Tuesday, 24 September 2024

सारथी’ व ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती

 सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती

 

मुंबईदि. 23 :- सारथीसंस्थेच्या दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत कायम नोंदणी असलेल्या 724 विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ अदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला.  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने बार्टीच्या धर्तीवर सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून इतिवृत्त मान्यतेची वाट न पाहता यासंबंधीचा शासननिर्णय तात्काळ निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बार्टीप्रमाणे सारथी’ व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनांही आता नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार असल्याने संबंधीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे त्याबद्दल आभार मानले आहेत.

----०००००---

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi