Saturday, 12 October 2024

पूर्वपुण्याई विषयी विचार करताना मला मोबाईल

 पूर्वपुण्याई विषयी विचार करताना मला मोबाईल/लॅपटॉपसाठी वापरल्या जाणार्‍या #पॉवर_बँक चं उदाहरण सुचलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, खडतर प्रवासात किंवा जिथे विद्युतप्रवाहाचं नामोनिशाणही नाही अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पॉवर बँक उपयोगी ठरते. पण तुमच्याकडे पूर्ण अद्ययावत, फुल्ली चार्ज्ड पॉवर बँक असेल आणि तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला तरीही एक गोष्ट आणखीन जर तुमच्यासोबत नसेल, तर त्या पॉवर बँकचा तुम्हाला शुन्य उपयोग होईल.... ती गोष्ट किंवा वस्तू म्हणजे “पॉवर सप्लाय केबल”


आध्यात्माचा विचार केला तर तुमची दैनंदिन साधना, ध्यानधारणा, मेडिटेशन, स्तोत्रवाचन, मंत्रसाधना, शुभकर्मे किंवा नामस्मरण या गोष्टी त्या पॉवर सप्लाय केबलचं काम करतात. तुमच्याकडे पूर्वपुण्याई जोरदार आहे, परमेश्वरी कृपेचा वरदहस्त आहे पण दैनंदिन साधना उत्तम नसेल तर ती एनर्जी किंवा शक्ती ⚡ तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. ती जवळ असूनही व्यर्थ ठरते. रोज न चुकता काहीतरी साधना किमान २० मिनिटे तरी कराच. रोजच्या साधनेशिवाय, उपासना आणि प्रार्थनेशिवाय आध्यात्म व्यर्थ आहे..... सुप्रभात 🙏🏻


-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

साभार......

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi