Thursday, 10 October 2024

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

 मानवतेचादातृत्त्वाचाविश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली

 

        मुंबईदि. १० : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहेत्यांच्या निधनाने मानवतेचादातृत्त्वाचाविश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहेअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

            रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पणत्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचारमाणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षणग्रामोन्नती आणि कुपोषणआरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजेया श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोतकिंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय असो हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मी.मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केलीत्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य शासना सोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन केलेतेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची स्थापना केलीतेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणेही महाराष्ट्राचीदेशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोअसे देवेंद्र फडणवीस यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव

 

मुंबईदि. १० : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

या शोकप्रस्तावात म्हटले आहे कीउद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतोमात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवीद्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हेतर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्तस्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.

श्री. टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केलीती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला.

 मोटारीपासून मिठापर्यंत आणि संगणकापासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षणआरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविडकाळात रतन टाटा यांनी प्रधानमंत्री सहाय्य निधीसाठी तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविडकाळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या 'टाटा मूल्यांशी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वालाप्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं.

महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योग रत्नहा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव लाभ झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.

टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभोही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली

000

स्वयंचलित जिन्याचे आमदार भातखळकर यांनी केले लोकार्पण कांदिवली पूर्वमध्ये वेगवान पायाभूत सुविधा

स्वयंचलित जिन्याचे आमदार भातखळकर यांनी केले लोकार्पण कांदिवली पूर्वमध्ये वेगवान पायाभूत सुविधा विकास मुंबई, दि. 10 ऑक्टोबर (प्रतिनिधी) पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या आकुर्ली रोड गोशाळा येथील स्वयंचलित जिन्याचे (एस्कलेटर) आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी लोकार्पण केले. कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली रोड परिसरात एस्कलेटरची गरज होती. त्यानुसार आमदार भातखळकर यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नातून अखेर एस्कलेटरची उभारणी झाली असून त्याचे लोकार्पण गुरुवारी सकाळी करण्यात आले. यावेळी आमदार भातखळकर म्हणाले, कांदिवली पूर्व भागातील हा परिसर अतिशय रहदारीचा भाग असल्याने येथे प्रामुख्याने पादचारी, शाळकरी मुले, वृध्द आणि दिव्यांगाना त्याचा त्रास होत होता. त्यासाठी येथे एस्कलेटरची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सबवेचे देखील रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे. तसेच बाणडोंगरी डीपी रोडच्या कामास सुरुवात झाली असून १५ दिवसात वापरण्यायोग्य रस्ता तयार होईल. त्याचप्रमाणे लोखंडवाला डीपी रोडचेही काम लवकरच सुरू होणार आहे. आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधांविषयी नागरिकांची तक्रार राहूच नये, यावर आपला भर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'इझ ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेनुसार आपण काम करत असल्याचेही आमदार भातखळकर यांनी यावेळी नमूद केले आहे. उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यामुळे परिसरात वेगवान पायाभूत सुविधा विकास होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

माविम’कडून नवं तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 

     माविमकडून नवं तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

       मुंबईदि. ९ : महिला व बालविकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे 'नवं तेजस्विनीमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

            हा महोत्सव दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत वनिता समाज सभागृहवीर सावरकर मार्गदादर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात बचत गट उत्पादीत वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात  येत आहे.

जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ

 जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या

सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ

 

            कोल्हापूरदि. 9 (जिमाका) : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय  मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता. राधानगरी येथील धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणालेकोल्हापूर जिल्ह्यातील धामणी धरण प्रकल्पाच्या घळ भरणीच्या कामामुळे चार टिएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. धामणीच्या चार टिएमसी पाण्यामुळे हजारो शेतकऱ्यांची तहान भागेल व शेतीलाही पाणी उपलब्ध होईल. यावेळी आमदार प्रकाश आबिटकरमाजी खासदार संजय मंडलिकजिल्हाधिकारी अमोल येडगेकृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस.यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणालेशासनाने गेल्या अडीच वर्षात राज्यामध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. यामध्ये मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनालखपती दीदी योजनायुवा कार्य प्रशिक्षण योजनासाडेसात एचपी पर्यंत कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजनामुख्यमंत्री वयोश्री योजनामुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून पहिली रेल्वेगाडी तीर्थदर्शनासाठी सोडण्यात आली. शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी योजनाही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

धामणी धरण प्रकल्पाची माहिती

            धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम धामणी नदीवर मौजे राईता.राधानगरीयेथे प्रगतीपथावर आहे. मुख्य धरण मातीचे आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील 7 गांवेगगनबावडा तालुक्यातील 7 गांवे  व पन्हाळा तालुक्यातील 11 गावे असे एकूण 25 गावांचे 1400 हे. ( 2100  हे.पिकक्षेत्र) क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धामणी नदीवर साखळी पध्दतीने एकूण 10 को.प. बंधारे बांधण्याचे नियोजन असून यापैकी 7 बंधारे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 3 को.प.बंधारे बांधकाम प्रगतीपथावर आहे. धरणाचे मातीकाम 50 %  पूर्णव वळण कालव्याचे खोदकाम 95 % काम पूर्ण, ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्ण व धरण पोहोच रस्त्याचे 65% काम पूर्ण झालेले आहे. या धरणाचा सांडवा द्वाररहित असून सांडवा बारची लांबी 160 मी. इतकी आहे.  सांडवा खोदाईचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून पुच्छ कालव्याचे सुमारे 50 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्णवायपीस व ट्रॅशरॅकच्या अंतस्थ: सुट्या भागांचे उभारणी काम पूर्ण व पातनळ उभारणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

            धरणाच्या द्वितीय टप्प्यातील घळभरणी सन 2025-26 मध्ये जून 2026 अखेर पूर्ण करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने 109.034 दलघमी. पाणीसाठा व 2100 हे. सिंचन निर्मिती करण्याचे नियोजन आहे. या धरणासाठी आज अखेर एकूण रु.595.15 कोटी इतका खर्च झाला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार मुख

 समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

            राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे.

            राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे.  हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे  श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

            प्रास्ताविक भाषणात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की,  आजचा दिवस हा महिला व बालविकास  विभाग म्हणून अभिमानाचा दिवस आहे. नवरात्रीत देवींची पूजा केली जाते. येथे उपस्थित सर्व महिला देवींच्या लेकी आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या लाडक्या भावांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी संसारासाठी जगत असतेपरंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील स्त्री ही स्वतःसाठी जगणार आहे. ही योजना भविष्यात निरंतर चालावी यासाठी  शासनाने आर्थिक नियोजनासह तरतूद केली आहे.

लाडक्या बहिणींना विविध लाभांचे वाटप

            मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण 17 हजार 200 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेतत्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात 10 महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री   यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षालेक लाडकी योजनामोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोघांना  राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0000

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड येथे मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा उत्साहात

 

            रायगड जिमाका दि. : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.

            मुख्यमंत्री - लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यातील  मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंतमहिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेमहाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेपेट्रोलियम व नैसर्गिक वायू समितीचे अध्यक्ष सुनिल तटकरेमाजी आमदार अनिकेत तटकरेमहिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादवकोकणचे विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुखमहिला व बाल विकास विभाग आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरेएकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त डॉ.कैलास पगारे, जिल्हाधिकारी किशन जावळेमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाडजिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेपनवेल आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका मंगेश चितळे आदी उपस्थित होते.

            महिलांच्या जीवनात सुखाचेआनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहेहा आहेर थांबणार नाही असे भावनिक आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही योजना सुपरहिट असून दिवाळीपूर्वीच महिलांना भाऊबीज देण्यात आली आहे. सर्व महिला भगिनीच्या खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे जमा झाले आहेत. राज्यातील महिलांच्या खात्यात 17 हजार 200 कोटी रुपये जमा केले आहेत.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेमाझी भगिनी कष्ट करतेकुटुंबासाठी राबते याची आम्हाला जाणीव आहेअशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखहुन अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले महिला व बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार  यांच्या नियंत्रणाखाली अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम केले आहे.

            राज्य शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचतगटकौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवकशेतकरीकष्टकरीविद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामुलींना मोफत उच्च शिक्षण योजनामुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनामुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनामुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


Featured post

Lakshvedhi