मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर
पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. १० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, आठवा मजला, चर्नी रोड येथे ४ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतर झाले आहे.
या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाऊंडेशन ट्रस्ट, आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०० ००२’ या पत्त्यावर करण्यात यावा. तसेच या बदलाची सर्व अधिनस्थ कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथ, माध्य.) जिल्हा परिषद, मनपा, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment