Saturday, 12 October 2024

मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तत्पूर्वी बंटर भवन कुर्ला येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकरमाजी खासदार राहुल शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणालेमहाराष्ट्र उद्योग तसेच परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात महिलांबरोबरच शेतकरीयुवाज्येष्ठ नागरिक आदींसाठी देखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाहीअसे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन भूमिपूजन तसेच लोकार्पण झालेले प्रकल्प

छेडा नगर उड्डाण पुलाचे लोकार्पण. पूर्व द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर पासून ते यु टर्न करिता प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. चुनाभट्टी रेल्वे फाटक वरून प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चुनाभट्टी प्रवेशद्वार व इतर कामाचे लोकार्पण. कामराज क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण.

टिळक नगर येथील हनुमान मंदिर उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मधील नाना नानी पार्क व बालोद्यान याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ. कुर्ला विधानसभेमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ. नेहरूनगर टिळक नगर या म्हाडा वसाहती मधील दुसऱ्या टप्प्यातील मला निसारण महिन्यांच्या कामाचे शुभारंभ. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ  माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण.

000

 


महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या

संचालक मंडळाची बैठक संपन्न

महाप्रितने राज्यात परवडणारी घरेसौरऊर्जाकृत्रिम बुद्धीमत्ता

क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

        मुंबई दि. 12 :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरेसौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित - महाप्रीत संचालक मंडळाची 25 वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 11 ऑक्टोबर) संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक सचिव बिपीन श्रीमाळी यांच्यासह संचालक मंडळाचे इतर विभागीय प्रतिनिधी आणि महाप्रीतचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणालेकी महाप्रितच्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामुळे पुनर्वसनासाठी हजारो परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. यातून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रित राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत साकारणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील 10 हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती करून या महामार्गाच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. गोवा ऊर्जा विकास अभिसरणासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची संधी महाप्रितला मिळाली आहे. ही संधी म्हणजे महाप्रितच्या जागतिक दर्जाच्या कामाची पावती आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीत महाप्रित संचालक मंडळाने विविध प्रस्ताव मंजूर केले. त्यात प्रामुख्याने 1) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमातील घटक ज्यात किसन नगर ठाणे येथील दोन मोकळ्या जमिनींवर सुमारे 1 हजार 650 कोटींच्या 5 हजार 213 पुनर्वसन निवासी युनिट्सचे बांधकाम2) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड या एसपीव्हीची ठाणे येथील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निर्मिती3) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाण्यातील किसान नगरकोपरी आणि लोकमान्य नगर येथील क्लस्टर्सच्या विकासास मान्यता4) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) साठी पीडीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी 1 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन अंदाजे 1 हजार 372 कोटी5) महाप्रित द्वारे AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 10 हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मान्यता6) "मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्यातील 10 हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांसाठी एमएसएमई क्षेत्रासाठी 400 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील सर्वात मोठ्या रूफ टॉप सोलार योजनेपैकी एक अशा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

            सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी सौर प्रकल्पांसाठी एमएसआरडीसी सोबत JVA करण्याचे निर्देश तसेच NTPC ग्रीन सोबत JVA ला 10GW च्या अक्षयऊर्जा प्रकल्पांसाठी पुढील कार्यवाहीसाठी आणि गोवा शासनाचे गोवा ऊर्जा विकास अभिसरण साठी 30 MW सौर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

            बैठकीत डिसेंबर 2023 मध्ये दावोस येथे करण्यात आलेल्या सौरपवन-सौर संकरित प्रकल्प, AI प्रकल्पाच्या विविध  प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे महाप्रितला देण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व भिवंडी आणि चंद्रपूरयवतमाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना या प्रकल्पांची माहिती मंडळाला देण्यात आली.

आरती की थाली में प्रायः तीन चीजें होती हैं, जिनको हम लगभग एक साथ जलाते हैं *कपूर, धूप और दीप*।

 *🌹जीवन दर्शन🌹*


आरती की थाली में प्रायः तीन चीजें होती हैं, जिनको हम लगभग एक साथ जलाते हैं *कपूर, धूप और दीप*।


कपूर शीघ्र जल जाता है ,

धूप काफी देर तक जलती है और दीप🪔 और अधिक समय तक।

कई बार सोचा कि इसके पीछे क्या आध्यात्मिक दर्शन हो सकता है।


एक दिन चिंतन में स्पष्ट हुआ कि 

कपूर हमारे सुख का प्रतीक है,सुख बीतते समय नहीं लगता।


धूप हमारे दुःख का प्रतीक है जो हमारे मन को  लंबे समय तक सालता रहता है,यानी व्यथित करता रहता है

🪔दीप हमारे आनन्द का प्रतीक है क्योकि एक बार जलने के बाद सबसे अधिक दीप ही टिकता है, इसलिए ही अखण्ड 🪔 दीप की अवधारणा ने जन्म लिया।

 इसलिए कई लोग अखण्ड 🪔 दीप जलाते हैं।

इसका अर्थ है कि जीवन में अखण्ड आनन्द की कामना हम सभी करते हैं।

कभी आपने सुना कि अखंड कपूर जलाया जाता हो या अखण्ड धूप जलाई जाती हो ? 

*नहीं, भारतीय मनीषा सुख और दुःख की अवधारणा से मुक्त हो कर अखण्ड आनन्द की कामना की अवधारणा की पोषक है।*


उस दिन आरती की थाली में जलने वाली इन तीन वस्तुओं का रहस्य समझ आया।


आज मन किया कि 

इस चिंतन मणि से आपका भी परिचय करवा दूं.....


लोग प्रायः नवरात्रि को अखण्ड दीप जलाते हैं। 


*आज आपने अखण्ड दीप का अर्थ जान लिया..*

*अर्थात अखण्ड आनन्द।।*


*शुभ स्वस्थ जीवन स्वजन*

*सर्वे भवन्तु सुखिनः.......*

           

*शुभ मंगल दर्शन/सोच को नमन*

सारकोपेनिया*(SARCOPENIA)स्नायूंच्या कमकुवतपणाला सारकोपेनिया म्हणतात.

 *सारकोपेनिया*(SARCOPENIA)


 वाढत्या वयाबरोबर शरीराच्या स्नायूंची (मस्कुलो स्केलेटल) ताकद कमी होते. स्नायूंच्या कमकुवतपणाला सारकोपेनिया म्हणतात. 

योग्य माहिती आणि जागरुकतेच्या अभावामुळे हा आजार मधुमेह टाईप-२ कडे ढकलला जातो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस - दिल्ली म्हणजेच "एम्स"मध्ये केलेल्या अभ्यासात ही बाब प्रत्कर्षांने समोर आली आहे. 

सारकोपेनिया सामान्यत: वृद्ध व बैठी व्यक्ती आणि अशा रुग्णांना प्रभावित करते ज्यांना मस्क्यूकोस्केलेटल प्रणालीवर परिणाम करणारे किंवा शारीरिक हालचाली बिघडवणाऱ्या सह-विकृती आहेत.


*सार्कोपेनियाचा विचार करूया!*

१. शक्य तितके उभे राहण्याची, शक्य तितकी कमी बसण्याची सवय लावावी. बसता येत असेल तर निदान झोपु नका.

२. एखादी मध्यमवयीन व्यक्ती रुग्णालयात दाखल असेल तर *त्याला जास्त विश्रांती घ्यायला सांगू नका. सतत पलंगावर झोपून बसण्याचा सल्ला देऊ नका.* आठवडाभर पडून राहिल्याने स्नायूंचे प्रमाण ५% कमी होते. म्हातारा माणूस त्याचे स्नायू पुन्हा तयार करू शकत नाही, एकदा ते गेले की ते पूर्ण नष्ट होतात. सामान्यत: मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचे स्नायू लवकर कमकुवत होतात.

३. ऑस्टियोपोरोसिस पेक्षा सारकोपेनिया जास्त धोकादायक आहे.  ऑस्टियोपोरोसिसमध्ये फक्त पडू नये ही एकच काळजी घेणे आवश्यक आहे. सारकोपेनिया केवळ जीवनाच्या गुणवत्तेवरच परिणाम करत नाही तर स्नायूंच्या अपुऱ्या वस्तुमानामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते.

४. स्नायू गळतीमध्ये सर्वात जलद नुकसान पायांच्या स्नायूंमध्ये होते.  हे खूप महत्वाचे आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती बसते किंवा झोपते तेव्हा पाय हलत नाहीत आणि पायाच्या स्नायूंच्या ताकदीवर मोठा परिणाम होतो.


 *सारकोपेनियाबद्दल काळजी घ्यावी लागेल.* 

पायऱ्या चढणे, हलके धावणे, सायकल चालवणे हे सर्व उत्तम व्यायाम आहेत आणि स्नायू तयार व बळकट करू शकतात.

म्हातारपणी चांगल्या दर्जाच्या जीवनासाठी मानवी स्नायूंचा नाश रोखण्यासाठी तुमच्या वडिलांना आणि प्रियजनांना शक्य तितके चालायला सांगा.


*म्हातारपणाची सुरुवात पायाने होते!*

आपले पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा. वयानुसार आपले पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जर तुम्ही फक्त दोन आठवडे तुमचे पाय हलवले नाहीत तर तुमच्या पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होते.

 *नियमित व्यायाम आणि चालणे खूप महत्वाचे आहे.*

पाय हा एक प्रकारचा खांब आहे ज्यावर मानवी शरीराचा संपूर्ण भार असतो.

 दररोज चालणे महत्वाचे आहे.

 विशेष म्हणजे मानवामध्ये ५०% हाडे आणि ५०% स्नायू असतात. ते मुख्यत्वे पायात आहेत.


*तुम्ही रोज फिरायला जाता का?*

मानवी शरीरातील सर्वात मोठे मजबूत सांधे आणि हाडे 

पायात आढळतात.

७०% मानवी हालचाल आणि ऊर्जेचा घसारा पायांमधून होतो.

*पाय हे शरीराच्या हालचालीचे केंद्र आहे.*

मानवी शरीराच्या ५०% नसा आणि ५०% रक्तवाहिन्या या दोन्ही पायांमध्ये असतात आणि 

यामधून ५०% रक्त वाहते.

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते.

*वयाच्या सत्तरीनंतरही पायाचे व्यायाम करावेत*

 तुमच्या पायांना योग्य व्यायाम मिळत असल्याची खात्री करण्यासाठी आणि 

तुमच्या पायाचे स्नायू निरोगी राहण्यासाठी, 

दररोज किमान ३०-४० मिनिटे चाला.


*कृपया हा महत्त्वाचा लेख तुमच्या ५० वर्षांवरील वृद्धांना आणि मित्रांना पाठवा! कारण आपण सर्व दिवसेंदिवस वृद्ध होत आहोत*.

🙏✨🙏

'दिलखुलास' कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत

 'दिलखुलासकार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे

सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात बाष्पके संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम या विषयावर बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्र हे बाष्पक उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. बाष्पक सयंत्र हे वाफेशी संबंधित आहे. हे ऑईल मिलवस्त्र उद्योगरासायनिक उद्योगपेट्रोकेमिकल्सरिफायनरिज (कच्चे खनिज तेल)दुग्ध/खादय व्यवसायहॉटेल उद्योगविजनिर्मिती इत्यादीसाठी वापरले जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. बाष्पक हे अत्यंत उपयोगी जरी असले तरी त्याच्या स्फोटकतेमुळे ते धोकादायकही ठरु शकते. यासाठी शासनस्तरावर बाष्पके संचालनालयामार्फत घेतलेले धोरणात्मक निर्णयबाष्पकांच्या सुरक्षित व प्रभावी वापराकरिता जनजागृतीतसेच बाष्पकं हाताळतांना जिवीत व वित्तहानी होवू नये याकरिताचे प्रयत्न याबाबत सहसंचालक श्री. वानखेडे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 12 आणि सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्वेता शेलगावकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

9 औषधियों के पेड़-पौधे जिन्हें नवदुर्गा कहा गया है

 ।।श्रीगणेशाय नमः।।


9 औषधियों के पेड़-पौधे जिन्हें नवदुर्गा कहा गया है--


           (1) 


प्रथम शैलपुत्री (हरड़)


कई प्रकार के रोगों में काम आने वाली औषधि हरड़ हिमावती है, जो देवी शैलपुत्री का ही एक रूप है, यह आयुर्वेद की प्रधान औषधि है यह पथया, हरीतिका, अमृता, हेमवती, कायस्थ, चेतकी और श्रेयसी सात प्रकार की होती है।


             (2) 


ब्रह्मचारिणी (ब्राह्मी)


ब्राह्मी आयु व याददाश्त बढ़ाकर, रक्तविकारों को दूर कर स्वर को मधुर बनाती है, इसलिए इसे सरस्वती भी कहा जाता है।


           (3) 


चंद्रघंटा (चंदुसूर) 


यह एक ऐसा पौधा है जो धनिए के समान है, यह औषधि मोटापा दूर करने में लाभप्रद है इसलिए इसे चर्महंती भी कहते हैं।


           (4)


 कूष्मांडा (पेठा)


इस औषधि से पेठा मिठाई बनती है, इसलिए इस रूप को पेठा कहते हैं, इसे कुम्हेड़ा भी कहते हैं जो रक्त विकार दूर कर पेट को साफ करने में सहायक है, मानसिक रोगों में यह अमृत समान है, आज सैक्रीन से बनने वाला पेठा नहीं खाये घर में बनायें।


            (5) 


स्कन्दमाता (अलसी)


देवी स्कन्दमाता औषधि के रूप में अलसी में विद्यमान हैं, यह वात, पित्त व कफ रोगों की नाशक औषधि है, इसमें फाइबर की मात्रा अधिक होने से इसे सभी को भोजन के पश्चात् काले नमक से भूँजकर प्रतिदिन सुबह शाम लेना चाहिए यह खून भी साफ करता है।


            (6) 


कात्यायनी (मोइया) 


देवी कात्यायनी को आयुर्वेद में कई नामों से जाना जाता है जैसे अम्बा, अम्बालिका व अम्बिका इसके अलावा इन्हें मोइया भी कहते हैं, यह औषधि कफ, पित्त व गले के रोगों का नाश करती है।


             (7) 


कालरात्रि (नागदौन) 


यह देवी नागदौन औषधि के रूप में जानी जाती है, यह सभी प्रकार के रोगों में लाभकारी और मन एवं मस्तिष्क के विकारों को दूर करनेवाली औषधि है, 

यह पाइल्स के लिये भी रामबाण औषधि है, इसे स्थानीय भाषा जबलपुर में दूधी कहा जाता है।


            (8) 


महागौरी (तुलसी)


तुलसी सात प्रकार की होती है सफेद तुलसी, काली तुलसी, मरूता, दवना, कुढेरक, अर्जक और षटपत्र ये रक्त को साफ कर हृदय रोगों का नाश करती है, एकादशी को छोड़कर प्रतिदिन सुबह ग्रहण करना चाहिए।


             (9) 


सिद्धिदात्री (शतावरी) 


दुर्गा का नौवां रूप सिद्धिदात्री है जिसे नारायणी शतावरी कहते हैं, यह बल, बुद्धि एवं विवेक के लिए उपयोगी है, विशेषकर प्रसूताओं (जिन माताओं को ऑपरेशन के पश्चात् अथवा कम दूध आता है) उनके लिए यह रामबाण औषधि है इसका सेवन करना चाहिए।


आइए हम सभी इस नवरात्र के पावन अवसर पर इन प्राकृतिक आयुर्वेदिक औषधियों का सेवन कर स्वयं को स्वस्थ बनाएँ एवं जन-जन तक पहुँचाएँ।


      जय माता दी

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न

 वृत्त क्र. १९२६

 

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न

 

३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांची कामे

मुंबईदि. ११ : सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) टप्पा-२ या प्रकल्पांतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पध्दतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.

यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकरमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितसचिव सदाशिव साळुंखेसचिव संजय दशपुतेमाजी आमदार प्रमोद जठारमुख्य अभियंता हांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते.

हॅमच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी येत्या अडीच वर्षांच्या काळात ६ हजार कि.मी लांबीचे रस्ते पूर्णत्वास येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॅमच्या माध्यमातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून एकूण ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत.  यापैकी ३० टक्के निधी हा राज्य शासनामार्फत व ७० टक्के निधी हा कर्ज स्वरूपात विविध वित्तीय संस्थाकडून उभारण्यात येत आहे.

कर्ज स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी सद्यस्थितीत रूपये ५,५०० कोटी इतका निधी कर्ज स्वरूपात देणेबाबत हुडको या वित्तीय संस्थेसमवेत अंतिम वित्तीय करारनामा करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत होणारे सर्व रस्ते हे काँक्रीट पृष्ठभागाचे होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन संबंधित भागांचा आर्थिक विकास होणेवाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी होणेपर्यावरणाचे प्रदुषण कमी होवून आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होणेआपत्ती निवारणास मदत होणेपर्यटनात वाढ होणेरोजगार निर्मिती होणे असे अनेक फायदे होणार आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत कोकण विभाग-१५पुणे विभाग-२८नाशिक विभाग-२४छत्रपती संभाजीनगर विभाग-२०नांदेड विभाग-१३अमरावती विभाग-३०नागपूर विभाग-१५ अशी एकूण १४५ प्रकल्प मंजूर आहेत. सदर प्रकल्पांची निविदा निश्चिती करण्यात आलेली असून भूमिपूजन झालेल्या कामांचा आजपासून शुभारंभ करण्यात येत आहे.

नव्याने होणाऱ्या या रस्तांमुळे रस्त्यांमुळे गावांमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक व पर्यटन स्थळे चांगल्या दर्जाच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन रोजगार उपलब्ध होणार आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे १० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत ब्रीज कम बंधारा बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या लांबीमधील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत. तसेच जल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे प्रकल्प राबविताना सामाजिक व पर्यावरण सुरक्षा सांभाळली जाणार आहे.

0000

Featured post

Lakshvedhi