरा’चे उद्घाटन करण्यात आले.

     कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांची स्थापना  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून  करण्यात आली आहे.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आपले  संविधान आणि त्याचे महत्व, 'संविधान मंदिरांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम नक्कीच महत्वपूर्ण ठरेल.

00000

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

 स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर

सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द

 

मुंबई,दि. १४ : पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिकक्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताक्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.

पॅरिसफ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व श्री.कुसळे यांच्या प्रशिक्षक  दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पार्श्वभूमीवर पॅरिसऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यास दोन कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लाख रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बुडापेस्टहंगेरी येथे दि. १० ते २३ सप्टेंबर२०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धीबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होताया दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख एक कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लाख रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील  संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला.

०००००

वॉक च प्रकार,cat,walk pan करू शकता

 


Featured post

Lakshvedhi