Sunday, 13 October 2024

नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

 नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील

 विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

 

            मुंबईदि. 13 :- माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावेअसे सांगून भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी अधिक जोमाने काम करूयाअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            जवाहर बाल भवन परिसरचर्नी रोड (प.) येथे उभारण्यात येणाऱ्या 'मराठी भाषा भवन'चे भूमिपूजन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना यातून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन / लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

            समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकरशालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेआमदार तथा सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकरस्थानिक लोकप्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीशालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदनमहापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिकमराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमराठी भाषा भवनासाठी चांगली जागा उपलब्ध झाली असून भवनाचे भूमिपूजन आज सागराच्या साक्षीने होत आहे याचा आपणास आनंद होत आहे. भाषा भवनाचे काम अतिशय दर्जेदार व्हावे असे सांगून या भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनसंशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाषा भवनसाठी साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांचा आदर केला जाईलअसे ते म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेदोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुनी माझी माय मराठी भाषा असल्याचे सिद्ध झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान मिळाले आहे. सर्वांनी केलेल्या सकारात्मक प्रयत्नामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

            संतांनी अभंगगवळणभारुड यातून मराठी भाषेचे सौंदर्य समोर आणले. मराठी भाषेच्या वैभवात भर घातली. ज्ञानपीठकारांनी आणि सर्व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे असे सांगून मराठी भाषेच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते केले जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेराज्यात पायाभूत सुविधा निर्माण करत असताना जनकल्याणाच्या योजनेतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनालेक लाडकीवयोश्री अशा योजनांच्या माध्यमातून सामान्यांना आधार मिळत आहे. जनकल्याणाच्या योजना राबवताना राज्याचा विकासही तितक्याच गतीने केला जात आहे. कोस्टल रोडअटल सेतूमेट्रोसमृद्धी महामार्ग असे विकासाचे मोठे प्रकल्प राबवून राज्य विकासात अग्रेसर ठेवले आहे.

            मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल असे भाषा भवन उभारले जाईलअशी ग्वाही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात आणखी भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी व राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार असल्याचे श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारतप्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

            नवी मुंबईतील मराठी साहित्य भवन व मुंबई शहरातील विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण याप्रसंगी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते  नवी मुंबईच्या ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मराठी साहित्य भवन इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासह बृहन्मुंबई महानगरपालिका विकास निधी तथा मुंबई शहर जिल्हा अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (2024-25) यातून  भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प -

 

* सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन

* जवाहर बालभवनमुंबई या इमारतीमध्ये लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रेक्षागृहसंगीत कक्षग्रंथालय व इतर अनुषंगिक कामांचा शुभारंभ

* सर ज.जी. कला संस्था वसतिगृह व सर ज.जी. वास्तुशास्त्र वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

* शासकीय तंत्रविज्ञान महाविद्यालये मुले व मुलींचे वसतिगृहवांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

* महाराष्ट्र राज्य तंत्र निकेतन मंडळप्रशासकीय इमारतवांद्रे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

* वरळीमुंबई येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

* नायगावदादरभायखळाशिवडीशीव (सायन)वरळी पोलीस वसाहत लोकार्पण/भूमिपूजन

* उमरखाडीडोंगरीडेव्हिड ससून येथील बालसुधारगृह बांधकामांचे लोकार्पण

* नागरिकदेशी व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी भारतीय औषधी पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी पोद्दार रुग्णालयवरळी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पंचकर्म सुविधांचा शुभारंभ.

* सेंट्रल बस स्टॅण्ड व मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहक/ चालक यांच्याकरिता वातानुकूलित विश्रामगृहाचे लोकार्पण

* नूतनीकरण केलेल्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार भवन व विविध क्रीडा सुविधा संकुलाचे लोकार्पण

* मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रम भूमिपूजन

* मुंबादेवी मंदिरमहालक्ष्मी मंदिर परिसर विकास कामाचे भूमिपूजन

* बाबुलनाथ मंदिर परिसर विकास कामाचा शुभारंभ

* कै. श्री. जगन्नाथ शंकरशेट यांचे स्मारक व कै. श्री. भागोजी शेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

* जे. जे. उडाणपुलाखालील हो- हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालय लोकार्पण

* ए विभागमुंबई येथील बधवार पार्क येथे फूड प्लाझाचा शुभारंभ

* ए ते डी वॉर्ड येथे पिंक टॉयलेटचे लोकार्पण

* मुंबई शहरामध्ये 14 ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ व ७ ठिकाणी भूमिपूजन

* फॅशन स्ट्रीटच्या कायापालटाचा शुभारंभ व भूमिपूजन

* मुंबई शहरातील दलित वस्तीमध्ये दहा ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ

* ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयी सुविधा उपक्रमाचा शुभारंभ

* बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 103 शाळांमधील टेरेसवरील किचन गार्डनचे लोकार्पण

* मुंबई शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण

* श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या मंजूर प्रकल्पाचे भूमिपूजन

* दादर चौपाटी किनारा पुनर्भरणी

* मुंबई शहरातील जुन्या म्हाडा इमारतींमध्ये उद्वाहन (लिफ्ट) सुविधा निर्माण करणे

* सर ज. जी. रुग्णालयातील वॉर्ड नूतनीकरण व यंत्र सामग्री लोकार्पण

* वरळी दुग्धशाळा येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण अशा बृहन्मुंबई महानगरपालिकाजिल्हा नियोजन मंडळ समितीच्या विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.

 

00000


दुःखाचे खरे कारण अपेक्षा

 *🙏दुःखाचे खरे कारण अपेक्षा🙏*


समजा आपण *एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ* आणि


 *अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ* घेऊन आलो 

आणि *घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला* तर


 *आपल्याला अतिशय दुःख होते* ^कारण^ *माठ इतक्या लवकर फुटेल* अशी *अपेक्षाच आपण केलेली नसते*.


     *त्याउलट 250 रुपयांचा* *पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला* 


तरी *आपल्याला वाईट वाटत नाही* त्याचे *कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते* .


*माठ इतक्या लवकर फुटेल* असे *वाटले नव्हते* आणि *फुटला* त्यामुळे *आपल्याला दुःख झाले* .


परंतु *फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती* ^त्यामुळे ती^ *सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही*.


     *मतितार्थ असा आहे* की,

*ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त*

 त्याच्याकडून *तितके दुःख वाट्याला येते* 

आणि *ज्याच्या कडून अपेक्षा कमी*

 ^त्याच्याकडून^ *फारसे दुःख नाही* त्यामुळे


 ^कोणाकडून^ *फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका* *आनंदी राहा .*मस्त राहा* 🙂🙏

भद्रकाली ताराराणी

 


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम


—-

विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबई दि. 12 - विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

 

मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

 

मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 98 हजार शाळांमधून सुमारे 1 कोटी 91 लाख विद्यार्थी तर सुमारे 6 लाख 60 हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.

 

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

 

शासकीय आणि खाजगी शाळा वर्गवारीतील राज्य आणि विभाग स्तरावरील विजेत्या शाळांची यादी सोबत जोडली आहे.

Saturday, 12 October 2024

पूर्वपुण्याई विषयी विचार करताना मला मोबाईल

 पूर्वपुण्याई विषयी विचार करताना मला मोबाईल/लॅपटॉपसाठी वापरल्या जाणार्‍या #पॉवर_बँक चं उदाहरण सुचलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, खडतर प्रवासात किंवा जिथे विद्युतप्रवाहाचं नामोनिशाणही नाही अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पॉवर बँक उपयोगी ठरते. पण तुमच्याकडे पूर्ण अद्ययावत, फुल्ली चार्ज्ड पॉवर बँक असेल आणि तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला तरीही एक गोष्ट आणखीन जर तुमच्यासोबत नसेल, तर त्या पॉवर बँकचा तुम्हाला शुन्य उपयोग होईल.... ती गोष्ट किंवा वस्तू म्हणजे “पॉवर सप्लाय केबल”


आध्यात्माचा विचार केला तर तुमची दैनंदिन साधना, ध्यानधारणा, मेडिटेशन, स्तोत्रवाचन, मंत्रसाधना, शुभकर्मे किंवा नामस्मरण या गोष्टी त्या पॉवर सप्लाय केबलचं काम करतात. तुमच्याकडे पूर्वपुण्याई जोरदार आहे, परमेश्वरी कृपेचा वरदहस्त आहे पण दैनंदिन साधना उत्तम नसेल तर ती एनर्जी किंवा शक्ती ⚡ तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. ती जवळ असूनही व्यर्थ ठरते. रोज न चुकता काहीतरी साधना किमान २० मिनिटे तरी कराच. रोजच्या साधनेशिवाय, उपासना आणि प्रार्थनेशिवाय आध्यात्म व्यर्थ आहे..... सुप्रभात 🙏🏻


-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

साभार......

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार

 

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार

 

मुंबईदि. १० : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे १४ ऑक्टोबर२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून राज्यात सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यापुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य

सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य

सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच स्थानिक खासदारआमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावावीअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

000

 


महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 महाप्रितने राज्यात परवडणारी घरेसौरऊर्जाकृत्रिम बुद्धीमत्ता

क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

        मुंबई दि. 12 :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरेसौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित - महाप्रीत संचालक मंडळाची 25 वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (दि. 11 ऑक्टोबर) संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक सचिव बिपीन श्रीमाळी यांच्यासह संचालक मंडळाचे इतर विभागीय प्रतिनिधी आणि महाप्रीतचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाप्रितच्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामुळे पुनर्वसनासाठी हजारो परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. यातून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रित राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत साकारणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील 10 हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती करून या महामार्गाच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. गोवा ऊर्जा विकास अभिसरणासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची संधी महाप्रितला मिळाली आहे. ही संधी म्हणजे महाप्रितच्या जागतिक दर्जाच्या कामाची पावती आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीत महाप्रित संचालक मंडळाने विविध प्रस्ताव मंजूर केले. त्यात प्रामुख्याने 1) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमातील घटक ज्यात किसन नगर ठाणे येथील दोन मोकळ्या जमिनींवर सुमारे 1 हजार 650 कोटींच्या 5 हजार 213 पुनर्वसन निवासी युनिट्सचे बांधकाम2) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड या एसपीव्हीची ठाणे येथील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निर्मिती3) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाण्यातील किसान नगरकोपरी आणि लोकमान्य नगर येथील क्लस्टर्सच्या विकासास मान्यता4) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) साठी पीडीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी 1 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन अंदाजे 1 हजार 372 कोटी5) महाप्रित द्वारे AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 10 हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मान्यता6) "मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्यातील 10 हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांसाठी एमएसएमई क्षेत्रासाठी 400 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील सर्वात मोठ्या रूफ टॉप सोलार योजनेपैकी एक अशा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

            सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी सौर प्रकल्पांसाठी एमएसआरडीसी सोबत JVA करण्याचे निर्देश तसेच NTPC ग्रीन सोबत JVA ला 10GW च्या अक्षयऊर्जा प्रकल्पांसाठी पुढील कार्यवाहीसाठी आणि गोवा शासनाचे गोवा ऊर्जा विकास अभिसरण साठी 30 MW सौर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

            बैठकीत डिसेंबर 2023 मध्ये दावोस येथे करण्यात आलेल्या सौरपवन-सौर संकरित प्रकल्प, AI प्रकल्पाच्या विविध  प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे महाप्रितला देण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व भिवंडी आणि चंद्रपूरयवतमाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना या प्रकल्पांची माहिती मंडळाला देण्यात आली.

000

 

 

 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित के संचालक मंडल की बैठक संपन्न

महाप्रित ने राज्य में  किफायतशीर मकान, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्र के

परिवर्तन का नेतृत्व करना चाहिये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

        मुंबई दि. 12 :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्य में किफायतशीर मकान, सौरऊर्जा और कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र के परिवर्तन नेतृत्व करना चाहिये. महाप्रित के माध्यम से राज्य में होनेवाली विविध परियोजनाओ के काम तेजी से और गुणवत्तापुर्ण करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस दौरान सम्बंधितो को दिये. 

       महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित - महाप्रित संचालक मंडल की 25 वी बैठक मुख्यमंत्री शिंदे की अध्यक्षता में गत शुक्रवार (दि. 11 अक्टुबर)  को संपन्न हुई, वे इस बैठक में बोल रहे थे. बैठक में व्यवस्थापकीय संचालक सचिव बिपीन श्रीमाळी समेत संचालक मंडल के अन्य विभागीय प्रतिनिधि और महाप्रीत के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे. 

            इस बैठक में मुख्यमंत्री शिंदे ने कहा कि महाप्रित के माध्यम से ठाणे शहर में क्लस्टर प्रकल्प प्रभावपुर्ण तरीके से चलाया जा रहा है. इससे पुनर्वसन के लिये हजारो किफायतशीर मकान उपलब्ध होंगे. इससे अनेको को उंनके अधिकार के मकान का सपना पुरा होग. सौर ऊर्जा क्षेत्र में महाप्रित राज्य में और दुसरे  राज्यो में अक्छा काम कर रहा है. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत चलानेवाली परियोजनाओ की  वजह से राज्य के 10 हजार लघु और मध्यम औ‌द्योगिक वर्गो को अक्षय ऊर्जा उपलब्ध होगी. साथ ही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग से सटे  भुमि पर सौर ऊर्जा प्रकल्प के  द्वारा ऊर्जा निर्मिती कर इस महामार्ग की विशेषता में वृद्धि होगी. गोवा ऊर्जा विकास अभिसरण के लिये सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती के महाप्रित को मिला है. यह अवसर यानि  महाप्रित को  वैश्विक स्तर के कामो का दस्तावेज होने की बात मुख्यमंत्री ने कही.

            इस बैठक में महाप्रित संचालक मंडल ने विविध प्रस्ताव मंजूर किये, इसमें  प्रमुखता से 1) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम के घटक जिसमें किसन नगर ठाणे स्थित दो खाली भुमि (मोकळ्या जमिनींवर) पर तकरीबन 1 हजार 650 करोड के 5 हजार 213 पुनर्वसन निवासी युनिट्स का निर्माणकार्य, 2) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड इस एसपीव्ही की ठाणे स्थित क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प के क्रियांव्ययन के लिये निर्मिती, 3) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाणे के किसान नगर, कोपरी और लोकमान्य नगर स्थित क्लस्टर्स के विकास को मान्यता, 4) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) के लिये पीडीएमसी की नियुक्ति को मंजुरी 1 हजार हेक्टेयर से अधिक भुमि अंदाजन 1 हजार 372 करोड,  5) महाप्रित द्वारा AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट के लिये 10 हजार करोड के निधि के निर्माण के लिये मान्यता, 6) "मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्य के 10 हजार लघु और मध्यम औ‌द्योगिक वर्गो के  लिये एमएसएमई क्षेत्र के लिये 400 मेगावॅट क्षमता के भारत के सबसे बडे रूफ टॉप सोलार योजना में से एक ऐसी परियोजना को मान्यता दी गई है. 

            साथ ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि सौर परियोजनाओ के लिये एमएसआरडीसी के साथ JVA करने के निर्देश और NTPC ग्रीन के साथ JVA को 10GW के अक्षयऊर्जा परियोजना के  लिये अगली कार्यवाही के लिये और गोवा सरकारअ के गोवा ऊर्जा विकास अभिसरण के लिये 30 MW सौर परियोजना को मंजुरी दी गई है. 

            बैठक में दिसम्बर 2023 में दावोस में किये गये सौर, पवन-सौर संकरित परियोजना, AI व के विविध  प्रगति का जायजा प्रस्तुत किया गया. महाराष्ट्र सरकार के द्वारा महाप्रित को दी गई झोपडपट्टी पुनर्वसन परियोजना  व भिवंडी और चंद्रपुर, यवतमाल में प्रधानमंत्री आवास योजना इन परियोजनाओ की जानकारी मंडल को दी गई. 

000

 

 

 

Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Limited (MahaPreit) Board of Directors meeting held on Friday

MahaPreit needs to lead the changes in sectors like affordable housing, Solar Power and AI – Chief minister Eknath Shinde

Mumbai, Oct 12 – Expressing his expectations from the Mahatma Phule Renewable Energy & Infrastructure Technology Limited (MahaPreit) to lead the changes in the sectors like affordable housing, solar energy and artificial intelligence, chief minister Eknath Shinde directed to expedite ongoing projects of MahaPreit with quality in a speedy manner.

The 25th meeting of the board of directors of MahaPreit was held yesterday (October 11th). The meeting chaired by chief minister Shinde was attended by managing director Bipin Srimali, divisional representatives from the board and senior officials of the MahaPreit.   

Pointing out that cluster project was being implemented effectively through MahaPreit in Thane city, chief minister Shinde said that it would make available thousands of affordable houses which would result in fulfilment of dream for many. Lauding MahaPreit for its work in the field of solar energy in state and outside state, he said that the project which is being done under Chief Minister small industries rooftop solar scheme would provide uninterrupted energy to various small and medium industry constituents. He said that in addition to this, the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray prosperity corridor highway would also generate solar energy which would be additional feature of this project. Pointing out that MahaPreit has been given opportunity to set up solar power plant for Goa Energy Development Authority, chief minister said that this opportunity is testimony of world-class work by the MahaPreit.

Various resolutions were passed during MahaPreit board of director’s meeting. It includes, parts of Thane cluster development which includes work for 5213 residential rehabilitation units worth Rs. 1650 crores on two vacant lands at Kisan Nagar, setting up a special purpose vehicle (SPV) Thane cluster development and area improvement company limited for implementing cluster development, sanction to cluster development at Kisan Nagar, Kopari and Lokmanya Nagar in Thane under PPP model, sanction to appointing PDMC for Maharashtra Chemical Logistics Park on more than one thousand hectares of land worth Rs. 12372 crores, sanction to fund raising of Rs. 10 thousand crores for AIF Thane cluster development by MahaPreit, sanction to one of the biggest roof top solar projects of 400 MW capacity under MLSY for 10 thousand MSME.    

The meeting also gave sanction to ink IVA with MSRDC for solar projects on Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray prosperity corridor and JVA with NTPC Green for 10 GW Akshay Urja project along with further action of the same. It also gave sanction for 300 MW solar project for Goa Government GEDA.

A progress report on solar energy and wind energy projects along with AI based projects inked during the Davos 2023 summit was presented before the meeting. The meeting was also apprised of projects like slum rehabilitation projects given to MahaPreit and PMAY Pradhan Mantri Awas Yojana projects at Bhivandi, Chandrapur and Yavatmal.

000

 

 

Featured post

Lakshvedhi