Saturday, 12 October 2024

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

  

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

             मुंबईदि. ११ :  मुंबईतील पशुवधगृह येथे पशूवधगृहाची जागा वगळून इतर जागेत प्राण्यांसाठी आश्रयस्थळ उभारण्यासाठी  बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागा निश्चित करावी. यासाठी महानगरपलिका किंवा शासकीय आरक्षित जागेवर  आश्रयस्थळ उभारावेअसे निर्देश मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष संदीप निचित यांनी आज दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.निचित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व) येथे मदत झाली. या बैठकीस उपायुक्त पशुसंवर्धन तथा सदस्य सचिव डॉ.शेलेश पेठेदेवनार पशुवधगृहाचे सहायक महाव्यवस्थापक डॉ.सचिन कुलकर्णीवरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश वानखेडे आधि उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी श्री.निचित म्हणाले कीप्राण्यांकरिता आश्रयस्थळ उभारण्यासाठी पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. त्याकरिता आवश्यक जागा निश्चित करावी. याकरिता एमएमआरडीएम्हाडामुंबई महानगरपालिकाजिल्हाधिकारी यांच्याकडील आरक्षित जागेची आवश्कयतेनुसार मागणी करावी. जागेची मागणी करताना योग्य ते प्रयोजन देण्यात यावे.  


सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल



 

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प

सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल

 

 

ठाणे, दि.11 : सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यातत्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार रमेश पाटीलपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाअतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहलअपर पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागीविशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर)श्री.यशस्वी यादवपोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे) बिपिन कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस उपमहानिरीक्षकसायबर श्री संजय शिंत्रेनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेऔद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. वेलरासूउपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसेगृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णीवास्तूरचनाकार सलोनी देवधरसपना कोळीसायबर सुरक्षा प्रकल्पाचे व्यवस्थापक ननवनाथ देवगुडे आदी उपस्थित होते.

सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हा सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट तसेच राज्यासाठी एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसर्व जगात डिजिटायजेशन झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील आव्हानेही तितक्याच प्रमाणात वाढत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे महत्त्व, सायबर विंगचेही महत्त्व आता वाढू लागले आहे. डिजिटल युगातील सायबर अटॅकचा सामना करण्यासाठी आपण सुसज्ज व्हावेही काळाची गरज होती. ही गरज या सेंटरच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.

नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टबद्दल श्री. फडणवीस म्हणालेहे सेंटर देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर झाले आहे. व्हाट्सअपफेसबुकच्या माध्यमातून खोट्या मेसेजच्या आधारे लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.     

उपमुख्यमंत्री म्हणाले कीया सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. महाराष्ट्र हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे. हा केवळ प्रकल्प न राहता कॉर्पोरेशन व्हावेइतर राज्यांनाही या माध्यमातून सायबर सिक्युरिटी बाबतचे मार्गदर्शन केले जावेखासगी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञांशीही आपला समन्वय वाढवावाअशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी या माध्यमातून जनतेला सायबर सिक्युरिटी उत्तम प्रकारे देण्यात आपण यशस्वी होऊअसा विश्वास व्यक्त केला.

14407 हा हेल्पलाईन नंबर आजपासून कार्यान्वित होणार असून 15 ऑक्टोबर पासून या केंद्रातील सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू  होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या सायबर सिक्युरिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहविशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर)श्री.यशस्वी यादव आणि कौस्तुभ धवसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.कौस्तुभ धवसे यांनी केले.

0000


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प

 वृत्त क्र. १९२९

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना

हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प

 

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 ठाणेदि. 11 : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या दोन प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहेअसे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे काढले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनागरी उड्डाण राज्यमंत्रीमुरलीधर मोहोळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

यानंतर सिडको प्रदर्शन केंद्रवाशीनवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभमहाराष्ट्र भवननैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामेठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका)पश्चिम परिघीय (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमिपूजन18 होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स व सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्घाटन  आणि ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटखासदार श्रीरंग बारणेखासदार श्री.नरेश म्हस्केविधानपरिषद सदस्य, आमदार निरंजन डावखरेआमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रेगणेश नाईकप्रशांत ठाकूर, महेश बालदीआमदार मंदा म्हात्रेसिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयलसिडको सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुखसिडको सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेयांसह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विमानांच्या यशस्वी लॅंडिंग व फ्लायपास्टकरिता सिडको व अन्य संबंधितांचे अभिनंदन केले. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

याप्रसंगी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. सिडकोच्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजय सिंघल यांनी सिडकोच्या प्रकल्पांविषयी संक्षिप्त माहिती दिली.

0000


नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

 

ठाणेदि. 11 : नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहेयाबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलावमहिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, 10 बेडचा केमोथेरपी वॉर्डशाळामार्केटआरोग्य केंद्रजलकुंभई-बसेसई-चार्जिंग अशा 410 कोटीहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जातेआता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहेअशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईलअसेही ते म्हणाले.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात विविध नागरी सुविधाप्रकल्प यांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

यावेळी सिडकोचे अध्यक्ष श्री.संजय शिरसाटखासदार श्री.श्रीरंग बारणेखासदार श्री.नरेश म्हस्केआमदार श्री.गणेश नाईकआमदार श्री.निरंजन डावखरेआमदार श्रीम.मंदा म्हात्रेसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक श्री. विजय सिंघल‘नमुंमपा’ आयुक्त डॉ.कैलास शिंदेकेंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या वस्त्र समितीच्या आयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीम. रुप राशी व इतर मान्यवर उपस्थित होते.   

माझी लाडकी बहीण योजनेत नवी मुंबईतील लाख 45 हजारहून अधिक महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून नवी मुंबईत चांगले काम झाल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिप्राय दिला. यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांचे लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेचा लाभ देण्यात आला तसेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत परिसर सखी वस्ती संघामधील 10 महिला वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहनाची चावी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

त्याचप्रमाणे ‘नमुंमपा’ परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50% म्हणजे हाफ तिकीटात प्रवास करता येईलअशी घोषणाही मुख्यमंत्री यप्रसंगी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा करताच कार्यक्रमास उपस्थित महिलांनी टाळयांचा गजर केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारीकर्मचारी यांना मागील वर्षी दिवाळीला 30 हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये हजाराची भरीव वाढ करीत 33 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईलअसेही मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.

आमदार श्री.गणेश नाईक व आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी मनोगतात नागरिकांकरिता महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.   

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरातील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या व त्यांना अधिक सुविधा देणाऱ्या दर्जेदार कामांची पूर्तता महानगरपालिका करीत असून त्यामधील 25 महत्वाच्या सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना महत्वाच्या सेवासुविधांची भेट देण्यात आली असून यामध्ये घणसोली कोपरखैरणे जंक्शन ते साईबाबा मंदिर सर्कल पर्यंत जोडणाऱ्या घणसोली पामबीच रस्त्याचे काँक्रिटीकरणपावसाळी गटार व पदपथ बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ (रू. 52 कोटी 50 लक्ष),

 सेक्टर 19 कोपरखैरणे येथे भूखंड क्र. के-66 व के-67 येथे बहुउद्देशीय इमारत भूमिपूजन समारंभ (54 कोटी 29 लक्ष),

 सेक्टर 12, वाशी येथे एनएमएमटी बस स्थानक, 50 X 25 ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव लोकार्पण समारंभ (191 कोटी 76 लक्ष)

 सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे बहुमजली वाहनतळ इमारत लोकार्पण समारंभ (34 कोटी 63 लक्ष)

नेरूळ विभाग कार्यालय इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 36 लक्ष)

 कुकशेत येथे शाळा इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 26 लक्ष)     

 वाशी सेक्टर 15 व येथे कोपरखैरणे लिंक रोडवरील पादचारी पूल (FOB) लोकार्पण समारंभ (कोटी 44 लक्ष) 

 प्लॉट क्र. 14, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 60 लक्ष)

 प्लॉट क्र. 16, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 37 लक्ष)

           सेक्टर 15, कोपरखैरणे येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 17 लक्ष)

           सेक्टर 22 नेरूळ येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (कोटी 53 लक्ष)

           सेक्टर सीबीडी बेलापूर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (कोटी 48 लक्ष)

           घणसोली वाल्मिकीनगर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (कोटी 21 लक्ष)

           सेक्टर वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (कोटी 85 लक्ष)

           सेक्टर 15/16 वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (14 कोटी 16 लक्ष )

           सेक्टर 16, कोपरखैरणे येथे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण समारंभ (कोटी 28 लक्ष)

           नमुंमपा रूग्णालयांमध्ये आधुनिक शस्त्रक्रियागृह सुविधा (Modular O.T.) लोकार्पण समारंभ

           13 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात कॅन्सर स्क्रिनींग सुविधा शुभारंभ

           कॅन्सर रूग्णांसाठी नेरुळ रुग्णालयात 10 बेड्सची केमोथेरपी सुविधा शुभारंभ

           शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) शुभारंभ

           टेक्सटाईल टू रिसायकल प्रकल्प शुभारंभ

           25 ई बसेस सुविधा शुभारंभ

           ई वाहनांसाठी 18 चार्जींग स्टेशन बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ

           नमुंमपा कामकाजात ई ऑफिस प्रणाली शुभारंभ

           नवी मुंबई महानगरपालिकेचे नुतन ॲप mynmmc शुभारंभ,

 

अशा विविध नागरी सुविधा कामांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या पायाभूत सुविधापाणीपुरवठाआरोग्य सुविधाशाळा इमारतीपर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन विषयक सुविधा व प्रकल्प तसेच प्रशासकीय सेवा या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या दृष्टीनेही सेवांचा आरंभ करण्यात आला.

0000

चित्रपट धोरण समिती' गठीत राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार

 चित्रपट धोरण समितीगठीत

 

राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार

 

            मुंबई, दि. १० : चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने "चित्रपट धोरण समिती" गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार आहे. चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणे आणि तांत्रिक व कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत समितीमार्फत धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

             या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निर्माती श्रीमती स्मिता ठाकरे असून  निर्मातेदिग्दर्शककलाकारआणि तांत्रिक तज्ज्ञांच्या समावेशाने ही समिती सक्षम करण्यात आली आहे.

            गेल्या काही वर्षात चित्रीकरणप्रसारणआस्वादन आणि तंत्रज्ञान प्रक्रियेच्या पध्दतीमध्ये कालानुरुप बदल झाले आहेत. चित्रपट आणि करमणूक माध्यमाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक असल्याने या समितीमार्फत आश्वासक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी समितीची बैठक वेळोवेळी घेण्यात येईल आणि तज्ञांच्या सल्ल्याने चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल.

            या समितीत

१. श्रीमती स्मिता ठाकरे अध्यक्ष (ज्येष्ठ निर्माती)

२. श्री. प्रविण तरडे सदस्य (निर्मातादिग्दर्शक व कलाकार)

३. श्री. मंगेश देसाई सदस्य (निर्माता व कलाकार)

४. श्री. दिगंबर नाईक सदस्य (कलाकार)

५. श्री. नितेश नांदगावकर सदस्य (कला दिग्दर्शक)

६. श्री. प्रभाकर मोरे सदस्य (कलाकार)

७. श्रीमती सविता मालपेकर सदस्य (कलाकार)

८. श्रीमती गार्गी फुले सदस्य (कलाकार)

९. श्रीमती आसावरी जोशी सदस्य (कलाकार)

१०. श्री. श्रीपाद जोशी सदस्य

११. श्रीमती प्रिया बेर्डे सदस्य (कलाकार)

१२. श्रीमती निशिगंधा वाड सदस्य (कलाकार)

१३. श्रीमती मेघा धाडे सदस्य (कलाकार)

१४. श्री. नितिन वैद्य सदस्य (निर्मातादिग्दर्शकचित्रपट आस्वादक)

१५. श्रीमती प्रिया कृष्णस्वामी सदस्य (लेखिकादिग्दर्शका)

१६. श्री. विशाल भारव्दाज सदस्य (लेखकनिर्मातादिग्दर्शक व संगीतकार)

१७. श्री. रमेश तौरानी सदस्य (टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड)

१८. श्री. उज्वल निरगुडकर सदस्य (ऑस्कर अकॅडमी सदस्य)

१९. श्री. अशोक राणे सदस्य (आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक)

२०. संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालय - सदस्य

२१. मुख्य कार्यकारी अधिकारी, (सांस्कृतिक समन्वय आणि विशेष प्रकल्पदादासाहेब फाळके चित्रनगरी) - सदस्य

२२. सह व्यवस्थापकीय संचालकदादासाहेब फाळके चित्रनगरी - सदस्य सचिवयांचा समावेश आहे.

 या समितीची मुख्य उद्दिष्टे

१) कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत छायाचित्रणसंकलनध्वनीप्रॉडक्शन डिझाईनरंगभूषावेशभूषाडबिंगडीआयव्हीएफएक्सअॅनिमेशन आदी विभागातील शॉर्ट टर्म कोर्सफिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यासारख्या संस्थेच्या मदतीने सुरु करण्याबाबत सुचना करणे.

२) चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (Creative Economy) प्रकार आहे. या दृष्टीकोनातून विविध कार्यशाळांचे आयोजनाबाबत सूचना करणे.

३) अनेक शहरात असलेली नाट्यगृहे आठवड्यातून एकाच प्रयोगासाठी वापरली जातात. तिथे सिंगल थिएटरच्या धर्तीवर थिएटर उपलब्ध करुन देणे. सिने-नाट्यगृह उभारण्याबाबत सल्ला देणे.

४) आंतरराष्ट्रीय सह निर्माती (international co-production) हा चित्रपट निर्मिती अधिक सुलभ करण्याचा आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन देण्याविषयी जागृतीपर मार्गदर्शन करणे.

५) विविध चित्रपट महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीला जास्तीत जास्त फायदा कसा होईलयाविषयी मार्गदर्शन करणे.

६) महाराष्ट्र व चित्रनगरीमुंबई हे भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती केंद्र (Destination) बनविण्याबाबत सल्ला देणे.

७) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना राज्यात प्रोत्साहित करण्याबाबत सल्ला देणे / उपाययोजना सुचविणे.

८) राज्यात चित्रपट प्रेरित पर्यटनास (Film Induced Tourism) चालना देण्यासाठी पर्याय सुचविणे.

९) चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत उपाय सुचविणे.

१०) चित्रपट जगतातील नवनवीन तांत्रिक घडमोडी OTT Platform, Web Series and films, Animation, VFX इ. अंतर्गत उपाययोजना सुचविणे.

११) दृकश्राव्य माध्यमाशी निगडीत ऐनवेळीच्या उपस्थित विषयांबाबत उपाययोजना सुचविणे

१२) नागरी / ग्रामीण स्थळांच्या बाह्य चित्रिकरणासाठी सुलभपणे परवानगी प्राप्त होतील याबाबत उपाय योजना सुचविणे.

१३) चित्रिकरणानंतर प्रदर्शनास सहाय्यभूत ठरणाऱ्या अनुषंगीक बाबी यांचा धोरणात समावेश करणेअशा असतील. यानुसार समिती कार्य करेल.

000

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट 'ब' (अराजपत्रित) व गट 'क' सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट '' (अराजपत्रित) व गट ''

सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा

 

मुंबईदि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट '' (अराजपत्रित) व गट 'या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढपरीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीन्यायालयात दाखल प्रकरणेन्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या सर्व बाबीचां विचार करून गट-'' (अराजपत्रित) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट 'सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. गट-'व गट-'सेवांकरीता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहणार आहे. परंतु गट-'व गट-'असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गट '' (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट 'सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

 

००००

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. ११ पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेचउत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापननिर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत ३ ते ५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.

            एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता ५६ लाख निधी मंजूर केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत शेतकरीक्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेचयशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या जातात.            राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थाएनआयपीएचटीतळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे, पुणे व कोल्हापूर व अमरावती विभाग येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

            बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फतराष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), नाशिकच्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, नागपूर येथील वरोरादापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र,  पुणे येथील राहूरी डाळिंब गुणवत्ता केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्रनागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

            फळे व भाजीपाला रोपवाटीकाकृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहितीजुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबाचिकूसंत्रा व मोसंबी)ड्रॅगन फ्रुट व जिरेंनियम व नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञानऔषधीसुगंधी व मसाला पिकांचे उत्पादनप्रक्रिया व विपणनहरितगृह, पॉली हाऊस व्यवस्थापन,  हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्सकाढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला)पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींबहळद व आले)या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  

            शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात साहित्यचहा पानभोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा (कंसात संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक)

            पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थाएनआयपीएचटी संस्था ( विश्वास जाणव०२११- ४२२३९८०/९४२३०८५८९४)कृषी विज्ञान केंद्रबारामती जि.पुणे (श्री. यशवंतराव जगदाळे०२११- २२५५२२७/९६२३३८४२८७)राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटादारणा. ता. निफाडजि. नाशिक(डॉ. पी. के. गुप्ता – ९४२२४९७७६४)आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोराजि. चंद्रपूर (डॉ. अनिल भोगावे – ९५७९३१३१७९)हापूस आंबा गुणवत्ता केंद्रदापोली (डॉ. महेश कुलकर्णी – ८२७५३९२३१५),  डाळिंब गुणवत्ता केंद्रराहुरी (डॉ. सुभाष गायकवाड ९८२२३१६१०९)केशर आंबा गुणवत्ता केंद्रछत्रपती  संभाजीनगर (डॉ. जी. एम. वाघमारे – ७५८८५३७६९६)संत्रा गुणवत्ता केंद्रनागपूर (डॉ. विनोद राऊत – ९९७००७०९४६) यांना संपर्क साधण्याचे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.

०००

Featured post

Lakshvedhi