Monday, 14 October 2024

आपटा पानांचा औषधी उपयोग*

 ४१. *आपटा पानांचा औषधी उपयोग*



माझे संशोधनात आपट्याच्या पानांचा उपयोग पुढील त्रासांसाठी आला आहे.


लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो, फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् खराब. ह्या त्रासावर आपट्याच्या पानांचे पाणी उपयोगी पडण्याची शक्यता आहे.


ही पाने फक्त दसर्यालाच मिळतात. ती साठवून ठेवून रोज दोन पाने गरम पाण्यात टाकून गार झाले की थोडेथोडे पिऊन पहावे.

 मला पडजीभेला फायदा झाला. मी एक पान तोंडात तासभर धरून ठेवले होते.


*वेगळ्या पध्दतीने केलेले निरीक्षण*

मला पडलेले प्रश्न 

*आपट्याची पाने दसर्यालाच का? फक्त आपट्याचीच पाने कां? इतर पाने (तुळस, माका, बेलाची पाने) का नाही चालत*

*आपले पूर्वज अडाणी नक्कीच नव्हते! कारण काय असावे?*

ह्यासाठी मी माझ्या एका बॉडी सेंसेटिव्ह असलेल्या तरुण  मित्र श्री पद्मनाभ देशपांडे यांच्यावर प्रयोग केले. ही पाने दुसर्याला देण्याची प्रथा आहे म्हणजे हताळली जातात म्हणजे स्पर्शाला महत्व दिले आहे. म्हणून मित्राला आपट्याचे पान बोटात धरून ठेवायला दिले. व काय वाटते विचारले. दोन मिनीटांत त्याने सांगितले काका स्नायुंना एनर्जी मिळते आहे व ऑरामधे एनर्जी वाढली. ऑरा दाट झाला. पुढील ३०मिनीटांत त्याने सांगितले- हार्टचे मसल व घशावर काम करते, ह्या दिवसात (सबंध पावसाळ्याचे दिवसात) कमी झालेली एनर्जी भरून येत आहे असे वाटत आहे.

नंतर त्याला पायाला दुखत होते तिथे आपटा पान ओले करून उलगडून सेलोटेपने लावून ठेवले. तासाभरात त्याने दुखणे कमी झाल्याचे सांगितले.

  दोन दिवसांनी एका गृहस्थाना खांद्याला दुखत होते तेथे आपटा पान ओले करून सेलोटेपने लावले. व दिवसभर ठेवण्यास सांगितले. दुसरे दिवशी वेदना आता नाहीत असे म्हणाले.

आपट्याचे हे गुण असल्याचे पूर्वजाना माहिती असल्याने समाजाला सांगत बसण्या ऐवजी समाजाचे उपयोगासाठी  आपट्याची पाने देण्याची प्रथा सुरू केली असावी असे माझे मत झाले.

  दसर्याचे दुसरे दिवशी  ही पाने कचर्यात टाकण्या पेक्षा साठवून ठेऊन वर्षभरात वेदना कमी करण्यासाठी जरूर वापरून पहा.


अरविंद जोशी B.Sc.

९४२१९४८८९४


हा लेख मी   दसऱ्याचे आधी व्हाट्सअप वर पाठवला होता त्यानंतर लोकांनी आपट्याच्या पानाचा उपयोग करून मला अनुभव सांगितले ते पुढे देत आहे.

 एका बाईंनी तो लेख दसऱ्याला वाचला आणि रात्री आपट्याची पाने पायाला गुडघ्याखालील बाजूला बांधून झोपल्या. कारण एक वर्षभर त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली दुखत होता. कुठल्याच औषधाने फरक पडत नव्हता. हैराण झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाय दुखतो आहे हे विसरून  गेल्या होत्या, असे त्यांनी मला  फोन करून सांगितले.


एका गृहस्थांची (वय ७०वर्षे) कंबर दुखत होती. त्यांनी आपट्याच्या पानाचा काढा करून,त्यात फडके ओले करून कमरेला बांधले. असेच सात दिवस केले. त्यांना वयाच्या ४५ व्या सारखी कंबर वाटू लागली.


एका गृहस्थांनी घसा दुखत होता म्हणून आपट्याची पाने घशाला बांधून ठेवली. दुसर्‍या दिवशी त्यांना बराच फरक जाणवला.


माझ्या मुलाला (वय ४०) १० दिवसापूर्वी ताप आला होता. ताप गेल्यावर भरपूर अशक्तपणा आला. त्याने प्रयोग म्हणून माझ्याकडे असलेल्या आपट्याच्या पानाचे चूर्ण घेतले. एक तासाभरात त्याला भरपूर एनर्जी  आली.


*८ सप्टेंबर २०२० चा माझा अनुभव*

८ तारखेच्या आधी तीन दिवस माझी कंबर दूखत होती. १० तारखेला माझ्या मुलीचा वाढदिवस म्हणून मला सातारला जायचे होते. मी ८ ला सकाळी मुलाला म्हणालो की कंबर दुखते आहे उद्या सातारला जाणे जमणार नाही. तो म्हणाला थांबा मी तुम्हाला आपट्याचे तेल लावून देतो. व लगेच त्याने लावून दिले. संध्याकाळ पर्यंत कंबर पूर्ण पणे दूखायची थांबली. आम्ही सातारला जाऊन आलो.

तेल करणे - एक वाटी तीळाचे तेलात आपट्याची १५-२० पाने तळणे. गार झाले की गाळून घेऊन वापरणे.


अरविंद जोशी B.Sc.

९४२१९४८८९४


*सुचना-*

*आपट्याची पाने खरखरीत असतात. मुलायम नसतात. आपटा पान ३ इंचापेक्षा लांब नसते*

*दसर्याला आपटा पाने खरेदी करतांना नीट पाहून घ्यावीत*




माझे सर्व लेख एकत्रित करून *'आजोबांचा बटवा'* नावाचे फेसबुक पेज बनवले आहे त्याची लिंक पुढे देत आहे.


https://www.facebook.com/profile.php?id=61550682486411&mibextid=ZbWKwL

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi