Wednesday, 25 September 2024

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मय’च्या 18 खंडांचे प्रकाशन तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचा ठेवा अभ्यासकांना उपलब्ध

 तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मयच्या 18 खंडांचे प्रकाशन

तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचा ठेवा अभ्यासकांना उपलब्ध

मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर

 

मुंबईदि. 24 : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या व त्यांच्या साहित्याची समग्र समीक्षा असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मयच्या 18 खंडांचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मराठी भाषेच्या अभ्यासकसाहित्यिक व विद्यार्थ्यांसाठी हा अनमोल खजिना अभ्यासासाठी उपलब्ध झाला असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

मराठी विश्वकोश मंडळाचे पहिले अध्यक्षप्राच्यविद्यापंडित लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावरील ज्येष्ठ साहित्य‍िक व संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तयार केलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्मयच्या 18 खंडांच्या प्रकाशन प्रसंगी खंडाचे निर्माते व संपादक डॉ. सुनीलकुमार लवटेमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटीलमराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरेमंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्राचे आणि साहित्याचे वैभव होते. त्यांच्याच पुढाकारामुळे राज्याच्या विश्वकोश मंडळाची निर्मिती झाली. त्यांच्या साहित्याचात्या साहित्यावरील समीक्षेचा समावेश असलेला हा ठेवा ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 18 खंडांच्या माध्यमातून संकलित केला आहे. तर्कतीर्थ हे समीक्षकलेखकप्राच्यविद्यापंडित होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे संस्कृतमध्ये भाषांतर करून मोठे कार्य केले. त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यसमीक्षाबद्दल एकत्र संकलन करणे अवघड होतेपरंतु डॉ. लवटे यांनी मोठ्या परिश्रमाने हे काम केले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तयार केलेल्या विश्वकोशाची माहिती पाहण्यासाठी इंटरनेटवर सुमारे तीन कोटी लोकांनी भेट दिली आहे. सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण मराठी भाषेतून सुरू झाले असून वैद्यकीय शिक्षणही लवकरच मराठी भाषेत सुरू होणार आहे. त्यामुळे नवनवीन परिभाषा व शब्दांसाठी विश्वकोश महत्त्वाचा ठरणार आहे. विश्वकोशाचे कार्य अधिक जोमाने व्हावे यासाठी २० वर्षानंतर नवीन भरती केली आहे. त्यामध्ये साहित्याचे अभ्यासकअभ्यासू तरुणांना नेमणुका दिल्या आहेत. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयाची इमारत स्वतःच्या जागेत उभारण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याचे बांधकाम सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून दोन वर्षापूर्वी कार्यभार स्विकारल्यानंतर मराठीचे वैभव वाढविण्यासाठी सर्वच मंत्रिमंडळ सदस्यांसोबत कार्यरत आहे. मराठी भाषा धोरण जाहीर केले. मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे भव्य असे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थाभाषा संचालनालय आदींच्या कार्यालयाबरोबरच कॉन्फरन्स हॉलम्युझियमऑडिटोरियम उपलब्ध असेलअसे त्यांनी सांगितले.

मराठी भाषा विभागामार्फत बाळशास्त्री जांभेकर व साने गुरुजी यांचे गाव पुस्तकाचे गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कवी मंगेश पाडगावकर यांचे उभादांडा हे जन्मगाव कवितेचे गाव म्हणून एक उत्कृष्ट स्मारक म्हणून विकसित करणार आहोत. तसेच राज्यात लवकरच सहा ठिकाणी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबविणार आहोत. याशिवाय मराठीतील कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर करण्याचा विचार आहे. राज्यात इयत्ता 11 वी व 12 वीमधील शिक्षणात मराठी भाषा सक्तीचा करण्यात येणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयात मराठीत संवाद करण्यासाठी सक्तीचे केले आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात ( प्यारालेसीस / लखवा ) रुग्ण २४ तासाच्या आत घेऊन

 🙏परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात ( प्यारालेसीस / लखवा ) रुग्ण २४ तासाच्या आत घेऊन जाणे  या आजारावर अँटोमॅटिक मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पुर्विसारखा बरा होतो, रुग्णाच्या मेंदूतिल गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, भारतात प्रथम या हॉस्पिटलमध्ये  ही सुविधा उपलब्ध झाली आहे.जगभरात काही ठराविक ठिकाणीच अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे ( न्युरोसर्जन ) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.*

 

*माहीती सर्वाना कळवा फायदा होईल ...

तुम्ही जिथे सदस्य आहात त्या प्रत्येक ग्रुपवर पोस्ट करा.


जर तुम्हाला, जन्मापासून मूकबधीर असलेले कोणतेही मूल माहित असेल तर आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलाला बरे करणे शक्य झाले आहे.


शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 ते 12 लाख खर्च येतो, परंतु काळजी करू नका, आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी, जिल्हा 3141 च्या मदतीने, ही शस्त्रक्रिया SRCC हॉस्पिटल, मुंबई येथे विनामूल्य केली जाते.


कृपया इतर ग्रुपवर पोस्ट करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत संदेश पोहोचेल.


संपर्क :-

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी

DG Rtn राजेंद्र अग्रवाल

9820085149



महत्वाचा संदेश (मेसेज) आहे. शक्य तितका फॉरवर्ड करा. 

🙏🏻🙏🏻🙏🏻

Tuesday, 24 September 2024

आय. टी. आय. मधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार

 आय. टी. आय. मधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना

कंत्राटी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. 23 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासाठी मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईलअसे कौशल्यरोजगार,  उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आयोजित बैठकीत ते बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका निदेशकांना कंत्राटी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली होती.

            कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा यांच्या दालनात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी वन मंत्री श्री. मुनगंटीवारकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलव्यवसाय व शिक्षण मंडळाचे संचालक सतीश सूर्यवंशीवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघाचे अध्यक्ष अनिलकुमार होटकरयांच्यासह रूपेश तायडेप्रशांत भोंडवेरोहन सराफ आदि पदाधिकारी उपस्थित होते.

          मंत्री श्री. लोढा म्हणाले कीतासिका तत्त्वावरील अनुभवी निदेशकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. यासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी या विषयाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंत्रीमंडळासमोर हा विषय सादर करण्यात येईल. कौशल्य विकास विभाग हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

            वन मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले कीशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गेल्या अनेक वर्षापासून अल्प मानधनात लोकांनी काम केले आहे. मात्र विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांचावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. अशा अनुभवी तासिका निदेशकांना विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे. तसेच याबाबतीत विशेष धोरण अंवलंबून योग्य तो निर्णय घ्यावाअशी मागणी महाराष्ट्र राज्य आय.टी.आय.निदेशक संघाने केली होती. याबाबतीत कौशल्य विकास विभागाने सकारात्मक पावले उचलून मंत्रीमंडळाची याबाबीसाठी मान्यता घ्यावीअशा सूचना वन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केला.

0000

कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये समावेश १ डिसेंबर, २०२४ रोजी परिक्षेच्या आयोजनाचा आयोगाच्या बैठकीत निर्णय

 कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित

संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये समावेश

१ डिसेंबर२०२४ रोजी परिक्षेच्या आयोजनाचा आयोगाच्या बैठकीत निर्णय

 

मुंबईदि. २३ : महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा  महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक 01  डिसेंबर2024 रोजी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इमारतीमध्ये आज आयोजित आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्षसदस्य आणि सचिव उपस्थित होते.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करिता दिनांक 29 डिसेंबर2023 रोजी विविध संवर्गांच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम2024अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धिपत्रक दिनांक 8 मे2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषीपशुसवंर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे  दिनांक 16 ऑगस्ट2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर

कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या अर्ज स्वीकृतीचा कालावधीनव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रकआगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता, मनुष्यबळनिवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन परिक्षेचे आयोजन  दिनांक 01  डिसेंबर2024 रोजी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने कळविले आहे.

0000

मुळशी धरण भागातील ‘टाटा पॉवर’च्या पडीक जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घ्याव्यात

 मुळशी धरण भागातील टाटा पॉवरच्या पडीक जमिनी

सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घ्याव्यात

- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 23 :- मुळशी धरण भागातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पिण्यासह सिंचनासाठी पाणीदळणवळणाच्या सुविधाविद्युत दाहिनी यासारख्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने वारंवार निर्देश देऊनही टाटा पॉवरकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळशी धरण भागातील टाटा पॉवर कंपनीच्या वापरात नसलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करुन वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनी सार्वजनिक कामासाठी शासनाच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे विभागीय आयुक्तांना दिले.

मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लाग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजलसंपदा (लाभक्षेत्र विकास) विभागाचे सचिव संजय बेलसरेटाटा पॉवरच्या हायड्रो विभागाचे मुख्य अधिकारी प्रभाकर काळेपुणे नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारेनंदकुमार वाळंज आदी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुळशी जलाशयातील प्रवासी नौका जुनी व नादुरुस्त झाल्याने नवीन प्रवासी नौका खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथील पर्यटनास चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी याठिकाणी जेट्टी उभारण्याची स्थानिकांची मागणी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त करून घेऊन तात्काळ कार्यवाही करावी. तोपर्यंत मुळशी धरण क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळणासाठी जिल्हा परिषदेने पर्यायी नौका उपलब्ध करून द्यावी. यासाठी टाटा पॉवरने तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र’ द्यावे.

मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक एक व दोनच्या कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुळशी भागातील पाणीपुरवठ्याच्या कामांना गती द्यावी. टप्पा क्रमांक १ अंतर्गत २८ गावांचा तर टप्पा क्र. २ अंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या गावांसाठी मागील बैठकीत ०.२० टीएमसी एवढे अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले होते. या सर्व गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी उर्वरित कामे गतीने करण्यात यावीत. या सार्वजनिक हिताच्या कामात टाटा पॉवर कंपनीकडून सहकार्य मिळत नसल्यास पाणीपुरवठा विभागाने पोलीस विभागाची मदत घ्यावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुळशी धरण भागातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी वाढीव पाणी उपलब्ध होण्यासाठी यापूर्वीच्या बैठकीत धरणाची उंची १ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी टाटाची ८० टक्के आणि खाजगी स्वरुपाची २० टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण महसूल विभागाने तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.

यावेळी मुळशी धरण भागातील गावठाण विस्तारासाठी अत्यावश्यक असणारी जमीन मोजणी करुन हद्द कायम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुळशी धरण भागातील विविध गावांना पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी तसेच इतर शासकीय कामांसाठी टाटाने सहकार्य करण्याबाबत व मुळशी धरण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविणेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती

 सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती

 

मुंबईदि. 23 :- सारथीसंस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने बार्टीच्या धर्तीवर सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासननिर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बार्टीप्रमाणे सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनांही आता नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार असल्याने संबंधीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत.

----०००००---

 

महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे

 महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे

महाराष्ट्र विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

नवी दिल्ली, दि. २३ : शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत (SDG) आढावा घेणाऱ्या प्रस्तावावर प्रत्येक वर्षी संसद आणि राज्य विधानमंडळांच्या अधिवेशनात चर्चा व्हावी. त्याचप्रमाणे महिला सबलीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये हा महत्वाचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात यावे असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळभारत विभागाच्या (CPA India Region) १० व्या परिषदेत व्यक्त केले. दिनांक २३ व २४ सप्टेंबर२०२४ रोजी नवी दिल्ली येथे लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळभारत विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद "शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासंदर्भात विधानमंडळांची भूमिका" या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या चर्चेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या परिषदेस महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित आहेत. आज लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यसभेचे उप सभापती श्री. हरिवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन दिवसीय परिषदेस प्रारंभ झाला.

संसदेत आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी केलेल्या कायद्याचे स्वागत करुन डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता होणे आणि त्यासाठीचे प्रभावी कायदे बनविणेत्याची सुयोग्य अंमलबजावणी करणे यासाठी सभागृहात सखोल विचारमंथन होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्च२०२० मध्ये अशाप्रकारे पिठासीन अधिकारी यांनी विशेष ठराव मांडून चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. दरवर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत अशाप्रकारे चर्चा व्हावी आणि याबाबतच्या प्रस्तावाची रुपरेषा कामकाज सल्लागार समिती तथा शासनाने पिठासीन अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून तयार करावी. महिला सबलीकरणासंदर्भातील राष्ट्रीय गोलमेज परिषदेत आरोग्यशिक्षणमहिला आणि मुलींची सुरक्षितता या मुद्यांवर भर देण्यात यावा. शाश्वत विकास उद्दिष्टांची महिला विकासाच्या प्रश्नांशी योग्य सांगड घातली जावीत्याअनुरूप ध्येयधोरणे आणि कायदे निर्माण करण्यात यावेततंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यात यावापर्यावरण संरक्षणासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर आणि त्याचप्रमाणात त्याची सुयोग्य पुनर्निमिती करण्यात यावीशाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पामध्ये ३ टक्के निधी राखून ठेवण्यात यावासभागृहामधील चर्चा निर्णयाभिमुख व्हावी यासाठी पीठासीन अधिकारी यांनी विशेष दक्षता घ्यावीवि. स. पागे यासारखे चिंतनशील पिठासीन अधिकारी लाभल्याने साकारली गेलेली रोजगार हमी सारखी योजना या मुद्यांकडे उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी परिषदेचे लक्ष वेधले. उद्या दि. २४ सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय परिषदेचा समारोप होईल.

Featured post

Lakshvedhi