Friday, 11 October 2024

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन

 सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

१४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन

 

            मुंबईदि. ११ : आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.

            यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकरमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितसचिव सदाशिव साळुंखेसचिव संजय दशपुतेमाजी आमदार प्रमोद जठारमुख्य अभियंता राजभोज यांच्यसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयात उपस्थित होते.

            राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २०१८ मध्ये राज्य शासनाकडून ए.डी.बी. अर्थात आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण ९१९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ४५० कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित ४६९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून ७५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची ४४ कामे राज्यात विविध ठिकाणी होणार असून यामध्ये एडीबीकडून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (रु.४१५० कोटी) इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासन सहाय्य (Soft Loan) व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध होणार आहे.

            एडीबीच्या माध्यमातून होणा-या कामांमध्ये जिल्हानिहाय कामे पुढीलप्रमाणेलातूर-२जालना व परभणी-२हिंगोली -२बुलढाणा -३यवतमाळ -१छत्रपती संभाजीनगर -३बीड -२धाराशिव -१नंदुरबार -१जळगाव -३धुळे -२अहमदनगर -४सोलापूर -२सिंधुदुर्ग -२ठाणे -१सातारा -१कोल्हापूर -१पुणे -४पालघर -१नाशिक -१नागपूर -३चंद्रपूर -१वर्धा -२ अशी २४ जिल्ह्यातील एकूण ४४ मतदार संघातील कामे समाविष्ट आहेत. या कामांच्या जाहीर निविदा प्रक्रिया व ठेकेदार निश्चिती करण्यात आली असून लवकरच कामे सुरु होणार आहेत.

            सदर रस्त्यांमुळे तेथील गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे चांगल्या दज्यांच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.

            पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे ३ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत बंधाऱ्यावरील पूल बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याचो पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या भागातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत.भूजल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना सामाजिक सुरक्षा व पर्यावरण सांभाळले जाणार आहे.

0000

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 

मुंबईदि. १० : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

या शोकप्रस्तावात म्हटले आहे कीउद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतोमात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवीद्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हेतर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्तस्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.

श्री. टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केलीती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला.

 मोटारीपासून मिठापर्यंत आणि संगणकापासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षणआरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविडकाळात रतन टाटा यांनी प्रधानमंत्री सहाय्य निधीसाठी तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविडकाळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या 'टाटा मूल्यांशी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वालाप्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं.

महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योग रत्नहा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव लाभ झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.

टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभोही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली

000


राज्य मंत्रिमंडल की ओर से दिग्गज उद्योगपति रतन टाटा को श्रद्धांजलि

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रस्तुत किया शोक प्रस्ताव

रतन टाटा को भारतरत्न देने के लिए

केंद्र सरकार को अनुरोध करनेवाला प्रस्ताव भी पारित

मुंबई, दि. 10 : दिग्गज उद्योगपति पद्म विभूषण रतन टाटा को आज राज्य कैबिनेट की बैठक में श्रद्धांजलि अर्पित की गई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बैठक में इस संबंध में शोक प्रस्ताव प्रस्तुत किया. इस अवसर पर एक प्रस्ताव भी पारित किया गया जिसमें केंद्र सरकार से रतन टाटा को उनकी उपलब्धियों के लिए भारतरत्न से सम्मानित करने का अनुरोध किया गया.

इस शोक प्रस्ताव में कहा गया कि, उद्यमिता भी समाज निर्माण का एक प्रभावी तरीका है. नए उद्योगों की स्थापना से ही देश को आगे बढ़ाया जा सकता हैलेकिन उसके लिए दिल में सच्ची देशभक्ति और उतनी ही सच्ची चिंता अपने समाज के लिए होनी चाहिए. हमने रतन टाटा के रूप में एक समान विचारधारा वाले सामाजिक कार्यकर्तादूरदर्शी और देशभक्त मार्गदर्शक को खो दिया है. भारत के औद्योगिक क्षेत्र में ही नहीं बल्कि सामाजिक विकास के कार्यों में भी रतन टाटा का योगदान अभूतपूर्व था. वह महाराष्ट्र के सपूत थे. भारत का गौरव थे. आत्म-अनुशासनस्वच्छ प्रशासन और बड़े बडे़ उद्यमों को चलाते समय उच्च नैतिक मूल्यों का पालन करते हुए रतन टाटाने कठोर कसौटियों को पार कर अंतरराष्ट्रीय स्तरपर अपनी और भारत की पहचान बनाई. आज उनके रूप में देश का एक बड़ा स्तंभ ढह गया है.

            टाटा समूह के संस्थापक जमशेदजी टाटा के रतन टाटा परपोते थे. उन्होंने कई वर्षों तक चेयरमैन और बाद में अंतरिम चेयरमैन के रूप में टाटा समूह की देखरेख की. देश के सबसे पुराने टाटा समूह के चैरिटेबल ट्रस्ट के प्रमुख के रूप में उन्होंने बहुत ही परोपकारी रवैये के साथ सेवा की.

रतन टाटा ने नैतिक मूल्यों को कायम रखाउनका कार्य अन्य उद्यमियों और भावी पीढ़ियों के लिए एक मार्गदर्शक के रूप में काम करेगा. वह एक सिद्धांतवादी कर्मयोगी थे. आजादी के बाद देश के पुनर्निर्माण में टाटा समूह ने प्रमुख भूमिका निभाई. इस समूह के माध्यम से रतन टाटाने वैश्विक स्तरपर भारत का परचम लहराया.

 टाटा का नाम कारों से लेकर नमक और कंप्यूटर से लेकर कॉफी-चाय तक कई उत्पादों के साथ गर्व से जुड़ा हुआ है. रतन टाटाने शिक्षास्वास्थ्य और समाज सेवा के क्षेत्र में भी अपना अद्वितीय योगदान दिया.  मुंबई पर 26/11 हमले के बाद उनके द्वारा दिखाई गई दृढ़ता के लिए याद किया जाएगा. रतन टाटाने कोविड काल में प्रधानमंत्री राहत कोष के लिए तुरंत 1500 करोड़ रुपये दिए. साथ ही अपने अधिकांश होटलों को कोविड काल के दौरान मरीजों के लिए उपलब्ध कराया. उनकी महानता सदैव याद रखी जायेगी.

उनमें नवप्रवर्तन और परोपकारिता का अद्वितीय समन्वय था. उन्होंने अपने 'टाटा मूल्योंसे कभी समझौता नहीं किया. वह युवाओं के बीच उपलब्धि और प्रयोगशीलता को प्रोत्साहित करने में हमेशा आगे रहते थे. उन्होंने गढ़चिरौली जैसे दूरदराज के इलाकों में युवाओं की कुशलता को बढावा और रोजगार के अवसर प्रदान करने के लिए एक इनोव्हेशन केंद्र शुरू किया.

महाराष्ट्र सरकार का पहला 'उद्योग रत्नपुरस्कार उन्हें प्रदान करने का भाग्य हमें मिला. उनके मार्गदर्शन का महाराष्ट्र राज्य को हमेशाही लाभ मिला. रतन टाटा के निधन से हमारा देश और साथ ही महाराष्ट्र का कभी भी न भर सकनेवाला नुकसान हुआ है.

टाटा ग्रुप के विशाल परिवार पर आए इस दुःख में राज्य मंत्रिमंडल सहभागी है. प्रार्थना है किउनकी आत्म्या को सद्गती मिलें. देश के इस महान सपूत को महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से राज्य मंत्रिमंडल के माध्यम से भावभीनी श्रद्धांजलि.

0000

 


 

Maharashtra Cabinet pays tribute to Veteran Industrialist Ratan Tata

Chief Minister Eknath Shinde proposes the condolence motion

Proposal for requesting the Centre to confer Bharat Ratna to Ratan Tata

Mumbai, October 10: The State Cabinet on Thursday paid condolences to the Veteran Industrialist Ratan Tata at its cabinet meeting held here. Chief Minister  Eknath Shinde proposed the proposal for condolence. The Maharashtra Cabinet passed the resolution urging the Central Government to confer the highest civilian award Bharat Ratna to Ratan Tata, keeping his contribution in view.

It is stated in the condolence motion that entrepreneurship is also an effective way of formation of a society and the Nation can be taken on the path of progress with the installation of new industries but for that honesty towards the society and extreme patriotism are essential. The Nation has lost a visionary and patriotic leader of such thoughts in the form of Ratan Tata. The contribution made by Shri Tata had been phenomenal not only in the industrial sector of India but also in social development He was the son of Maharashtra. Shri Tata was the pride of India. This visionary industrial Tycoon has created India's and his own impression at the International level due to his self- discipline, clean administration and his high level ethical values during his entire life while looking after the huge extended enterprises. The nation has lost a ‘Major Pillar; in the form of Ratan Tata.

 Ratan Tata was the great grandson of Jamshedji Tata, the founder of the group. He looked after the Tata Group for a number of years in the capacity of Chairman and later on, as interim Chairman. He had performed his duty with a philanthropic approach while working with the Charitable Trust of Tata Group -one of the oldest Trusts in the Nation.

The ethical values of Ratan Tata had set an example and will be serving as a beacon for upcoming and budding entrepreneurs and next generation in the industrial sector. He was a man of principles. The Tata Group was instrumental in the reconstruction of the Nation in the post- independence era. Ratan Tata kept the Indian flag flying high at the global level through the medium of the Tata Group.

The brand of Tata is associated with pride along with numerous productions, right from cars to salt and computers to tea and coffee. The contribution made by Ratan Tata in the field of education, health and social sector is unique, remarkable and admirable.

After the 26/11 attacks on Mumbai, the role played by Ratan Tata as a staunch personality will be ever remembered. During the Covid-19 period, this philanthropist Industrialist has immediately contributed 1500 crore rupees to the Prime Minister Assistance fund. He also made available a maximum of his hotels for the patients in the Covid period. This contribution can never be forgotten.

Ratan Tata had a rare and unique combination of innovation and benevolence. He never compromised with the values of ‘Tata Values'. It was Shri Ratan Tata who started the innovation center in the remote areas of district like Gadchiroli for giving a fillip to the skill development of the youth and providing them employment opportunities.

The Maharashtra government was lucky enough to honor him with the first Udyog Ratna award. Maharashtra was always benefited due to his guidance. The passing away of Ratan Tata is a huge and irreparable loss to the Nation and Maharashtra. The cabinet is standing with the huge extended family of Tata Group in this time of grief. We pray that his soul rests in peace.

The State cabinet pays this son of the Nation a heartfelt tribute on behalf of all the citizens of Maharashtra.

0000

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

 मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर

पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. १० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्प‍िटलआठवा मजलाचर्नी रोड येथे ४ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतर झाले आहे.

            या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबईमित्तल फाऊंडेशन ट्रस्टआयुर्वेदिक हॉस्प‍िटल इमारतआठवा मजलानेताजी सुभाष मार्गचर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळकैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागेमरीन ड्राईव्हमुंबई- ४०० ००२’ या पत्त्यावर करण्यात यावा. तसेच या बदलाची सर्व अधिनस्थ कार्यालयेशिक्षणाधिकारी (प्राथ, माध्य.) जिल्हा परिषद, मनपाप्राचार्यकनिष्ठ महाविद्यालयेमुख्याध्यापकपालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.

0000

धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या

 धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या

 186 पदांच्या पदनिर्मितीस मान्यता

 

मुंबईदि. 10 : धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे  प्रतिनिधी उपलब्ध असल्यासत्यांना वेळेत उपचार मिळणे,  योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण 186 धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही पदे धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत.

            धर्मादाय रुग्णालये योजनेची अंमलबजावणी करीत असतांना सद्यस्थितीत संबंधित धर्मादाय रुग्णालयांमार्फतच वैद्यकीय समाजसेवकाची नेमणूक करण्यात येत होती. हा समाजसेवक रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामार्फत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची उचित माहिती न मिळणेअनावश्यक कागदपत्रे मागणेयोजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मदत कक्षाची स्थापनाऑनलाईन प्रणालीउपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पालाईनसह आरोग्य सेवकांची पदभरतीची सुधारणा केली आहे. 

आरोग्य सेवकांच्या पदभरतीमुळे धर्मादाय रुग्णालये अधिकाधिक लोकाभिमुख होतील. रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची योग्य माहितीत्यांच्यावर केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे उपचार करण्यात येतील. खऱ्या गोर-गरीब गरजू रुग्णांना योजनेनुसार उपचार मिळणे सुलभ होईल.   धर्मादाय रुग्णालयाकडून रिक्त खाटांची वेळोवेळी अद्यावत माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येत आहे किंवा कसे याबाबत धर्मादाय आरोग्य सेवक यावर लक्ष ठेवतील. योजनेची अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

            राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनच  कक्षाच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 पर्यंत 418 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन घेण्यात आला. यासाठी 13 कोटी 25 लाख रुपये रकमेचे उपचार रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12,000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेनएन.एन रिलायन्सबाई जेरबाई वाडीयाडॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटलब्रीट कॅण्डी हॉस्पीटलदि बॉम्बे हॉस्पीटलदिनानाथ मंगेशकर रुग्णालयडी.वाय.पाटील हॉस्पीटलके.ई.एम. हॉस्पीटलसह्याद्री हॉस्पीटलसंचेती हॉस्पीटलजहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयांचाही समावेश आहे

नागरिकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची संपूर्ण माहिती 24×7 उपलब्ध होणार आहे.

तसेच https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट दिल्यावर धर्मादाय रुग्णालयेत्यांच्याकडील राखीव बेडची संख्या आदी  माहिती मिळणार आहेअसे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

००००

अनुसूचित जाती-जमाती राज्य आयोग सामाजिक न्यायासाठी कार्यरत

 अनुसूचित जाती-जमाती राज्य आयोग सामाजिक न्यायासाठी कार्यरत

- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

 

            मुंबईदि. १० :- अनुसूचित जाती - जमातीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी जलदगतीने सोडविण्यासाठी आयोग कार्यरत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आयोग न्यायप्रक्रिया राबवित असल्याचे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने राज्य आयोग समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत आहेत. अनुसूचित जातीअनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या आहेत. आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत असून प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी त्यांचे सहकार्य महत्वाचे आल्याचेही त्यांनी सांगितले.

            उपाध्यक्ष मेश्राम म्हणाले कीसामाजिक न्यायाच्या दृष्टीने आज प्राप्त तक्रारीबाबत सुनावणी घेण्यात आली आहे.  राज्य शासनाने आयोगासाठी केलेल्या निधीच्या तरतुदीचा समाजाला न्याय देण्यासाठी योग्य वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुसूचित जाती जमाती संदर्भातील तक्रारी तसेच या प्रवर्गातील शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी  https://sjsa.maharashtra.gov.in/en/maharashtra-state-commission-sc-st या संकेत स्थळावर आपल्या तक्रारींची नोंद करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            अनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्विकारणे व तपास करणे. अनुसूचित जाती/जमातीचे कल्याणआरक्षणसंरक्षणविकास संबंधी इतर बाबी राज्य शासनाकडून ठरविण्यात येतील त्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत आयोग कार्यरत आहेत.  

            राज्य आयोगाचे अध्यक्ष आनंदराज अडसूळ यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाकडे प्राप्त १५ तक्रारीवर आज वरळी येथील आरे दुग्ध शाळा इमारतीतील राज्य आयोगाच्या कार्यालयात सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष श्री. मेश्राम बोलत होते. यावेळी पोलीस निरिक्षक सोनम पाटील, रमेश वळवी, संसदीय अधिकारी रत्नप्रभा वराडकर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी

 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी

७०९ कोटींचा अतिरिक्त निधी

            हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

            या केंद्रासाठी मंजूर अतिरीक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे. हळदीवरील संशोधनासाठी तसेच निर्यातक्षम उत्पान बनवण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा

 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा

            महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या प्रारूपास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठीचा हा अध्यादेश विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात मान्यतेसाठी सादर करण्यासाठी यावेळी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या आयोगासाठी  मंजूर असलेली अधिकारीकर्मचारी यांची २७ पदे आयोगाच्या आस्थापनेवर हस्तांतरीत करण्यास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi