Saturday, 12 October 2024

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प

 वृत्त क्र. १९२९

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना

हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प

 

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 ठाणेदि. 11 : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या दोन प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहेअसे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे काढले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनागरी उड्डाण राज्यमंत्रीमुरलीधर मोहोळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

यानंतर सिडको प्रदर्शन केंद्रवाशीनवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभमहाराष्ट्र भवननैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामेठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका)पश्चिम परिघीय (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमिपूजन18 होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स व सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्घाटन  आणि ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटखासदार श्रीरंग बारणेखासदार श्री.नरेश म्हस्केविधानपरिषद सदस्य, आमदार निरंजन डावखरेआमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रेगणेश नाईकप्रशांत ठाकूर, महेश बालदीआमदार मंदा म्हात्रेसिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयलसिडको सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुखसिडको सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोलेयांसह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विमानांच्या यशस्वी लॅंडिंग व फ्लायपास्टकरिता सिडको व अन्य संबंधितांचे अभिनंदन केले. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

याप्रसंगी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. सिडकोच्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजय सिंघल यांनी सिडकोच्या प्रकल्पांविषयी संक्षिप्त माहिती दिली.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi