Sunday, 15 September 2024

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी सकारात्मक प्रयत्न

 धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी सकारात्मक प्रयत्न

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा

 

मुंबईदि. 15 :- धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातीलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली.

बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहलआदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारेसामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थित होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेप्रधान सचिव विनिता वेद-सिंघल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीधनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ताविधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच  समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या समावेशाबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ सुधाकर शिंदे समितीलाही लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. डॉ. शिंदे यांनी समितीच्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी शिष्टमंडळातील आमदार गोपीचंद पडळकरमाजी खासदार विकास महात्मेमाजी आमदार सर्वश्री प्रकाश शेंडगेरामहरी रुपनवररामराव वडकुते तसेच समन्वय समितीचे पांडुरंग मेरेगळविजय गोफनेपंकज देवकतेमधु शिंदे यांनी विविध मुद्दे मांडले. माजी मंत्री महादेव जानकर तसेच समन्वय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. 

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

  

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

-         उपराष्ट्रपती जगदीप धनखड

·         ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण

 

मुंबई, दि. 15 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण  सोहळा झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखडकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदश्य संवादप्रणाली व्दारे उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलविकास आयुक्त प्रदिपकुमार डांगेकौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकरव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

            यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांनी संविधान संग्रहालयाचीही पाहणी केली.

उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड म्हणाले कीभारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. वंचितांच्या विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम केले. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यादृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल. जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असताना आपल्याला अभिमान आहे की भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून जो विविधतेतही एकता जपून आहे. याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. भारतीय हीच आपली पहिली ओळख असून राज्यघटनेप्रती आपण सदैव आदर बाळगणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्व नव्या पिढीला समजावे यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत असेही श्री. धनखड यांनी सांगितले.

राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री. धनखड यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले कीआपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1904 ते 1907 या काळात जेथे शिक्षण झाले त्याठिकाणी आपण उभे आहोत याचा अभिमान वाटतो. एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला. राज्यात सुरु असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनारोजगार मेळाव्याचे आयोजन यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने  सुरू केल्या आहेत ज्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले कीमहाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरे स्थापन केली जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संविधानाची निर्मिती व त्या अनुषंगाने सर्व माहिती समजून घ्यावी. कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना 21 व्या शतकासाठी तयार करणे, शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदश्य संवादप्रणालीव्दारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रनिर्माणाचा हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल कौशल्य विकास विभाग आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे त्यांनी अभिनंदन केले.

आपले संविधान सर्वधर्मसमभावाचे प्रतिक : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले कीराज्याच्या विकासामध्ये कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण होत आहे याचा अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांनी  या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहनही श्री आठवले यांनी केले.

भारताचे संविधान सर्वांसाठी मार्गदर्शक : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग गतीने काम करत आहे.

जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून कौशल्य विकास विभागांतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. आपले संविधान आणि त्याचे महत्व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असेही श्री. लोढा यांनी सांगितले.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या डॉ. भदंत राहुल बोधी (महाथेरो)भदंत बोधिशील स्थंविरराजकुमार त्रिमुखेबाळू अहिरेहनुमंत लोंढे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

0000


जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर


 

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

 *‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*


*रायगड जिल्ह्यात 1240 पदवीधर उमेदवारांना योजनादूत होण्याची संधी*


रायगड जिमाका , दि. 15: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. रायगड जिल्ह्यात 1240 योजनादूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज करावेत. 

         महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

          या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

            मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी नोंदणी करावी

घोंगडी हे पवित्र वस्त्र*

 *घोंगडी हे पवित्र वस्त्र*

                  👇👇👇👇👇

 *"वीर्यस्पृष्टं शवस्पृष्टं स्पृष्टं मूत्रपुरीषयोः । रजस्वलादिसंस्पृष्टमाविकन्तु न दुष्यति ।।"*

अर्थात  -- आविक म्हणजे घोंगडी वस्त्रास वीर्य, प्रेत, मल, मूत्र व रजस्वला यांचा स्पर्श झाला तरी ते वस्त्र दूषित होत नाही असे शास्त्र वचन आहे.

🙏🙏👇👇🙏🙏

*धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:*


प्रत्येक साधकाकडे घोंगडी असणे गरजेचे असते

आपण करत असलेल्या साधनेला उच्च स्थरावर घेऊन जायचे असेल तर साधना घोंगडीवर करावी.


पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता. 

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करावा. वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे. पितृदोष असणाऱ्यांनी काळे घोंगडे दान करावे कारण घोंगडे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पितृदोष असणाऱ्यांना. महालक्ष्मी पूजनासाठी सुद्धा घोंगडे वापरले जाते.

🙏🙏👇🙏🙏

*घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*


▪️पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून                 आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड         प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.


▪️झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.


▪️उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.


▪️कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.


▪️घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.


▪️हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.


▪️घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.


▪️अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

 *🙏गुरू ॐ तत सत🙏*

पुणे दगडू शेठ हलवाई गणपती प्रसाद च लाभ घ्या.


 

Saturday, 14 September 2024

विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करावेमुख

 विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करावे

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू

 

मुंबईदि. 14 :  बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसादयाकरुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवेअसे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे ‘बुद्धांचा मध्यममार्ग – जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ या विषयावर मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विशेष परिषद आयोजित करण्यात आली होतीत्यावेळी श्री. रिजिजू बोलत होते. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरादलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळेडॉ. दामेंडा पोरजे यांच्यासह भिख्खू व अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बुद्ध यांचा मध्यम मार्ग वैश्विक नेतृत्वासाठी मार्गदर्शकया विषयावरील ही परिषद महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीत होत असल्याचे सांगून श्री. रिजिजू म्हणाले कीमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुंदर असे संविधान भारत देशाला दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.

महाराष्ट्रात अल्पसंख्याक व बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या संस्थांनी शासनाच्या मदतीने राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागात संविधान सभागृह तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच अल्पसंख्याक समुदायासाठी अभ्यास केंद्रनोकरी करणाऱ्या महिला व विद्यार्थींनीसाठी वसतिगृह उभारणीकरिता प्रयत्न करावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. लालपुराश्री. कांबळेश्री. पोरगे यांनी मनोगतात या परिषदेच्या आयोजनाची भूमिका मांडली.

Featured post

Lakshvedhi