Thursday, 10 October 2024

स्वयंचलित जिन्याचे आमदार भातखळकर यांनी केले लोकार्पण कांदिवली पूर्वमध्ये वेगवान पायाभूत सुविधा

स्वयंचलित जिन्याचे आमदार भातखळकर यांनी केले लोकार्पण कांदिवली पूर्वमध्ये वेगवान पायाभूत सुविधा विकास मुंबई, दि. 10 ऑक्टोबर (प्रतिनिधी) पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या आकुर्ली रोड गोशाळा येथील स्वयंचलित जिन्याचे (एस्कलेटर) आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी लोकार्पण केले. कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली रोड परिसरात एस्कलेटरची गरज होती. त्यानुसार आमदार भातखळकर यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नातून अखेर एस्कलेटरची उभारणी झाली असून त्याचे लोकार्पण गुरुवारी सकाळी करण्यात आले. यावेळी आमदार भातखळकर म्हणाले, कांदिवली पूर्व भागातील हा परिसर अतिशय रहदारीचा भाग असल्याने येथे प्रामुख्याने पादचारी, शाळकरी मुले, वृध्द आणि दिव्यांगाना त्याचा त्रास होत होता. त्यासाठी येथे एस्कलेटरची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सबवेचे देखील रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे. तसेच बाणडोंगरी डीपी रोडच्या कामास सुरुवात झाली असून १५ दिवसात वापरण्यायोग्य रस्ता तयार होईल. त्याचप्रमाणे लोखंडवाला डीपी रोडचेही काम लवकरच सुरू होणार आहे. आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधांविषयी नागरिकांची तक्रार राहूच नये, यावर आपला भर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'इझ ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेनुसार आपण काम करत असल्याचेही आमदार भातखळकर यांनी यावेळी नमूद केले आहे. उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. आमदार भातखळकर यांना नागरी समस्यांची नेमकी जाण असून त्यामुळे परिसरात वेगवान पायाभूत सुविधा विकास होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi